Manoj Jarange Beed Sabha For Maratha Reservation Got Cancelled Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange Sabha: मोठी बातमी! मनोज जरांगेंची बीडमधील ९०० एकरावरील सभा रद्द; समोर आलं मोठं कारण

Manoj Jarange Patil Beed Sabha Cancelled: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील ८ जूनला बीड जिल्ह्यात जंगी सभा घेणार होते. मात्र, आता जरांगेंची ९०० एकरवरील सभा रद्द करण्यात आली आहे.

Satish Daud

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील ८ जूनला बीड जिल्ह्यात जंगी सभा घेणार होते. तब्बल ९०० एकरावर मनोज जरांगेंची सभा होणार होती. या सभेला मोठ्या संख्येने मराठा बांधव येणार होते. मात्र, आता ही सभा रद्द करण्यात आली आहे. मराठा समन्वयकांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील माहिती दिली आहे.

सभा रद्द करण्याचं त्यांनी मोठं कारणही सांगितलं आहे. सध्या संपूर्ण मराठवाड्यावर दुष्काळाचं संकट आहे. अनेक जिल्ह्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. बीड जिल्ह्यातही भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहेत. त्यातच उन्हाचा कडाका देखील चांगलाच वाढला आहे. ९०० एकरमधील सभेला येणारी गर्दी लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे शक्य होत नाहीये.

उन्हाच्या झळां बसत असल्याने उगाच मराठा बांधवांना त्रास होऊ नये म्हणून ही सभा रद्द करण्यात आली आहे. पुढील बैठकीत सभेची तारीख होणार निश्चित केली जाणार, असंही मराठा समन्वयकांनी सांगितलं आहे.

बीडमध्ये ९०० एकरवर मराठ्यांची ऐतिहासिक सभा

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं होतं. त्याचबरोबर सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी देखील जरांगे यांनी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं होतं.

त्यानंतर विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्यात आलं. मात्र, हे आरक्षण फसवं असल्याचा आरोप जरांगेंनी केला आहे. आम्हाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण हवंय, अशी मागणी जरांगेंनी लावून धरली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर बीडमधील नारायणगडावर ९०० एकरवर मराठा समाजाची सभा घेऊन पुढील निर्णय घेऊ, असं जरांगेंनी स्पष्ट केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा वाढले; १० तोळ्यामागे ८६०० रुपयांची वाढ; वाचा आजचे भाव

Shocking : 'मला पाहिजे ते तुम्ही द्या...' शिक्षकाकडून ४ अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ, नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार

ZP And Municipal Elections: निवडणुकीत आरक्षण मर्यादेचं उल्लंघन; झेडपी, महापालिका निवडणूक लांबणीवर?

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Famous Actress Wedding : शुभमंगल सावधान! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, VIDEO होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT