Manoj Jarange Patil  Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना तो GR मान्य का नाही? ३ मोठी कारणं...

Maratha Reservation Maharashtra Government GR : सरकारचे पत्र घेवून अर्जुन खोतकर आज त्यांच्या भेटीला आले. या पत्रात नेमकं काय म्हटलंय याची माहिती या बातमीतून जाणून घेऊ.

Ruchika Jadhav

Manoj Jarange Patil Hunger Strike:

गेल्या १२ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी अद्यापही ते मागे हटलेले नाहीत. अजूनही त्यांचे उपोषण सुरूच आहे. काल जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. (Latest Manoj Jarange Letter)

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या बारा दिवसांपासून उपोषणावर बसले आहेत. काल जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर सरकारचे पत्र घेवून अर्जुन खोतकर आज त्यांच्या भेटीला आले. या पत्रात नेमकं काय म्हटलंय याची माहिती या बातमीतून जाणून घेऊ.

"कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा या जातीमध्ये मोडणाऱ्या जातींना जात प्रमाणपत्र वितरीत करण्याच्या अनुषंगाने शासन निर्णय दिनांक २६ सप्टेंबर, २००८ याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी." असं लिहिलं आहे.

तसेच पत्रात पुढे म्हटलं आहे की, "प्रस्तुत शासन परिपत्रकाची अंमलबजावणी करताना अडचणी उद्भवल्यास त्या अडचणी दूर करण्यासाठी सप्टेंबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये गठीत करण्यात आलेल्या मा.न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीआधारे निश्चित केली जाईल. ही प्रक्रिया पार पाडत असताना मा. न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे (निवृत्त) यांची समिती आवश्यकतेनुसार राज्य मागासवर्ग आयोगाशी सल्लामसलत करेल"

पत्र वाचून जरांगे पाटील काय म्हणाले?

"2004 मध्ये काढलेल्या जीआरचा काहीही फायदा झालेला नाही. या जीआरमध्ये दुरुस्ती करून मराठा समाजाला तात्काळ कुणबी प्रमाणपत्र काढावा अशी मागणी होती. तसेच आंदोलकांवरील खोटे गुन्हे मागे घ्या अशी मागणी असतानाही प्रक्रिया सुरू नाही, केवळ गुन्हे मागे घेतो म्हणालेत, असे म्हणत लाठीचार्ज करणाऱ्यांना बडतर्फ का केले नाही? बोलल्याप्रमाणे जीआरमध्ये काहीही आदेश नाहीत.", असं म्हणत जरांगेंनी उपोषण सुरू ठेवलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT