Manoj Jarange Patil Saam Tv
महाराष्ट्र

Maratha Reservation: आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात! लाखोंच्या संख्येने मराठा बांधव एकटवणार; काय आहे नवी रणनिती? पाहा VIDEO

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली

हिंगोली, ता. ५ जुलै २०२४

मराठा आरक्षण अन् सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. उद्यापासून मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली रॅलींचे आयोजन करण्यात येणार आहे. हिंगोली जिल्ह्यापासून या रॅलीला सुरूवात होणार आहे.

मराठा आरक्षणासाठी मूक मोर्चे, लाखोंच्या सभा घेतल्यानंतर आता मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यात रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्यसरकारच्या विरोधात आता ही रणनीती सुरू केली आहे. उद्या हिंगोली जिल्ह्यातून या रॅलीला सुरुवात होणार आहे. मागील चार दिवसांपासून हिंगोली शहरात या रॅलीची तयारी सुरू आहे.

पोलीस अधिकारी, कर्मचारी , महिला स्वयंसेवक या रॅलीच्या नियोजनासाठी तैनात करण्यात आले आहेत. दोनशे भोंगे, शेकडो पोस्टर आणि 1200 शे स्वयंसेवकांसह पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त या रॅलीला असेल. रॅलीमध्ये बंदोबस्तासाठी कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांसाठी भोजनाचे आयोजन देखील मराठा बांधवांकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, सरकारने सगे सोयऱ्यांची अंमलबजावणीचा शब्द दिला आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे. म्हणून त्यांनी अध्यादेश काढला पाहिजे. मराठा समाजाला वेळोवेळी रस्त्यावर यावं लागणार आहे. म्हणून शांतता रॅली महाराष्ट्रभर काढणं गरजेचं आहे. पहिल्या टप्प्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. पूर्ण महाराष्ट्रभर पाच टप्प्यांमध्ये शांतता रॅली होणार आहे, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुणे हादरलं! वारज्यात घरात घुसून महिलेवर लैंगिक अत्याचार, शहरात संतापाची लाट

Hypertension and High Cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे हाय ब्लड प्रेशरचा त्रास? वाचा तज्ज्ञांनी काय काय सांगितलं

Bigg Boss Marathi Grand Finale: ग्रँड फिनालेच्या मंचावर इरिना-वैभवच्या धमाकेदार डान्सचा जलवा

Sabudana Role Recipe: उपवासाठी तयार करा झटपट साबूदाणा रोल्स, वाचा परफेक्ट रेसिपी

Marathi News Live Updates : उड्डाण पुलाच्या कामाच्या श्रेयवादाची लढाई; भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने

SCROLL FOR NEXT