Manoj Jarange Patil Hunger Strike Protest Mumbai LIVE Updates:  Saam TV Marathi News
महाराष्ट्र

Manoj jarange patil protest Live: - सरकारच्या जीआर विरोधात ओबीसी नेते न्यायालयात धाव घेणार

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज मंगळवार, दिनांक ०२ सप्टेंबर २०२५, मनोज जरांगेंच्या आझाद मैदानावरील आंदोलनाचा पाचवा दिवस, आंदोलनावर कोर्टात महत्त्वाची सुनावणी, सात दिवसाच्या गणपतीचे विसर्जन, मंत्रिमडळाची बैठक, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

सरकारच्या जीआर विरोधात ओबीसी नेते न्यायालयात धाव घेणार

- सरकारच्या जीआर विरोधात ओबीसी नेते न्यायालयात धाव घेणार

- छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांमध्ये सुरू आहे प्राथमिक चर्चा

- मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज काढलाय जीआर

- ओबीसींच्या हक्कांवर सरकारने जीआर काढून अन्याय केल्याची ओबीसी नेत्यांची भावना

- सरकारचा जीआर कायद्याच्या पटलावर टिकणार ? याकडं लक्ष

Pune: ओबीसी समाजाकडून सरकारने काढलेल्या जीआरबद्दल विरोध

पुणे -

ओबीसी समाजाकडून सरकारने काढलेल्या जीआरबद्दल विरोध

पुण्यात उद्या ओ बी सी समाजातील नेत्यांची बैठक होण्याची शक्यता

जी आर हा न्यायालयात टिकणार असल्याचे सुद्धा ओ बी सी अभ्यासकांचे मत

ओ बी सी समाजातील बांधव या जी आर चा विरोध दर्शवण्याची शक्यता

Maval: मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावरील उर्से टोल नाक्यावर आंदोलनकर्त्यांचा एकच जल्लोष

मावळ-

मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतर मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावरील उर्से टोल नाक्यावर आंदोलनकर्त्यांनी एकच जल्लोष केला

मनोज जरांगे यांच्या घरी आनंदोत्सव

फटाके फोडून गुलाल उधळत एकमेकांना पेढे भरउन आनंद व्यक्त..

मनोज जरांगे यांच्या पत्नी सौमित्रा, मुलगी पल्लवी आणि मुलगा शिवराज यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला..

दरम्यान उपोषण सुटला आणि आरक्षण ही भेटलं त्यामुळे सरकार ने यापुढे फसवणूक करू नये असे म्हणत, मनोज जरांगे यांच्या पत्नी सौमित्रा जरांगे यांनी सरकार चे आभार मानले.

तर मराठा समाजाच्या सत्तर वर्षांपासूनच्या लढ्याला यश मिळाला असून समाजासाठी हा सुवर्ण दिवस असल्याचं म्हणून जरांगे यांचा मुलगा शिवराज जरांगे याने आपली भावना व्यक्त केलीय..

मंचरमध्ये एकमेकाला लाडू भरवून मराठा आंदोलकांनी साजरा केला आनंदोत्सव

पुणे जिल्ह्याच्या मंचरमध्ये मराठा बांधवांनी एक मेकांना लाडू भरवत मनोज जरांगे पाटलांचा आंदोलनाला आलेले यश व सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्याचा आनंद साजरा केला.

आमचे साहेब संकटमोचक ठरले_शिर्डीत विखे पाटलांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष_फटाके फोडून पेढे वाटले

आरक्षणाचा तिढा सुटल्यानंतर राज्यभरात मराठा कार्यकर्त्यांचा जल्लोष बघायला मिळतोय.. या सगळ्या प्रक्रियेत आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याने शिर्डी मतदारसंघातही कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.. मराठा कार्यकर्त्यांनी जरांगे पाटलांसह विखे पाटलांच्या नावाचा जयजयकार केला.. आमचे साहेब खऱ्या अर्थाने संकट मोचक ठरले.. एव्हढी वर्षे जाणता राजा म्हणणाऱ्या नेत्याला जे जमले नाही ते विखे पाटलांनी करून दाखवले अशा भावना यावेळी विखे समर्थकांनी व्यक्त केल्यात..

बीडमध्ये मनोजजरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात गुलाल उधळून जल्लोष पाहायला मिळाला

यावेळेस लहान मुलांपासून ते वयोवृद्धा पर्यंत समाजातील बांधवांनी आनंद साजरा केला

मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटल्याने नाशिकमध्ये भाजपकडून जल्लोष

- मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याने जल्लोष

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपसमितीने ऐतिहासिक निर्णय घेतल्याने भाजपाकडून आनंदोत्सव साजरा

- मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश मिळाल्याबद्दल धन्यवाद देवा भाऊ अशा आशयाचे हातात पोस्टर घेऊन जल्लोष

मराठा समाजाच्या हिताचा तोडगा निघाला - देवेंद्र फडणवीस

मनोज जरांगेंच्या सरसकट मागणीमध्ये कायदेशीर अडचणी होत्या

मराठा समाजाच्या हिताचा तोडगा निघाला

हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी सुरूवातीपासून तयारी होती.

कायद्यात सरसकट बसत नसेल तर सरसकट करू नका

त्यासंदर्भातील चर्चा केल्या गेल्या

इतर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या आहेत

राधाकृष्ण विखे-पाटील हे मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आहेत. त्यांचे आणि सर्व मंत्र्यांचे मनापासून अभिनंदन.

Manoj Jarange : अँब्युलन्समधून मनोज जरांगे पाटील थेट छत्रपती संभाजीनगरला रवाना

अँब्युलन्समधून मनोज जरांगे पाटील थेट छत्रपती संभाजीनगरला रवाना

जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगरला घेणार उपचार

हैदराबाद गॅझेट लागू करण्याची घोषणा होताच मराठवाड्यात तुफान जल्लोष

हैदराबाद गॅझेट लागू करण्याची घोषणा होताच मराठवाड्यात तुफान जल्लोष

धाराशिवच्या कळंब मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा कार्यकर्त्यांचा जल्लोष

गुलालाची उधळत फटाक्याची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा

मनोज जरांगे पाटलामुळे आरक्षणाचा लढा यशस्वी झाला , आज आमची दिवाळी, मराठा कार्यकर्त्यांची भावना

Navi Mumbai : नवी मुंबईत मराठा आंदोलकांकडून जल्लोष सुरू

नवी मुंबईत मराठा आंदोलकांकडून जल्लोष सुरू

हलगी आणि ढोल ताशांच्या गजरात आनोदोत्सव साजरा करतायेत

आंदोलनाच्या पाचव्या दिवशी मराठा आंदोलकांनी नाचत गाजत विजयाचा गुलाल उधळला

हैदराबाद गॅझेट लागू करताच धाराशिवमध्ये मराठा बांधवांचा जल्लोष

मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारकडून पूर्ण होताच जालन्यात मराठा बांधवांकडून गुलाल उधळत फटाके वाजत जल्लोष....

सरकारकडून मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्यानंतर जालन्यात मराठा बांधवांकडून जल्लोष करण्यात आलाय...

