Manoj Jarange Patil Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचा नवा पत्ता, थाटलं नवं कार्यालय, छत्रपती भवनातून चालणार जरांगेंचा कारभार

Tanmay Tillu

संभाजीनगरात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलंय...छत्रपती भवन असं या कार्यालयाचं नामकरण करण्यात आलंय... नारायण गडाचे महंत शिवाजी महाराजांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन झालंय..

मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी गेल्या वर्षभरापासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमधून मराठा आरक्षणासाठी लढा दिलाय. त्यामुळे गेल्या तेरा महिन्यापासून अंतरवाली सराटीचं नाव राज्यभर पोहचलं. परंतु आता मनोज जरांगे पाटील यांचा पत्ता बदललायं. ते आता सोलापूर-धुळे महामार्गावरील पैठण फाट्यावर आपले कार्य उघडतायत.. या ठिकाणी “छत्रपती भवन” नावाने त्यांचे नवीन कार्यालय तयार झालंय.दरम्यान, नारायण गडावरील दसरा मेळावाच्या निमित्ताने मनोज जरांगे हे धाराशिव आणि परभणी जिल्ह्यातील आंदोलकांसोबत बैठक घेणार आहेत.तसेच, दसरा मेळाव्याची पुढील रणनीती याच कार्यालयातून आखली जाईल.

दरम्यान जरांगेंचाही यंदा दसरा मेळावा आहे आणि त्याचे नियोजन करण्यासाठी हॉस्पिटलमधून जरांगेंना डिस्चार्जही देण्यात आलायं.. सगेसोयरेंची अंमलबजावणी, कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसीतून मराठा आरक्षण मिळण्यासाठी आग्रही असलेल्या मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा सुरू केलेले उपोषण स्थगित केलं. आता जरांगेंच्याही दसरा मेळाव्याची भर पडल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. राजकीय पक्षासारखं स्वतःच कार्यालय जरांगेंनी थाटलंय. त्यामुळे आगामी काळात जरांगेही एखादा स्वतंत्र पक्ष थाटणार का असा सवाल उपस्थित झालायं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND-W vs NZ -W: टीम इंडियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो! पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव

Pune News: पुण्याचं बदलापूर होतंय, वाचा स्पेशल रिपोर्ट...

MIM महाविकास आघाडीत सहभागी होणार? कोणत्या भागातून मागितल्या जागा? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या, एसआयटी रद्द करा; काँग्रेस आमदारांची सरकारकडे मागणी

Healthy Relationship साठी या सोप्या ट्रिक्स करा फॉलो...

SCROLL FOR NEXT