Manoj Jarange Patil Saam TV
महाराष्ट्र

Maratha Reservation: मराठा आरक्षण पुन्हा तापणार! जरांगे पाटलांचे आजपासून अंतरवालीत उपोषण; प्रशासनाची परवानगी नाहीच

Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest: लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे शांत झालेला मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापणार आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मनोज जरांगे पाटील हे आजपासून उपोषणाला बसणार आहेत.

डॉ. माधव सावरगावे

जालना, ता. ८ जून २०२४

मराठा आरक्षण आणि सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे अस्त्र उपसले आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आजपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसणार आहेत. पोलिसांकडून परवानगी नाकारल्यानंतरही जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. त्यामुळे परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कायदा आणि सुव्यवस्था बिघडत असल्याचे कारण दाखवून जालना जिल्हा पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मनोज जरांगे पाटील हे आजपासून अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू करणार आहेत. सगेसोयरेबाबत सरकारने निर्णय घ्यावा यासाठी हे उपोषण असणार आहे. ४ जूनपासूनच मनोज जरंगे पाटील उपोषणाला बसणार होते. मात्र पोलिसांनी त्यावेळी आचारसंहिता असल्याने आंदोलन करता येणार नाही असे सांगून परवानगी नाकारली होती.

आंदोलनाची जय्यत तयारी

अंतरवाली सराटीमध्ये या आंदोलनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने टीन पत्र्याचा शेड तयार करण्यात आला आहे. पाठिंबा देण्यासाठी येणाऱ्या लोकांना बसण्यासाठी जागा वाढविण्यात आली आहे. तसेच परिसरात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आलीय.

मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणाला गावकऱ्यांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतरही आजपासून जरांगे पाटील यांनी उपोषणाचे अस्त्र उपसले आहे. याच पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एक डीवायएसपी, चार पीआय, १४ पीएसआय, एपीआयसह २७५ पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. त्यात १२० एसआरपीएफचे जवान, २४ दंगा नियंत्रण पथकांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

SCROLL FOR NEXT