जालना शहरातील मोतीबाग परिसरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याला हार अर्पण करून मराठा समाजाचा जल्लोष...

Manoj jarange patil protest live updates: मागण्या मान्य, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं

Manoj Jarange : हैदराबाद गॅझेटच्या जीआरला मनोज जरांगेंकडून मान्यता, लवकरच मुंबई सोडणार

Maratha Morcha : जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये जल्लोष

जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये जल्लोष

मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य झाल्याने जालन्यातील अंतरवाली सराटी गावात जल्लोष

अंतरवाली सराटीत गुलाल उधळत आनंद साजरा

Maratha Morcha : मुंबईच्या आझाद मैदानाच्या बाहेर मराठा आंदोलनाचा विजय जल्लोष

मुंबईच्या आझाद मैदानाच्या बाहेर मराठा आंदोलनाचा विजय जल्लोष

फटाके बार फोडत या विजयाचा आनंद व्यक्त करत आहेत

काही तरुणांनी हातामध्ये बार फोडण्याचा आनंद घेतला घेतला आहे.

गुलाल उडवत हा विजय जल्लोष साजरा होताना पाहायला मिळतोय.

ढोल ताशाचा गजरात तरुणाई थिरकताना पाहायला मिळत आहे

९ वाजेपर्यंत मुंबई खाली करणार- मनोज जरांगे पाटील

जीआर काढल्यानंतर गुलाल उधळून जाणार.. तुमच्या डोक्यावर आनंदाने गुलाल टाकला जाईल. जीआर काढल्यानंतर आज रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली होईल. लवकर जीआर काढा.. नाचत नाचत सर्वजण मुंबई सोडतील. तुमच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज झालोय.

राजे तुमचा शब्द अंतिम.. तुम्ही 15 दिवस बोलले, मी एक महिना देतो, मनोज जरांगे

मराठा आणि कुनबी एक असल्याचा जीआर काढा यावर सरकारने वेळ मागितला आहे. मराठा आणि कुनबी एक असल्याचा जीआर काढण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून ४५ दिवसांचा वेळ दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याकडे विखे पाटील यांनी दोन महिन्याचा वेळ मागितला. त्यावर जरांगेंनी दोन महिन्याचा वेळ दिला आहे.

तालुकास्तराच्या वंशावळ समिती देण्यात आली- मनोज जरांगे पाटील

तालुकास्तराच्या वंशावळ समिती देण्यात आली आहे. पुढील जून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. शिंदे समितीकडून नोंदी शोधण्याचे काम सुरू आहे. शिंदे समितीला तालुकास्तरावर कार्यलय द्या.

५८ लाख नोंदीचा रेकॉर्ड ग्रामपंचायतमध्ये लावण्याच्या मागणीला मान्यता- मनोज जरांगे पाटील

५८ लाख नोंदीचा रेकॉर्ड ग्राम पंचायतमध्ये लावा, अशी मागणी होती. त्याला मान्यता मिळाली आहे.

आतापर्यंतच्या जात प्रमाणपत्र रोखून धरल्या आहेत. त्या ताबोडतोड मिळावी, असा आदेश काढावा. विखे पाटील - या संदर्भात स्वतंत्र माहिती घेऊन.. प्रत्येक सोमवारी सर्व दाखले मार्गी काढावा असा आदेश काढला जाईल.

मराठा आंदोलनात बलिदान झालेल्यांच्या कुटुंबाला आठवड्याभरात मदत जमा होईल- मनोज जरांगे पाटील

मराठा आंदोलनात बलिदान झालेल्यांच्या वारसांना १५ कोटींची मदत देण्यात आली आहे. उर्वरित कुटुंबाला एका आठवड्याच्या आत खात्यावर मदत जमा होईल. एसटी महामंडळात नोकरी मिळेल, असे सांगण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी नोकरीवर आक्षेप घेतला. एसटीमध्ये नोकरी देण्याऐवजी दुसरीकडे चांगली नोकरी द्यावी, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. महावितरण, एमआयडीसीमध्ये सरकारी अधिकारी केलं तरी चालेल, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

महाराष्ट्रातील आंदोलकांवरील सर्व  गुन्हे मागे घेतले- राज्य सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्रातील आंदोलकांवरील विविध ठिकाणाचे गुन्हे मागे घेतले आहेत. काहींचे राहिले ते कोर्टात जाऊन गुन्हे मागे घेऊ.. एक महिन्यात सर्वांवरील गुन्हे मागे घेणार असल्याचा जीआर काढला आहे.

राज्याने सार्वजनिक ठिकाणी आंदोलनांसंदर्भात आपले नियम प्रसिद्ध केले नाहीत- मनोज जरांगे पाटील यांचा वकील

मराठा आंदोलक आयोजकांचा दुसरा वकील : राज्याने सार्वजनिक ठिकाणी आंदोलनांसंदर्भात आपले नियम प्रसिद्ध केले नाहीत.

कोर्ट : आम्ही एक आदेश जारी करू ज्यात आयोजकांचे निवेदन नोंदवले जाईल. मनोज जरांगे यांनी आपल्या समर्थकांना रस्ते रिकामे करण्याचे आणि कोणताही गोंधळ निर्माण न करण्याचे आवाहन केल्याचा उल्लेख त्यात असेल.

परवानगी वाढवली जाईल या अपेक्षेने निर्धारित वेळेच्या मर्यादेपलीकडे बसू शकतात का?- उच्च न्यायालय

मानेशिंदे यांनी वेगवेगळ्या तारखांचा उल्लेख केला. त्यांनी आंदोलनासाठी अर्ज केलेल्या आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केलेल्या विविध तारखांचा कोर्टात उल्लेख केला. त्यावर कोर्टाने मराठा आंदोलकांचे वकील माने शिंदा यांना प्रतिप्रश्न विचारला.

एसीजे : ज्यांना 24 तासांसाठी परवानगी आहे, ते फक्त परवानगी वाढवली जाईल या अपेक्षेने निर्धारित वेळेच्या मर्यादेपलीकडे बसू शकतात का?

Maratha Aarakshan: आम्हाला तुमच्याविरुद्धही आदेश द्यावे लागतील, उच्च न्यायालय पोलिसांवर संतापले

एजी : आम्ही मनोज जरांगे आणि इतर आयोजकांना उल्लंघनांबाबत नोटीस बजावली आहे. मनोज जरांगे पाटील प्रभावशाली व्यक्ती आहेत. त्यांनी लिखित आणि तोंडी आवाहन केल्यास मराठा आंदोलक, समर्थक मुंबई सोडून जातील. रात्रभर पोलिसांनी आंदोलकांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला आणि याचा काही परिणाम झाला. परंतु जरांगे यांनी लोकांना आवाहन केल्यास मोठा परिणाम होईल.

एसीजे : म्हणजे तुम्ही त्यांच्या लोकप्रियतेवर अवलंबून आहात? तुम्ही आमच्या आदेशांचा अंमल का करू शकत नाही? हे तुमचे कर्तव्य आहे. सहभागींची संख्या 5,000 वरून एक लाखापेक्षा जास्त झाल्याचे तुम्ही न्यायालयात का सांगितले नाही? आम्हाला तुमच्याविरुद्धही आदेश द्यावे लागतील. तुम्ही सर्व पावले उचलू शकत होता. तुम्ही बळजबरीने जागा रिकामी करू शकत होता. हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे. आम्ही तुमच्या वर्तनावर अत्यंत नाराज आहोत. आम्ही आमच्या आदेशांचे उल्लंघन आणि अवमान सहन करू शकतो का? आणि तेही अनेक दिवसांपासून?

