Manoj Jarange Patil Maratha Reservation: Saamtv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: '...तर तुमचा राजकीय एन्काऊंटर', अमित शहांच्या 'त्या' वक्तव्यावरुन मनोज जरांगे संतापले; VIDEO

Gangappa Pujari

राम ढाकणे, छत्रपती संभाजीनगर|ता. २९ सप्टेंबर

Manoj Jarange Patil On Amit Shah: दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. यावेळी अमित शहा यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मराठा आरक्षणावरुन एक महत्वाचे विधान केले होते. ज्यांना आंदोलन करायचं त्यांना करू द्या. मराठा आंदोलनाची चिंता करु नका, अशी आंदोलने हाताळण्याचा आम्हाला अनुभव आहे. गुजरातमध्ये आम्ही पटेल, गुर्जर समाजाचे आंदोलन असेच हाताळले होते, असं ते म्हणाले होते. शहांच्या या वक्तव्याचा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

'जेव्हा पंतप्रधान मोदी शिर्डीला आले होते, तेव्हा मी बोललो होतो. मराठ्यांच्या नादी लागू नका. तुम्ही जसं गुज्जर आणि पटेलांच आंदोलन जस हतळल तास हे मराठा आंदोलन हाताळता येणार नाही. त्यामुळं तुम्ही आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्यावं. मी जाहीर सांगतो मराठ्यांना सोडून महाराष्ट्रात सत्ता स्थापन करु शकत नाही. मराठा आणि कुणबी एकच आहे, जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने हाताळल तर त्याचे वेगळं परिणाम होईल,' असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

'तुम्हाला जर असं वाटतं असेल आरक्षण न देता आंदोलन हाताळाल तरी तुम्ही या महाराष्ट्रात संवैधानिक पदावर बसू शकत नाही. तुमच्या पद्धतीने आंदोलन हाताळाल म्हणजे कष्ट आम्ही करायच आणि लोणी तुम्ही खायचं. प्रमोद महाजन, राम जेठमलानी, सुषमा स्वराज, लालकृष्ण अडवाणी अशा अनेक लोकांचा तुमच्याच लोकांचा घात तुम्ही केला, पण माझ्या मराठ्याचे आंदोलन हाताळण्याच्या भानगडीत पडले तर तुमचा राजकीय एन्काऊंटर होणार,' असा मोठा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला. 'धनगर समाजाची जी मागणी आहे. ती संवैधानिक पद्धतीने आहे असं छगन भुजबळ यांचं म्हणंण आहे. आरक्षण हा काही राजकीय मुद्दा नाही. सगळ मलाच पाहिजे अशी भूमिका भुजबळ यांची आहे. आरक्षण म्हणजे निव्वळ राजकारण असं त्यांनी करून ठेवलं आहे. त्यांचा तो अजेंडा आहे, त्यांच्या राजकीय स्वार्थापोटी त्यांनी हे केलं,' असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : पुण्यात काचेच्या कारख्यान्यात माल उतरवताना दोघांचा मृत्यू

Safai Karamchari Bharti 2024 : परीक्षा न देता मिळणार सरकारी नोकरी; 23000 पदांसाठी मोठी भरती, वाचा सविस्तर

National Fruit: टरबूज हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय फळ आहे?

Latur News : जागा वाटपावरून मविआमध्ये रस्सीखेच; लातूर जिल्ह्यातील तीन जागांवर ठाकरे गटाचा दावा

Beetroot Benefits: बीटरुट खा, निरोगी राहा; जाणून घ्या फायदे

SCROLL FOR NEXT