MANOJ JARANGE ENDS 20-DAY HUNGER STRIKE saam tv
महाराष्ट्र

उपोषण स्थगित, 3 महिन्यांचा अल्टिमेटम; मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं सोडवलं उपोषण

Manoj Jarange Calls Off Mumbai March: तब्बल 20 दिवसांनंतर मनोज जरांगेंनी उपोषण सोडलंय. मुंबईचा दौरा रद्द केला असला तरी जरांगेंनी सरकारला ३ महिन्यांचा अल्टिमेटम दिलाय. जरांगेंच्या मागण्य़ा काय आहेत आणि सरकारचं त्यावर काय उत्तर आहे. पाहूयात हा रिपोर्ट...

Rohit Kadam

जरांगेंचं आंदोलन मागे घेण्याबाबत सरकारला पुन्हा यश आलंय. बाीडच्या पाटोद्यातून मुंबईकडे कूच करण्याच्या काही तास आधीच मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं जरांगेंची भेट घेऊन त्यांचं उपोषण सोडवण्यात यश मिळवलं. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात शिक्षणमंत्री दादा भुसे, भाजप आमदार प्रसाद लाड आणि सुरेश धस हे पहाटेच पाटोद्यात दाखल झाले. मागण्या आणि त्यावर सरकारच्या आश्वासनांचा मसुदा जरांगेंना दिला आणि चर्चेनंतर जरांगेंचं २० दिवसांचं उपोषण सोडण्याची विनंती केली. त्यानंतर पुढच्या तीन महिन्यांत सर्व मागण्या पूर्ण करण्याचा अल्टिमेटम देत जरांगेंनी विखेंच्या हस्ते उपोषण सोडलं.

जरांगेंच्या प्रमुख मागण्या काय आहेत आणि त्यावर सरकारनं काय आश्वासन दिलंय ते पाहूयात....

प्रश्न - शिंदे समितीनं शोधलेल्या 58 लाख नोंदींनुसार तत्काळ कुणबी प्रमाणपत्रं द्या

उत्तर - आतापर्यंत 51 लाख 84 हजार 537 कुणबी प्रमाणपत्र वितरित

प्रश्न - हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र वितरित करा, त्यांना जात पडताळणी प्रमाणपत्रं द्या

उत्तर - प्राप्त 3966 अर्जांपैकी 3806 कुणबी प्रमाणपत्र वितरित

प्रश्न - सातारा आणि कोल्हापूर गॅझेटियर तत्काळ लागू करावेत

उत्तर - कायदेशीर प्रक्रिया सुरू, 3 ते 4 महिन्यांचा कालावधी द्यावा

प्रश्न - मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्या

उत्तर - 1509 पैकी 1373 गुन्हे मागे घेतलेत. मागे घेण्यास अपात्र ठरलेले 118 आणि प्रलंबित 18 गुन्हे पुन्हा तपासणार

प्रश्न - स्वतंत्र मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करावं

उत्तर - स्वतंत्र मराठा आरक्षण कक्ष स्थापन करण्यात आलाय. 5 अधिकारी कार्यरत

प्रश्न - जात पडताळणी प्रमाणपत्र तातडीनं देण्यात यावेत

उत्तर - 2 लाख 59 हजार 844 प्रमाणपत्रांचं वितरण तर 219 अर्ज नामंजूर

मुंबईत ऐन गणोशोत्सवात उपोषणाचा निर्णय जरांगेंनी मागे घेतल्यानं मुख्यमंत्र्यांनी त्यांचं स्वागत केलंय...

मुळात मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांनी जरांगेंच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र बी़डच्या पाटोद्यात जरांगेंना आंदोलकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून नाईलाजानं सरकारला जरांगेशी चर्चेसाठी मंत्र्यांचं शिष्टमंडळ पाठवावं लागलं. मात्र यावेळीही सरकारनं जुन्याच मागण्यांवर नव्यानं आश्वासनं देऊन तीन महिन्यांची मुदत वाढवून घेतली. त्यामुळे तीन महिन्यांनंतर असंच उपोषण, याच मागण्या आणि अशीच आश्वासनं पाहयला मिळणार की यावर कायमचा तोडगा काढणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPच्या रडारवर आता MPSC, अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी दिपकेंची रणनीती

Maharashtra News Live Update: वाशिम ते कारंजा मार्गावर CNG गॅस वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये सिलेंडरचा स्फोट

अभिषेक शर्मा नावाचं वादळ! ठोकलं सर्वात वेगवान शतक; सोशल मीडियावर शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा

फेरमतदानात भाजपचा दारुण पराभव, काँग्रेसच्या जागा वाढल्या; सत्ता परिवर्तन होणार?

Crime News: मोठी बातमी! बीडमधील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT