Manoj Jarange Patil addressing the media as tensions escalate over his renewed allegation that Dhananjay Munde financed a plot to kill him. Saam Tv
महाराष्ट्र

धनूभाऊंनी दिली जरांगेंची सुपारी? जरांगेंच्या घातपातासाठी अडीच कोटींची डील?

Jarange vs Munde: जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर घातपाताचा आरोप केलाय... जरागे नेमकं काय म्हणाले? मुंडेंनी जरागेंच्या आरोपाला काय प्रत्युत्तर दिलं... जरागेंच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपींनी काय कबुली दिली?

Suprim Maskar

महिन्याभरापूर्वी जरांगेंनी केलेल्या घातपातासाठी सुपारी दिल्याच्या आरोपांमुळे पोलिसांनी दादा गरुडसह आणखी एका आरोपीला अटक करून चौकशीला सुरुवात केली...त्यानंतर हत्येच्या कटावरून मुंडे आणि जरागेंनी एकमेंकांना नार्को टेस्टचं आव्हानही दिलं... त्यातच मुंडेंवर पुन्हा एकदा हत्येचा कट रचल्याचा आरोप करत जरागेंनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केलाय... तर दुसरीकडे मुडेंनी जरांगेंवर बोलणं टाळलयं...

विरोधकांकडून धनंजय मुंडेंना सातत्याने टार्गेट केलं जातंय. तसचं जरांगेंनी आपल्या घातपाच्या कटामागे मुंडेंचा हात असल्याचा आरोप केलेला असतानाच नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतलीय... विशेष म्हणजे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पोलीस महासंचालक रश्मी शुक्लाही उपस्थित होत्या.. त्यामुळे मुंडेंच्या मुख्यमंत्री भेटीची चांगलीच चर्चा सुरु झालीय

जरांगेंनी आरोप केल्यानंतर या प्रकरणात अटक सत्र सुरू झालं आणि सखोल चौकशी करण्यासाठी सरकारनं एसआयटी स्थापन केली. त्यामुळे सरपंच देखमुखांच्य़ा हत्या प्रकरणानंतर आता पुन्हा धनंजय मुंडेंची डोकेदुखी वाढणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कायद्याच्या राज्यात धावत्या बसमध्ये दरोडे; प्रवाशांची लूटमार कधी थांबणार?

मोठी बातमी: ५०० खोक्यांवर विधान करणं काँग्रेस महिला नेत्याला भोवलं! नवज्योत कौर सिद्धूचं थेट निलंबन

IndiGo हाजिर हो! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स

खूशखबर! नवी मुंबईला मिळणार आणखी एक मेट्रो; कुठून कुठे धावणार ? जाणून घ्या

IAS Transfer: राज्यातील १३ जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या, नवं सरकार येताच बिहारमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल

SCROLL FOR NEXT