जरांगे पाटील यांनी सांगितले तरच जेवणाच्या गाड्या बाहेर काढू; मराठा आंदोलकांची भूमिका

जरांगे पाटील यांनी सांगितले तरच जेवणाच्या गाड्या बाहेर काढू असी भूमिका जेवणाच्या साहित्य असलेल्या गाड्या चालकांनी भूमिका घेतली आहे

मराठी आंदोलनाबाबत सुनावणी उद्या ढकलली

न्यायमूर्ती : तुमच्या विनंतीवरून, हे प्रकरण उद्या सकाळपर्यंत पुढे ढकलत आहोत. अॅडव्होकेट जनरल डॉ. बिरेंद्र सराफ यांनी शपथपत्र सादर केले आणि निवेदन केलेय.

AG: पोलिस या न्यायालयाच्या आदेशाबाबत घोषणा करत आहेत. आम्ही होर्डिंग्ज आणि पोस्टर्स लावले आहेत. मोठ्या संख्येने जमाव कमी झाला आहे, पण काही ठिकाणी अजूनही जमाव आहे. वाहने थांबलेली आहेत. काहीजण न्यायालयाचा आदेश ऐकत आणि मानत आहेत, तर काहीजण ऐकत नाहीत आणि पोलिसांसाठी कठीण परिस्थिती निर्माण करत आहेत.

आम्हाला थोडा वेळ द्यावा- मानेशिंदे

माने शिंदे : आम्हाला थोडा वेळ द्यावा. उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्यात यावी. आम्ही फक्त एकदा मायक्रोफोनवरून लोकांना जायला सांगितलं आणि लोक मुंबई सोडून निघाले.

न्यायमूर्ती : तुमचा किती प्रभाव आहे, ते पाहा. तुमचा जनतेवर मोठा प्रभाव आहे.

सुनावणी उद्या सकाळपर्यंत पुढे ढकला- मानेशिंदे

न्यायमूर्ती : तुमचे समर्थक नक्कीच तुमचे ऐकतील. तुम्हाला तिथे किती काळ बसू द्यायचे हे आम्हाला पाहावे लागेल...

मानेशिंदे: कृपया सुनावणी उद्या सकाळपर्यंत पुढे ढकला. उद्यापर्यंत कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, याची खात्री देतोय.

न्यायमूर्ती कायद्याचे राज्य राखले गेलेच पाहिजे. आम्ही कोणताही सक्तीचा आदेश देण्यास नाखुष आहोत. कारण यापूर्वीच कोर्टाच्या आदेशाने तुम्हाला तिथे बसण्याची परवानगी दिली आहे. पण तुम्हालाही कायद्याच्या नियमांचा आदर करावा लागेल.

मराठा आंदोलकांनी वाहने नाही काढले तर दंड

मराठा आंदोलकांना तीन वाजेपर्यंत मुंबई खाली करण्याचे आदेश कोर्टाने दिल्यानंतर पोलीस ऍक्शन मोड वरती आले आहेत मराठा आंदोलकानी वाहने न हलविल्यास आहे वाहनांना वर दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी सूचना देत दंडात्मक कारवाईची सुरुवात करण्यात येत आहेत.

Maratha Aarakshan: मराठा आरक्षण आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न

मुंबई मधील मराठा समाजाचे आंदोलन बदनाम होण्यासाठी आमदार रोहित पवार जबाबदार असल्याचा आरोप मराठा ठोक मोर्चाचे समन्वयक संदीप गीड्डे पाटील यांनी केला आहे. मराठा समाजाने जगाला शिस्त दाखवणारे 58 मोर्चे शांततेत काढले. त्याचे कौतुक झाले. पण आता मुंबई मध्ये गेल्यानंतर त्याला वेगळे वळण लागले आहे. जे प्रकार सुरू आहेत. त्याला फक्त आमदार रोहित पवार जबाबदार आहेत असा आरोप गीड्डे पाटील यांनी केला आहे.

मनोज दादा जरांगे यांच्या आरोग्याची सरकारने काळजी घ्यावी ; बजरंग सोनवणे यांची मुख्यमंत्र्यांनी मागणी

मराठा समाजासाठी गेली अनेक वर्षे सातत्याने आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र लढा देणारे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज दादा जरांगे पाटील यांचे आरोग्य आणि जीवित सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. राज्य सरकारने मागण्यावर आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा मागणीचे पत्र बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडनवीस यांना पाठवले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उद्या बीड जिल्हा कडकडीत बंदची हाक

आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील हे टोकाचे उपोषण करत असून त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून सरकार दुर्लक्ष करत आहे या पार्श्वभूमीवर उद्या बीड जिल्हा बंदची हाक मराठा समाज बांधवांकडून घेण्यात आली आहे बीड बंद चे बॅनर सोशल मध्यमानवर बॅनर पाहायला मिळत आहेत उद्या बीड जिल्हा कडकडीत बंद ठेवून मनोज रंगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यात येणार आहे.

Udayanraje Bhosale: शासनाने लवकरात लवकर यावर आंदोलनावर तोडगा काढावा;  उदयनराजे भोसले यांची सरकारला विनंती

माझ्या पोटात असतं तेच माझ्या ओठात असतं जे योग्य आहे तेच मी योग्य म्हणत असतो, माझी प्रकृती बरी नाहीये म्हणून मी आरक्षणाच्या ठिकाणी जाऊ शकत नाही या आधी मी अंतरवालीला गेलो होतो . शासनाने लवकरात लवकर यावर आंदोलनावर तोडगा काढावा. जे आंदोलन करतायेत त्यांच्या प्रमुखांसोबत बोलून लवकरात लवकर मार्ग काढावा. मला कालच डिस्चार्ज मिळालाय यामुळे मी तिथे येऊ शकत नाही माझ मुख्यमंत्री यांच्या सोबत अजून बोलणं झाल नाही मात्र माध्यमांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना विनंती आहे आंदोलन कर्त्यांसोबत बसुन काय तोडगा काढता येईल हे पाहावं.

मनोज जरांगे यांनी तब्बेतीची काळजी घ्यावी, असं आवाहन उदयनराजे यांनी केलं आहे.

मराठा आंदोलकांच्या घोषणा, मुंबई पोलिस अ‍ॅक्शन मोडवर

मनोज जरांगेंना दुपारी ३ वाजेपर्यंत मुंबई सोडण्याचे कोर्टाने आदेश दिले आहेत. त्यानंतर आता पोलिस अॅक्शन मोडवर आले आहेत.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान सोडावं लागणार, कोर्टाचे आदेश

हे काय आहे? तुमच्या अर्जावर काही आदेश येईल या अपेक्षेने, तुम्ही तिथे बसू शकत नाही. तुम्हाला ताबडतोब निघून जावे लागेल. हे बेकायदेशीर आहे. आज दुपारी ३ नंतर, कोणीही तिथे बसणार नाही, याची खात्री करू. गरज पडल्यास, आम्ही एखाद्याला पाठवू किंवा आम्ही स्वतः रस्ते आणि घटनास्थळाला भेट देऊन सर्वजण निघून गेले आहेत का? ते तपासू- असं कोर्टाने म्हटलं आहे. कोर्टाने मनोज जरांगे पाटील यांनी दुपारी ३ वाजेपर्यंत मुंबईत सोडण्याचे आदेश दिले आहेत.

