Manoj Jarange Patil Rally Jalna: Saamtv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंची 'शांतता रॅली' आज जालन्यात! होम ग्राऊंडवर होणार जल्लोषात स्वागत; शहरात तगडा पोलीस बंदोबस्त

Gangappa Pujari

अक्षय शिंदे, ता. १२ जुलै २०२४

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज जालन्यामध्ये निघणार आहे. या शांतता रॅलीच्या मार्गावर विविध समाज बांधवांकडून मनोज जारंगे पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. या रॅलीची मराठा बांधवांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

शांतता रॅली आज जालन्यात

आज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात जालन्यात शांतता रॅली निघणार आहे. या शांतता रॅलीच्या मार्गावर विविध समाज बांधवांकडून मनोज जारंगे पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. शहरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात होणार असून याच ठिकाणी जय भीम सेनेच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत होणार आहे..

काल बीडनंतर अंतरवाली सराटी येथे मुक्कामी असलेले मनोज जरांगे हे अकरा वाजता जालना शहरांमध्ये दाखल होतील. त्यानंतर जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळा चौकातून या रॅलीला सुरुवात होणार आहे. यासाठी आयोजकांकडून तयारी करण्यात आली असून रॅली दरम्यान तीन ठिकाणी मनोज जरांगे यांचे जेसीबी आणि मोठ्या फुलांचे हार घालून त्यांचं स्वागत होणार आहे.

शहरात तगडा बंदोबस्त

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर जालन्यामध्ये तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शांतता रॅलीसाठी 400 पोलीस तैनात करण्यात आले असून रॅली मार्गावर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवली जाणार आहे. हजारो झेंडे आणि शेकडो बॅनर्समुळे शहर भगवामय झाले असून लाखोच्या संख्येने मराठा बांधव रॅलीमध्ये सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident: जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात! ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

Maggi Dosa Recipe : मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा; वाचा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

SCROLL FOR NEXT