Manoj Jarange Patil Maratha Protest saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange : मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाला मिळाली एका दिवसाची मुदतवाढ

Manoj Jarange Patil Maratha Protest : मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदान येथे सुरु असलेल्या आंदोलनाला एका दिवसाची मुदतवाढ मिळाली आहे.

Yash Shirke

Maratha Reservation Protest : मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला सुरुवात केली. या उपोषणाला, मराठा समाजाच्या आंदोलनाला आज (२९ ऑगस्ट) संध्याकाळी सहा वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली. सहा वाजता मराठा आंदोलनाची मुदत वाढवल्याची माहिती समोर आली. अटीशर्थींसह मराठा आंदोलनाला एका दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अशा सर्वच नेत्यांनी मराठा आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी चर्चा करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. कोर्टाने आंदोलनाला दिलेली मुदत संपल्यानंतर आंदोलनाला आणखी एका दिवसाची मुदत देण्यात आली. आता उद्या (२९ ऑगस्ट) उपोषण केले जाणार आहे. सायंकाळी सात वाजता मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल असे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Accident: काळरात्र! नवरात्रीत दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना चिरडले, १२ जणांचा मृत्यू, २९ जखमी

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

SCROLL FOR NEXT