आम्ही राज्य सरकारवरही समाधानी नाही- उच्च न्यायालय

आम्ही राज्य सरकारवरही समाधानी नाही. सरकार काय करत होते, याबाबतही आम्हाला जाणून घ्यायचे आहे. तुमचे निदर्शक या न्यायालयाच्या न्यायाधीशांना रस्त्यावरून चालत त्यांच्या न्यायालयात पोहोचण्यासाठी आणि कामकाज चालवण्यास कसे भाग पाडू शकतात? तुमचे निदर्शक रस्त्यावर नाचत होते म्हणून तुम्ही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना असे चालण्यास भाग पाडू शकत नाही. उल्लेखनीय म्हणजे, न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांना काल उच्च न्यायालयाकडे चालत जावे लागले, जेव्हा त्यांनी त्याच प्रकरणात विशेष सुनावणी घेतली.

न्यायमूर्तींनी राज्य सरकारला झापलं, ३ वाजेपर्यंतची वेळ, कोर्टात नेमकं काय काय झालं?

कोर्टाच्या आदेशानंतर राज्य सरकारने काय पावलं उचलली ? तुम्ही अनाउन्सम्ंट केल्या का ? मुंबई विमानतळापासून ते मुख्य शहरापर्यंत रस्त्यांवर गर्दी आहे… जाम आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व रिकमं करा. त्यासाठी तुम्ही आतापर्यंत काय पावले उचलली, पुढे काय पावले उचलणार आहात? याबाबतचा सवाल कोर्टाने राज्य सरकारला विचारला आहे.

.... अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून काम करू, कोर्टाचा गंभीर इशारा

आज दुपारी ३ वाजेपर्यंत जागा खाली करा आणि आम्हाला कळवा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून काम करु, असा गंभीर इशारा कोर्टाने दिला आहे. कोर्टात जे सादर केलेलं आहे ते आम्ही पाहिलं, जे धक्कादायक आहे. यामुळे लोक घराबाहेर पडत नाहीत, असे न्यायमूर्ती म्हणाले.

हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे - न्यायमूर्ती

हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. आंदोलकांनी तात्काळ जागा रिकामी करावी. आंदोलन पूर्णपणे बेकायदा आहे. मुंबईतील परिस्थिती सहन करण्यासारखं नाही, असे कोर्टाने म्हटले आहे.

कोर्टाकडून राज्य सरकारला ३ वाजेपर्यंतचा वेळ

कोर्टाकडून राज्य सरकारला ३ वाजेपर्यंतचा वेळ

मुंबईतील आंदोलकांवर काय कारवाई केली? यापुढे तूम्ही काय कऱणार आहात? राज्य सरकारने कोणती चर्चा केली? काय निर्णय घेतला आहे? असा सवाल कोर्टाने राज्य सरकारला विचारला आहे. राज्य सरकारला यासाठी तीन वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे. तीन वाजेपर्यंत कोणती कारवाई केला जातेय? त्याचा पूर्ण आढावा आम्हाला द्या, असा आदेश कोर्टाने दिला आहे.

अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल - न्यायमूर्ती

हे फारच गंभीर आहे. राज्य सरकारकडून देखील काही त्रुटी झाल्या का ? मुंबईत जी परिस्थिती निर्माण झाली ती सहन करण्यासारखी नाही. आंदोलकांनी तात्काळ जागा रिकामी करावी, अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल, असे कोर्टाने ठणकावले.

आंदोलनात फक्त ५ हजार जण असतील

मुंबईमधील आझाद मैदानात फक्त ५ हजार आंदोलक असायला हवेत. ५० हजार किंवा एक लाख आंदोलक असू नये. आंदोलनात फक्त ५ हजार जण असतील, अशी प्रेस नोट काढली आहे, असा सवाल कोर्टाने विचारला.

मराठा आंदोलकांचा कोर्टात माफीनामा

मराठा आरक्षणाबाबत कोर्टात सुनावणीला सुरूवात झाली आहे. मराठी आंदोलकांच्या वतीने ॲड सतीश माने शिंदे बाजू मांडत आहेत. काही लोकांकडून त्रास होत आहे. त्यासाठी आम्ही माफी मागतो, असे म्हणाले. काहींमुळे त्रास होत असेल तर माफी मागतो.

जालन्यातून जवळपास दहा क्विंटलच्या भाकरी घेऊन मराठा बांधव मुंबईकडे रवाना....

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईच्या आझाद मैदानावरती आमरण उपोषण सुरू आहे. आज त्यांच्या आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे. दरम्यान जालन्यातील धनगर पिंपरी गावातील शेकडो मराठा बांधव भाजी भाकरी घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. जवळपास दहा क्विंटलच्या भाकरी घेऊन हे मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघालेत. शासनाला केव्हा जाग येईल माहित नाही मात्र आमचे बांधव मुंबई येथे उपाशी राहू नये म्हणून आम्ही गावातून भाजी भाकरी घेऊन मुंबईकडे जात असल्याची प्रतिक्रिया मराठा बांधवांनी दिली आहे त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी...

राहुरी येथे मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन...

नगर - मनमाड महामार्गावर एक तास रास्ता रोको...

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा देत मराठा बांधव उतरले रस्त्यावर...

आरक्षणाच्या मागणीसाठी

राहुरी कृषी बाजार समीतीसमोर विविध पक्ष आणि संघटनेचे कार्यकर्ते तसेच नागरीकांचा रास्ता रोको...

प्रशासनाला मागणीचे निवेदन देत आंदोलन मागे...

एक तास चाललेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी...

पुण्यात मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण

पुण्यात मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण

स्वारगेट चौकात केला जात आहे लाक्षणिक उपोषण

मुंबईत मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण मागणीसाठी लाक्षणिक उपोषण सुरू आहे

पुण्यात अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर वतीने आरक्षणासाठी पाठिंबा देण्यासाठी एक दिवस लाक्षणिक उपोषण केले जात आहे

चांदूरबाजार पोलिसात तक्रार प्रहारच्या चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल...

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघाचा विकास निधी मोर्शी मतदारसंघात वळवल्याचे प्रकरण....

चांदूरबाजार पोलिसात तक्रार प्रहारच्या चौघां विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल...

अचलपूरचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांची बदनामी करण्यासाठी बनावट दस्तावेज बनवल्याचा आरोप...

बनावट दस्तावेज तयार करून ते प्रिंट मीडिया व सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा ठपका ठेवत प्रहारच्या चार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल..

प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केला होता आमदार प्रवीण तायडे यांच्यावर निधी वळवण्याचा आरोप..

