Manoj Jarange Patil Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: भुजबळांनंतर सुषमा अंधारेंवर जरांगे पाटलांचा निशाणा; टीकेला प्रत्युत्तर देताना म्हणाले...

Maratha Reservation: आरक्षण मिळतंय म्हणून ते फुलांची उधळून करत आनंद साजरा करत आहेत. विषय फुलाचा राहिला तर माय बाप म्हणून आनंदात मुलावर फुलांची उधळण केली जातेय, असं जरांगे पाटील म्हणालेत.

Ruchika Jadhav

Maratha Aarakshan:

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. जरांगे ज्या गावात भेट देत आहेत आणि सभा घेत आहेत तेथे त्यांचं जंगी स्वागत करण्यात येतंय. जेसीबीतून त्यांच्यावर फुलांची उधळण केली जात आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी जरांगेवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला जरांगे पाटलांनी पलटवार केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फुलाचा आणि आरक्षणाचा काय संबंध? असा सवाल जरांगे पाटलांनी सुषमा अंधारेंना विचारला आहे. आरक्षण हे मागासलेपणावर आहे. मराठा समाज ६०-७० वर्षांपासून आरक्षणाची वाट बघत आहे. आरक्षण मिळतंय म्हणून ते फुलांची उधळण करत आनंद साजरा करत आहेत. विषय फुलाचा राहिला तर माय बाप म्हणून आनंदात मुलावर फुलांची उधळण केली जातेय, असं जरांगे पाटील म्हणालेत.

काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे?

एकीकडे मागास म्हणता आणि दुसरीकडे आडनावामागे पाटील लावता. जरांगेंनी भुजबळांवर टीका करणं देखील चुकीचं आहे. एकीकडे तुमच्याकडे काहीच नाही असं तुम्ही म्हणता आणि दुसरीकडे गावांमध्ये तुमच्यावर १०० जेसीबीतून फुलांची उधळण केली जाते. मनोज जरांगे आरक्षणासाठी लढत आहेत असं सुरुवातीला आम्हाला वाटत होतं. मात्र आता आरक्षणावरचा त्यांचा फोकस हललेला आहे, असं आम्हाला वाटत असल्याचं सुषमा अंधारेनी म्हटलं होतं.

खचणार अन् घाबरणार नाही आमच्याशी दगा फटका करू नका

सभा घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र मराठा समाजाला नोटीस देऊन दबाव टकाणे थांबवा. समाजात नाराजी निर्माण होईल असे करू नका. साखळी उपोषण करणाऱ्यांना नोटिस पाठवणं थांबवा. सरकारला विनंती समाजाशी दगाफटका करू नका. गुन्हे दाखल केल्याने समाज खचणार,घाबरणार नाही, असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tringalwadi Killa : ऐतिहासिक ठिकाणी फिरायला जायचंय? त्रिंगलवाडी किल्ला ठरेल बेस्ट

Karishma Kapoor: ५१ वर्षांच्या करिश्माचा काय आहे स्किन केअर सिक्रेट; जाणून घ्या

Maharashtra Politics : शिंदे गटाला भाजपकडून धक्का! शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी हाती घेतलं 'कमळ'

Mahadev Munde Case : महादेव मुंडे हत्या प्रकरणात कोणाचा हात? शिवराज बांगर यांनी केला धक्कादायक आरोप

ठाकरे बंधू एकत्र आल्याचा धसका, CM फडणवीसांनी सांगितला निवडणूक प्लान | VIDEO

SCROLL FOR NEXT