Manoj Jarange-Patil  Saamtv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: मराठ्यांच्या नावावर कुणी उकळले 100 कोटी? जरांगेंच्या आरोपांमुळे मोठी खळबळ

Maratha Reservation Latest News: मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतना एक नवा बॉम्ब टाकलाय. मराठा आंदोलनाच्या नावाखाली 100 कोटी रुपये उकळल्याचा आरोप जरांगेंनी केलाय. सरकारनं याची चौकशी करावी अशी मागणीही जरांगेंनी केलीय. हे पैसे कुणी लाटले? कोण आहे यामागे?

साम टिव्ही ब्युरो

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

मनोज जरांगे पाटलांनी सगे-सोयऱ्यांच्या जीआरच्या अंमलबजावणीसाठी सुरु केलेलं उपोषण सरकारच्या आश्वासनानंतर मागे घेतलं खरं, मात्र उपोषण स्थगित करताना जरांगे पाटलांनी खळबळजनक गौप्यस्फोट केलाय. मराठा आंदोलनाच्या नावाखाली काही जणांनी तब्बल 100 कोटी रुपये उकळल्याचा आरोप जरांगेंनी केलाय.

मनोज जरंगे पाटील म्हणाले आहेत की, ''या आंदोलनाचा फायदा घेत माझं नाव सांगून कोणी कामे घेतली असतील, पैसे घेतले असतील, तर त्याची मला यादी द्या.''

लोकसभा निवडणूकीनंतर मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषणाचं अस्त्र उगारलं होतं. त्यामुळे सरकारने नरमाईची भूमिका घेतली. तर अखेर सहाव्या दिवशी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाईंच्या शिष्टमंडळाची शिष्टाई यशस्वी ठरली आणि 1 महिन्याच्या मुदतीवर मनोज जरांगे पाटलांनी आपलं उपोषण मागे घेतलं.

मात्र यावेळी मनोज जरांगे पाटलांनी आपलं नाव घेऊन कुणी मराठा समाजाच्या नावाने सरकारकडून काम किंवा पैसे घेतले असतील तर त्याची यादी देण्याची मागणीही जरांगेंनी केलीय. त्यामुळे सरकार या प्रकरणाची चौकशी करून दूध का दूध आणि पानी का पानी करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

SCROLL FOR NEXT