तर आमदार प्रवीण तायडे यांनी ही केला होता बच्चू कडू यांच्यावर निधी वळवण्याचा आरोप...

सध्या अचलपूर मतदार संघात भाजप आणि प्रहार निधी वळवणावरून आमने-सामने..

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत नायगाव शहर कडकडीत बंद

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आज नांदेडच्या नायगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.सकाळपासून व्यापाऱ्यांनी शहरातील सर्व प्रतिष्ठान बंद ठेवली आहेत.मराठा समाज बांधवांच्या वतीने रस्त्यावर उतरून एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी देखील करण्यात आलीय.मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी यावेळी मराठा बांधवांनी केली आहे.जरांगे पाटलांची तब्येत खालावली आहे. सरकार दखल घेत नाही.त्यामुळे मराठा आंदोलकांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे.

Nanded: नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातून शेकडो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना

मनोज जरांगे पाटील यांचे मुंबई येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. जरांगे पाटील यांना नांदेड जिल्ह्यातून मोठा पाठिंबा मिळत आहे.नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातून आज शेकडो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मुंबईमध्ये अन्नपाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून सोबत पाच हजार भाकरी आणि चटणी सोबत घेऊन हे मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.नांदेड जिल्ह्यातील इतर तालुक्यातून देखील मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. आरक्षण घेतल्याशिवाय माघार फिरणार नाही असा निर्धार या मराठा बांधवांनी केला आहे.

Nashik: नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा आणि ओबीसी बांधव एकत्र

- मराठा बांधव मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात

- मुंबईतील मराठा आंदोलनात समाजकंटक घुसवून आंदोलनाला बदनाम केलं जातंय, राज्यपालांनी याची चौकशी करावी

- मराठा बांधवांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

- तर ओबीसी बांधव ओबीसींमधून मराठ्यांना आरक्षण नको, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात

- ओबीसींचं आरक्षण वाचवण्यासाठी भुजबळ समर्थक ओबीसी बांधवांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Maratha Andolan: मराठा आंदोलकांनी नगर मनमाड महामार्ग अडवला...

मनोज जरांगे यांच्या समर्थनात आंदोलन...

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात रास्तारोको आंदोलन...

सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह मराठा बांधव आंदोलनात सहभागी...

हातात भगवे झेंडे आणि डोक्यावर भगव्या टोप्या घालून आंदोलक रस्त्यावर...

आंदोलनामुळे नगर मनमाड महामार्गावरची वाहतूक ठप्प...

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात...

वाशी रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त

वाशी रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त

कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सिडको एक्जीबिशन मध्ये मराठा बांधवांचा वास्तव

मराठा बांधवांनी ट्रेन रोकू नये किंवा रुळावर खाली जाऊ नये याच दृष्टीने पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

बीड जिल्ह्यात मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेला वेग आलाय. ज्या आंदोलनामध्ये पाच लाख रुपयांपेक्षा कमी नुकसान झाले आहे. त्या गुन्ह्यांची प्रकरणे मागे घेतली जाणार आहेत. बीड जिल्ह्यात या गुन्ह्यांबाबत आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी सर्व उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना दिले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मनात कटुता नाही, त्यांनी फक्त आमच्या मागण्या मान्य कराव्यात- मनोज जरांगे पाटील

देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल आमच्या मनात कटुता नाही, त्यांनी फक्त आमच्या मागण्या मान्य कराव्यात- मनोज जरांगे पाटील

फडणवीस खोटारडा, कुटील डाव खेळायला लागला- मनोज जरांगे पाटील

सरकारला नासकी सवय लागली आहे. उल्लंघन केले नाही केले, तरी तसेच म्हणायचे. इथे पाच हजार लोकं आहे. इथे बसू नका म्हणाल्यावर ते कुठे थांबणार.. ते थोडं इकडे तिकडे फिरणारच.. तुम्ही ज्या जागेवर सांगितलं, त्या जागेवर लोकं आहे. रस्त्यावर गाड्या नाहीत. सीएसएमटी, बीएमसी रिकामी केली. कोणतं उल्लंघन केलेय. फडणवीस यांनी अन्यायकारक वागू नये. न्यायदेवतेला खोटी माहिती देतो, म्हणून हे होतेय. फडणवीस खोटारडा, कुटील डाव खेळायला लागला. कोर्टात खोटी माहिती देऊन फडणवीस आमच्यावर मराठ्यावर अन्याय करतो, दुष्परिणाम फडणवीसांना भोगावे लागतील. आम्ही काहीच करत नाही.

मेलो तरी आझाद मैदानातून हटणार नाही,काय व्हायचे ते होऊ दे- मनोज जरांगे पाटील

मेलो तर आझाद मैदानातून हटणार नाही. काय व्हायचे ते होऊ दे. त्याचे दुष्परीणाम ते जाणो अन् मराठे जाणो.

कुठल्याही स्तराला गेला तर मी कोणत्याही टोकाला जायला तयार. पण मी मागण्या अंबलबाजवणी घेतल्याशिवाय हटणार नाही. मराठे काय असतात हे ३५० वर्षानंतर पुन्हा पाहायचे असेल तर त्याला माझा नाईलाज आहे. मी मरोपर्यंत हटणार नाही.

मराठ्यांना शेवटचे सांगतो. गाड्या पार्गिंकला लावा. मैदानात लावा.. रेल्वे, एसटीने प्रवास करा.. कुठे लावू देत नसेल तर वाशीला लावा अन् रेल्वेने या.. माझी तब्येत कितीही खराब झाली तरी शांतच राहायचे, वेड्यासारखे करायचे नाही. तुम्हाला माझी मया आहे, मला तुमची मया आहे. कितीही त्रास झाला तरी शांत राहायचे. मी मेल्याच्या नंतरही तुम्ही शांत राहा.. त्यानंतर तुम्ही काय करायचे ते करा.. पण माझं म्हणणं आहे, ही लढाई शांततेत लढायची अन् जिंकायची. मी मरेपर्यंत हटणार नाही, हे देवेंद्र फडणवीस यांना ठासून सांगतोय. फक्त कारणं करू नका. कोर्टाच्या नियमाचे पोरांनी पालन करावे. न्यायदेवता आपल्यासाठी आहे, आपला आधार आहे. कोर्टाकडून आपल्याला परवानगी मिळेल, आपल्या बाजूने उभे राहील. आपल्या वेदनेत सहभागी होईल, आपल्यावर अन्याय करणार नाही.

उगीच मुंबईतून हाकलून देऊ, हे थांबवा- मनोज जरांगे पाटील

तुम्ही ज्याच्या जिवावर बोलता, त्यापेक्षा आमची संख्या साडे नऊ पट जास्त आहे. जिकडे नाही घुसायचे तिकडे घुसू नका. उगीच मुंबईतून हाकलून देऊ, हे थांबवा. गोर गरीबांना न्याय कसा द्यायचा ते काम करा.

