Manoj Jarange Plan For Assembly Election Saam Tv
महाराष्ट्र

Assembly Election: विधानसभेसाठी जरांगेंचा 'मराठा' प्लॅन; जरांगेंना विधानसभेत हवेत 50 आमदार

Manoj Jarange Plan For Assembly Election: मनोज जरांगे यांनी विधानसभेसाठी मराठा कार्ड पुढं केलंय. जरांगेंनी उपोषण सोडताना 50 आमदार विधानसभेत पाठवण्याचा निर्धारच जरांगेंनी केलाय.

Vinod Patil

मनोज जरांगे पाटील यांनी मराठाबहुल मतदारसंघांचं गणितच जरांगेंनी मांडलंय. तर भाजपनंही जरांगेंना सर्व 288 जागा लढवण्याचं खुलं आव्हान दिलंय. विधानसभा निवडणुकीवरून जरांगे आणि भाजपमध्ये कसा सामना रंगलाय पाहूयात स्पेशल रिपोर्ट.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण मागे घेतलं असलं तरी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केल्याचं दिसतंय. जरांगेंनी भाजपच्या उमेदवारांना पाडण्याचं आवाहन केलं असलं आणि स्वत:राजकारणात जाणार नसल्याची घोषणा केली असली तरी 40 ते 50 आमदार विधानसभेत पाठवण्याचा निर्धार केलाय.

राज्यात बहुसंख्य मतदारसंघांमध्ये मराठा बहुल मतदार आहेत. या मतदारांची ताकद दाखवण्याची जरांगेंची रणनीती आहे. मात्र त्यांच्या निशाण्यावर भुजबळ, धनंजय मुंडे आणि गिरीश महाजन हे ओबीसी नेते आहेत. या नेत्यांच्या मतदारसंघांमधल्या मराठा मतांचं गणितच जरांगेंनी मांडलंय. जरांगेंच्या या रणनीतीला भाजपनंही थेट आव्हान दिलंय. 40-50चंच काय तर सगळ्या 288 जागा लढवाव्यावत आणि स्वत: जरांगेंनी विधानसभेत असं आव्हान भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दिलंय.

लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरमुळे मराठवाड्यात महायुतीला मोठा फटका बसला होता. आता जरांगेंचेच उमेदवार विधानसभेच्या मैदानात उतरले तर त्याचा मविआला फटका बसू शकतो. त्यामुळेच की काय जरांगेंनी शिवराळ भाषा वापरली तरी सबुरीची भूमिका घेणा-या भाजपनं निवडणुकीच्या मुद्यावर थेट जरांगेंना खुलं आव्हान दिलंय. त्यामुळे जरांगे विधानसभेच्या मैदानात उतरणार का याबाबत उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT