Manoj Jarange Patil Vidhan Sabha Candidate Saam TV
महाराष्ट्र

Vidhan Sabha Election: विधानसभेसाठी मनोज जरांगेंचा पहिला उमेदवार ठरला? भाजपच्या माजी खासदाराची सून मैदानात उतरणार!

Manoj Jarange Patil Vidhan Sabha Candidate : विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आज सकाळपासूनच अंतरवाली सराटी येथे गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अनेक दिग्गज पडद्यामागून जरांगे यांच्यासोबत चर्चा करीत आहेत.

Satish Daud

Dr. Meenal Khatgaonkar on Manoj Jarange & Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी मागील वर्षभरापासून लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेसाठी दंड थोपटले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार उभे करणार, असा निर्धारच जरांगे यांनी केला आहे. आज बुधवारपासून अंतरवाली सराटीत विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत.

येत्या 29 ऑगस्टपर्यंत या मुलाखती सुरू राहणार असून यानंतर निवडणूक लढायची की नाही याबाबत निर्णय होणार आहे. दरम्यान, विधानसभेसाठी (Vidhan Sabha Election 2024) इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आज सकाळपासूनच अंतरवाली सराटी येथे गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अनेक दिग्गज पडद्यामागून जरांगे यांच्यासोबत चर्चा करीत आहेत.

नांदेड जिल्ह्यातील भाजपचे माजी खासदार भास्करराव खतगावकर यांच्या सून डॉ. मीनल खतगावकर या देखील अंतरवाली सराटीत (Jalna News) दाखल झाल्या आहेत. त्यांनी मनोज जरांगे यांनी भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. डॉ.मीनल खतगावकर जिल्हा परिषदेच्या सदस्या राहिलेल्या आहेत.

आता त्या नायगाव विधानसभा मतदारसंघांमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे त्या मनोज जरांगे यांच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, अंतरवाली सराटी येथे दाखल झाल्यानंतर डॉ. मीनल खतगावकर यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.

काय म्हणाल्या डॉ. मीनल खतगावकर?

आज आम्ही मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी येथे आलो आहोत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी जी भूमिका घेतली आहे. त्या भूमिकेला आमचा कायम पाठिंबा राहिलेला आहे. वेळोवेळी आम्ही जनआंदोलनात देखील सहभागी झालो आहोत. आमच्या नांदेड जिल्ह्यात अनेक कुणबी नोंदी सापडल्या आहेत, असं मीनल खतगावकर म्हणाल्या.

पुढे बोलताना खतगावकर म्हणाल्या, कुणबी नोंदी सापडलेल्या अनेकांनी प्रमाणपत्र मिळाले असून ते आता ओबीसीतून आरक्षणाचा लाभ घेत आहेत. मी नांदेडच्या नायगाव विधानसभा मतदारसंघांमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. आम्ही अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. यासंदर्भातच मी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा केल्याचं मीन खतगावकर म्हणाल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: भंयकर वास्तव! पाय ठेवायला जागा नाही, तरीही भाऊचा लोकलच्या दारात उभं राहून प्रवास, व्हिडीओ पाहा

Solapur Airport : सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून मुंबई आणि गोवासाठी विमानसेवा

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

Astrology: आजपासून 'या' राशींचे दिवस चमकणार, शनीची साडीसती संपणार

Supreme Court: चुकीच्या वक्तव्याची तुलना द्वेषपूर्ण भाषणाशी होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले

SCROLL FOR NEXT