अपमान केला तर त्यांच्या बदला घेण्याची चीड होईल- मनोज जरांगे पाटलांचा फडणवीसांना इशारा

मराठ्यांना इथून काढून देणं, ही काळजात रूतणारी सल आहे. तुम्ही काहीही निमित्त काढून आझाद मैदानातून उसकवून देतात. हे तुम्हाला महागात पडेल. तुम्ही पोलिसांना सांगून अटक करायला लावाल, लाठीचार्ज करायला लावाल तर तेही तुमच्यासाठी हे अति घातक असेल. भविष्यात तुम्हाला खूप मोठा धाक असेल. तुमच्याही लोकांना महाराष्ट्रात यायचेय.

आम्ही मुंबईत आलो म्हणून मारहाण करायला लावली. तुमच्यानेत्यांना महाराष्ट्रात यायचेय. हे लक्षात ठेवा. आम्ही आणखी शांत आहे. शांततेत मार्ग काढून मराठ्यांचा प्रश्न सोडून सन्मान करा. त्यांना पोलिसांच्या हातून अपमान करून त्यांचा अपमान करू नका. त्यांचा सन्मान केला तर हे गरीब लोकं तुम्हाला कधी विसरणार नाहीत. पण अपमान केला तर त्यांच्या डोक्यात अपमानाचा बदला घेण्याची चीड होईल. त्यामुळे गोडीत करा.

तुम्ही कितीही आम्हाला भीती दाखवा आम्ही भीत नाही- मनोज जरांगे पाटील

तुम्ही कितीही आम्हाला भीती दाखवा आम्ही भीत नाही

आम्ही शांत आहोत, शांत राहू द्या

आणखी मराठे येणार आहेत

शनिवरी रविवारी मराठे येणार आहेत

आम्ही शांततामय मार्गाने दोन वर्षांपासून आंदोलन करतोय- मनोज जरांगे पाटील

आम्ही आजपासून नाही तर २२ वर्षांपासून कायद्याच्या चौकटीत राहून न्यायालयाचे नियम पाळून आंदोलन करतोय

आम्ही शांततामय मार्गाने दोन वर्षांपासून आंदोलन करतोय

सिडको एक्जीबिशन मध्ये मराठा बांधवांच्या राहण्याची व्यवस्था

सिडको एक्जीबिशन मध्ये मराठा बांधवांचे राहण्याची व्यवस्था

हे दृश्य आहे सिडको एक्जीबिशन मधलं

क्षणभर विश्रांती घेण्यासाठी मराठा बांधव सिडको एक्जीबिशनमध्ये

दिवसभर मध्ये आझाद मैदानामध्ये हजेरी रात्री मुक्काम वाशी इथे

Nashik: नाशिक शहरात आजपासून गणपती देखावा पाहण्यासाठी रात्री बारापर्यंत परवानगी

- आजपासून नागरिकांना रात्री उशिरापर्यंत गणपती देखावे पाहता येणार

- शेवटचे पाच दिवस गणपती देखावे रात्री बारापर्यंत सुरू ठेवण्याची सार्वजनिक गणेश मंडळांची होती मागणी

- गर्दी होण्याच्या मार्गावर काही ठिकाणी वाहतुकीत देखील बदल

- गणेशोत्सवातील शेवटच्या पाच दिवसात देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याचा अंदाज

अकलूजमध्ये ऑपरेशन सिंदूरचा देखावा

अकलूज येथील गणेश भक्त रणवीर खडके यांनी आपल्या घरच्या गणपती समोर ऑपरेशन सिंदूरचा देखावा साकारला आहे. यातून भारतीय सैनिकांचा पराक्रम आणि त्यांचे शौर्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

पहलगाम हलल्यानंतर भारतीय सैनिकांनी पाकिस्तानवर हल्ला करून बदला घेतला होता. यंदा गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपल्या घरातच आॅफरेशन सिंदूरचा देखावा साकारला आहे. त्यांचा देखावा पाहण्यासाठी अकलूजकरांनी गर्दी केली आहे.

मराठा आंदोलकांसाठी रेल्वे प्रशासनाकडून महत्वाच्या सूचना

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकात मराठा आंदोलकांसाठी रेल्वे प्रशासनाकडून महत्वाच्या सूचना

सर्व मराठा बांधवांनी आपल्या मागण्या शांततेत तसेच लोकशाही पद्धतीने पूर्ण कराव्या

मराठा आंदोलकांनी वयोवृद्ध, दिव्यांग प्रवाशांसाठी अडचण होणार नाही त्रास होणार नाही याची दक्षता घेत मार्ग मोकळा करून द्यावा

आझाद मैदानाकडे जाण्यासाठी जाणाऱ्या भुयारी मार्गाचा वापर करावा

महिलांच्या डब्यातून तसेच राखीव डब्यातून मराठा बांधवांनी प्रवास करू नये अशा सूचना रेल्वे स्थानकात रेल्वे प्रशासन करण्यात येत आहे.

चिखलीत 'बॅनर वॉर'.. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसह १४ जणांवर गुन्हे

राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत सध्या 'बॅनर वॉर' रंगला आहे.. 'मी धावतो व्होटचोरी रोखण्यासाठी' या उपक्रमाअंतर्गत काँग्रेसतर्फे आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी लागलेले बॅनर याला कारणीभूत ठरले आहेत.. या बॅनरला प्रत्युत्तर देणारे बॅनर विरोधकांनी विशिष्ट शैलीत लावल्याने वाद निर्माण झाला.. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सकाळी हे बॅनर पाहताच संताप व्यक्त करून बॅनर फाडले .. परिणामी, प्रकरण फक्त बॅनरबाजीत मर्यादित न राहता थेट पोलिसांत गेले असून, काँग्रेस चे माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यासह १४ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत

पुण्याहून राजगड तालुक्याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची प्रचंड दुरावस्था

रस्त्याच्या झालेल्या दुरावास्थेवरून राजगड तालुक्यातील मनसे आक्रमक, खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत केले आंदोलन

चेलाडी ते राजगड पर्यंत 30 किलोमीटरच्या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत केला निषेध व्यक्त 

यावेळी निषेधाचे फलक हातात घेऊन, प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.

गेल्या अनेक वर्षांपासून राजगड रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालीय, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेक तरुणांना आपले जीव गमवावे लागलेत.

वारंवार मागणी करूनही प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्याने मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले

रस्त्यांची अवस्था बघून युनेस्कोने राजगड किल्ल्याला दिलेला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा काढून घेईल अशी संतापजनक प्रतिक्रिया देत मनसे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केलीय.

उमरगा येथे गौरी-महालक्ष्मीसमोर १२ ज्योतिर्लिंगांचा देखावा;महिलांची मोठी गर्दी

धाराशिव च्या उमरगा शहरात गौरी-महालक्ष्मी उत्सव मोठ्या श्रद्धा, भक्ती आणि उत्साहात साजरा होत आहे.या पार्श्वभूमीवर शहरातील वेदपाठक कुटुंबियांच्या घरी यंदा विशेष आकर्षण ठरले आहे ते म्हणजे १२ ज्योतिर्लिंगांचा देखावा.हा देखावा पाहण्यासाठी महिलांसह भाविकांची मोठी गर्दी उसळली असून,प्रत्येकाने या अद्वितीय कलाकृतीचे कौतुक केले. गौरी-महालक्ष्मी उत्सवात दरवर्षी विविध प्रकारचे धार्मिक देखावे साकारले जातात.मात्र,या वर्षी वेदपाठक कुटुंबाने विशेष परिश्रम घेऊन १२ ज्योतिर्लिंगांची अप्रतिम प्रतिकृती तयार केली आहे. भाविकांना एकाच छताखाली भारतातील पवित्र १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्याची संधी मिळाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.

