Manoj Jarange Patil  Saam Digital
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : मोठी बातमी! अंतरवालीतील मंडप हटवण्याचे आदेश, पोलीस दाखल झाल्यानंतर जरांगें संतापले

Manoj Jarange Patil Strike : मनोज जरांगें यांच्या उपोषणस्थळावरील मंडप काढण्याचे आदेश देण्यात आले असून आता त्याठिकाणी पोलीस देखील पोहोचले आहेत. दरम्यान राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मनोज जरांगें पाटील चांगलेच संतापले आहेत.

Sandeep Gawade

Manoj Jarange Patil

मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आजच्या अधिवेशनात त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत होती. त्यानंतर एसआयटी मार्फत करण्यात येणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता मनोज जरांगें यांच्या उपोषणस्थळावरील मंडप काढण्याचे आदेश देण्यात आले असून आता त्याठिकाणी पोलीस देखील पोहोचले आहेत. दरम्यान राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मनोज जरांगें पाटील चांगलेच संतापले आहेत.

जरांगें पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर ते उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. मात्र पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यांची बातमी मिळाल्यांनंतर ते अंतवालीला रवाना झाल्यांची माहिती आहे. दरम्यान त्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर काही तासांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर माफी मागीतली होती. अर्थसंकल्प अधिवेशनात याबाबत पडसाद उमटले होते. जरांगेंने केलेल्या आरोंपांमगे कोणाचातरी हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या.

काय म्हणाले जरांगे पाटील?

सोळा-सतरा दिवस माझ्या पोटात अन्नाचा एकही कण नव्हता. मी माझ्या माता माऊलीला मानतो. जर माझ्याकडून चुकीचे शब्द गेले असतील तर मी माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो. कारण चुक झाल्यावर दिलगिरी व्यक्त करणं म्हणजे छत्रपती शिवरायांचा विचार आहे, असं जरांगे पाटील म्हणाले.

पुढे एसआयटी चौकशीवर बोलताना त्यांनी म्हटलं, सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय मी हटू शकत नाही आणि हटणारही नाही. त्यांना काय चौकशा करायच्या असतील त्यांनी त्या बिनधास्त कराव्या. एसआयटीची चौकशी सुद्धा बिनधास्तपणे चालू द्यावी, त्याबद्दल आपलं काहीच म्हणणं नाही. सगळ्या यंत्रणा त्यांच्याच आहेत. त्यांना त्या कशा चालवायच्या आहेत, काय धाक दाखवायचेत ते दाखवा. मात्र मी माझ्या मराठा समाजासाठी आयुष्यभर जेलमध्ये जायला आणि लढायला तयार आहे, अशा शब्दांत जरांगें पाटलांनी ठामपणे आपली भूमिका मांडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result: तुमचा आमदार कोण? २८८ मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नांदगावमधून सुहास कांदे विजयी

Aaditya Thackeray: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; वरळीतून आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा आमदार

मनसेला आणखी एक धक्का, शिवडीत बाळा नांदगावकरांचा पराभव

Dheeraj Deshmukh: लातूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, धीरज देशमुख यांचा पराभव

SCROLL FOR NEXT