ओबीसी आरक्षणातील घुसखोरी आणि बनावट जात प्रमाणपत्रांविरुद्ध उपोषण सुरू

ओबीसी आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या बनावट जात प्रमाणपत्र धारकांवर कारवाई करण्यात यावी, तसेच ओबीसी आरक्षणातील घुसखोरी थांबवावी, या मागणीसाठी डॉ. प्रवीण तायडे यांनी सिंदखेड राजा येथे उपोषण सुरू केले आहे .. डॉ तायडे यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे .. ओबीसी समाजाला त्यांचे हक्क मिळावेत आणि या घुसखोरीला आळा बसावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.. राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी इतर समाजातील लोक बनावट जात प्रमाणपत्रांचा वापर करत आहेत.. यामुळे खऱ्या ओबीसी समाजातील पात्र विद्यार्थी आणि तरुणांचे हक्क हिरावले जात आहेत.. यामुळे ओबीसी समाजात मोठ्या प्रमाणात असंतोष वाढला आहे.. या उपोषणाद्वारे डॉ. तायडे यांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे...

सोन्याच्या भावात पुन्हा ११०० रुपयांची वाढ

जळगाव, येथील सुवर्णबाजारात सोने, चांदीचा भावाला दर दिवसाआड झळाळी येत आहे. सोन्याच्या भावात एक हजार १०० रुपयांची (प्रतिदहा ग्रॅम), तर चांदीच्या तीन हजारांनी प्रतिकिलोमागे वाढ झाली. सोने, चांदीतील या उच्चाकांने गुंतवणूकदार हैराण झाले आहेत. अमेरिकेने आयात शुल्कात वाढ जाहीर केल्यानंतर सोने आणि चांदीच्या बाजारपेठेत मोठी वाढ सातत्याने होत आहे. या निर्णयामुळे गुंतवणुकदारांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्या-चांदीकडे वळण्याची प्रवृत्ती वाढली आहे. परिणामी, या धातूंच्या किमती सातत्याने वाढताना दिसत आहेत. शनिवारी सोन्याचा भाव एक लाख तीन हजार ५०० रुपये (प्रतिदहा ग्रॅम) विना जीएसटी होता. सोमवारी त्यात ११०० रुपयांची वाढ होऊन सोने एक लाख चार हजार ६०० रुपये (प्रतिदहा ग्रॅम) विना जीएसटी आहे. चांदीचा शनिवारी एक लाख २१ हजार प्रतिकिलो विना जीएसटी भाव होता. सोमवारी चांदी एक लाख २४ हजार पोहोचली आहे.

nashik-malegaon-आंदोलकांसाठी एक ट्रक किरणा मालेगाव मधून पाठविण्यात आला

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या उपोषण आंदोलनस्थळी राज्य भरातून आंदोलक पोहचत असल्याने त्यांच्या जेवण्याची गैरसोय हेऊन नये या साठी नाशिकच्या मालेगाव तालूक्यातील मराठा क्रांती मोर्चा तर्फ जमा करण्यात आला असून डाळी,तांदूळ,तेल कांदे बटाटे,पाणी बॉटल,बिस्किटपुडे यासह अन्य किराणा माल मुंबई येथे पाठविण्यात आला आहे.

कळंब तालुक्यातील मोहा येथे गौरी-लक्ष्मी देखाव्यात आझाद मैदानातील आरक्षण आंदोलनाचे प्रतिबिंब

मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाला राज्यभरातून मोठा जनसमर्थन मिळत आहे.या लढ्याला पाठींबा देण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक देखील आपापल्या पद्धतीने सहभाग नोंदवत आहेत.मोहा येथील अमोल मडके यांच्या घरी गौरी-लक्ष्मीच्या देखाव्यामध्ये या आंदोलनाचे वास्तव चित्रण करण्यात आलय.विशेष म्हणजे, मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेल्या आरक्षण लढ्याचे प्रतिकात्मक दृश्य साकारून समाजभावना जागृत करण्याचा अनोखा प्रयत्न करण्यात आलाय.यात उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील,त्यांना मिळणारे लोकसमर्थन, तळ ठोकून बसलेले आंदोलक, तसेच गावागावातून पाठिंबा दर्शविणारे नागरिक अशा दृश्यांचे हुबेहूब दर्शन घडविण्यात आले.

सोलापूर ग्रामीणनंतर सोलापूर शहरात देखील डॉल्बी बंदीचे आदेश

गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद उत्सवानिमित्ताने निघणाऱ्या मिरवणुकीत डॉल्बी वापरण्यास पोलिसांनी केली बंदी

सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पाठोपाठ पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी शहरात देखील डॉल्बी बंदीचे दिले आदेश

1 ते 7 सप्टेंबर पर्यंत सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आणि ईद-ए-मिलाद कमिटी यांचेकडून आयोजीत मिरवणूकीमध्ये डॉल्वी सिस्टीमचा वापर करणेस बंदी

मागील काही दिवसापासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात डॉल्बीच्या वापरावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी सोलापूरकरांच्या वतीने करण्यात येतं होती

यासाठी विविध आंदोलन, मोर्चे, सह्याची मोहीम इत्यादी गोष्टी सोलापूरकरांनी केलेल्या होत्या

या सर्व चळवळीला आता यश आल असून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात डॉल्बीच्या वापरावर बंदी करण्यात आलीय

कळंब रोड रेल्वे स्टेशनवर मिळणार नांदेड - पंढरपूर एक्सप्रेस रेल्वेला थांबा

धाराशिव जिल्ह्यातील कळंब रोड रेल्वे स्टेशनवर दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड पंढरपूर एक्सप्रेस रेल्वेला थांबा मंजूर करण्यात आला आहे.रेल्वे प्रशासनाने या थांब्याला प्रायोगिक तत्त्वावर मान्यता दिली आहे अशी माहिती धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे.कळंब रोड रेल्वे स्टेशनवर थांबा मिळावा म्हणून खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पाठपुरावा केला होता.या निर्णयामुळे कळंब तालुक्यातील प्रवाशांची दिर्घकाळीन मागणी अखेर पूर्ण झाली आहे.रेल्वे बोर्डाने ११ ऑगस्ट रोजी अधिकृत आदेश काढून ही मान्यता दिली आहे.लवकरच अंमलबजावणी होणार आहे या थांबल्यामुळे पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.

मुंबई येथे आंदोलनासाठी जाणाऱ्या काही गाड्या ठाण्यातून मुंबईच्या दिशेने जात असतानान अडवण्यात आल्या आहेत. त्यांना वाशी येथून मुंबईला जाण्यास सांगण्यात आले आहे.

आझाद मैदान परिसरात यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता

आझाद मैदान आणि परिसरात स्वच्छता लवकरात लवकर व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे.

या कामासाठी स्किड स्टिअर लोडर म्हणजेच बॅाबकॅटद्वारे स्वच्छता करण्यात येत आहे.

या यंत्राद्वारे थेट कॉम्पॅक्टर्समध्ये कचरा भरण्यात येत आहे. दोन मिनी कॉम्पॅक्टर्स आणि एक लार्ज कॉम्पॅक्टरचा यासाठी वापर केला जात आहे. लवकरात लवकर या परिसरात स्वच्छता करून परिस्थिती पूर्ववपदावर आणण्यासाठी महानगरपालिकेचे प्रयत्न आहेत.

मुंबईतल्या रस्त्यांवर फुटपात वर मोर्चेकरी क्षणभर विश्रांती

आम्हाला झोपायला जागा नाही आमचा बाप झोपला नाही आम्ही झोपायचा कसा असावा मोर्चेकरी व्यक्त करत आहेत मुंबईतील रस्त्यांवर फूटपाथवर क्षणभर विश्रांती मोर्चेकरी घेत आहेत आजूबाजूला घाणीचे साम्राज्य निर्माण झालाय

Manoj jarange patil protest live updates :

बुधवारी मराठा आंदोलकर्ते ची सांख्य मुंबईत प्रचंड वाढताना दिसेल

आज गौरी गणपती चे विसर्जन होणार आहे.....

आज विसर्जनानंतर मराठा आंदोलकर्ते मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना होणार ...

गावच्या गाव खाली होतील व जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी मुंबईत धडकतील ...

खासकरून महिला वर्ग मोठ्या प्रमाणत येण्याची शक्यता ...

मराठा आंदोलकर्ते मोठ्या संख्येने आपल्या गावातून निघणार.

Manoj jarange patil protest live updates: जरांगे पाटलांना भेटण्यासाठी आंदोलकांनी केली गर्दी

- मनोज जरांगे पाटलांना भेटण्यासाठी आंदोलकांनी केली गर्दी

- भेटण्यासाठी लावलीये रांग

- आझाद मैदान परिसरात सकाळच्या सुमारास आंदोलकांची मोठी गर्दी

जिल्ह्यातील नुकसानीची आकडेवारी आली पुढे,कापूस सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान

हिंगोली जिल्ह्यात मागील महिनाभरात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची आकडेवारी जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार 58 हजार हेक्टर वरील सोयाबीन ,कापूस पिकांचे नुकसान झाले आहे तर हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या हळदीला देखील अतिवृष्टीने मोठी बाधा झाली आहे आतापर्यंत जिल्ह्यात 40 पेक्षा अधिक शेतकऱ्यांची दुधाळ व शेतकामं करणारी जनावरे वाहून गेली आहेत यामध्ये एका शेतकऱ्यांसह इतर दोन दोघांचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्याहून राजगड तालुक्याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची प्रचंड दुरावस्था

रस्त्याच्या झालेल्या दुरावास्थेवरून राजगड तालुक्यातील मनसे आक्रमक, खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत केले आंदोलन

चेलाडी ते राजगड पर्यंत 30 किलोमीटरच्या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत केला निषेध व्यक्त

यावेळी निषेधाचे फलक हातात घेऊन, प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.

गेल्या अनेक वर्षांपासून राजगड रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालीय, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेक तरुणांना आपले जीव गमवावे लागलेत.

वारंवार मागणी करूनही प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्याने मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले

रस्त्यांची अवस्था बघून युनेस्कोने राजगड किल्ल्याला दिलेला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा काढून घेईल अशी संतापजनक प्रतिक्रिया देत मनसे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केलीय.

पुण्यात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस

जून, जुलै, ऑगस्ट तीन महिन्यांत ५३२.४ मिलिमीटर पाऊस

पुणे शहरात पावसाला सलग दुसऱ्या महिन्यात,ऑगस्ट महिन्याची सरासरी गाठता आली नाही.

गेल्या आठवड्यात शहरात पावसाने सर्वदूर हजेरी लावली असली, तरी महिनाभरातील इतर दिवस पावसाने विश्रांती घेतली.

त्यामुळे सरासरीपेक्षा १० मिलिमीटर कमी १३६.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुणे शहरात जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांत ५३२.४ मिलिमीटर पाऊस पडला आहे.

मे महिन्यापासूनच यंदा जिल्ह्यात, धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकरी वर्ग खूश असला, तरी शहरात मात्र जून वगळता जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण घटले आहे. पुण्यात जूनमध्ये

ऑगस्ट महिन्यात पहिले १० दिवस पावसाने ओढ दिली होती. तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली. ऊन, अधूनमधून ढगाळ वातावरण, विश्रांतीनंतर बरसणाऱ्या हलक्या सरी असे चित्र

आज आणि उद्या दोन दिवस शहरात आकाश दिवसभर ढगाळ राहणार आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात हलक्या सरींची आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.

पुण्यात ताडीवाला रोडच्या पाठीमागे असणाऱ्या नदीमध्ये एक व्यक्ती तीन दिवसापुर्वी बुडाला होता.

अग्निशमन दलाकडून नायडू, येरवडा, खराडी व अग्निशमन मुख्यालय येथील वाहने दाखल होत जवानांनी बोटीच्या साह्याने शोधकार्य घेत होते.

काल दुपारी साडेचार वाजता सदर मृतदेह मुंढवा पुलानजीक दिसून येताच पाण्याबाहेर काढला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

ताडीवाला रोड उल्हासनगर पुणे या ठिकाणी मुळा मुठा नदी ताडीवाला रोड नदीपात्रात राहुल सूर्यकांत हावडे वय वर्ष अंदाजे 24 ही व्यक्ती सदर पोहण्यासाठी गेली असता नदी पत्रा मध्ये बुडाली होती

खल झाल्या नदीपात्रामध्ये बोटीच्या साह्याने शोध घेत असताना तीन दिवसानंतर मृतदेह आढळून आला.

याचा अधिक तपास पोलीस करत आहेत

राज्याच्या नव्या ऊस गाळप हंगामासाठी परवाना देण्याची प्रक्रिया सुरू

मागील थकित एफआरपीची पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना दिली नसल्यास परवाना मिळणार नाही,

साखर आयुक्तालयाकडून स्पष्ट निर्देश

राज्यातील साखर कारखान्यांकडे कोट्यावधी रुपयांची थकीत एफआरपी.

त्यामुळे आता नव्याने साखर कारखाने सुरू करताना थकीत रक्कम असेल तर परवाना दिला जाणार नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : घटस्थापनेच्या दिवशी अघटित घडलं! देवीच्या उत्साहात तल्लीन असलेल्या पाच तरुणांवर जीवघेणा हल्ला

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीस उद्या पुरग्रस्त भागाची पाहणी करणार

Katrina Kaif Pregnancy: कतरिना-विकीच्या घरी येणार नवा पाहुणा; क्यूट स्टाईलमध्ये दिली गुड न्यूज

Dharashiv : पुरात कुटुंब अडकलं, ठाकरे सेनेचे खासदार ओमराजे मदतीसाठी पाण्यात | पाहा VIDEO

Name Astrology: नाव सांगतं तुमचा स्वभाव! V, M, B, H नावांमध्ये लपलेले रहस्य उघड

SCROLL FOR NEXT