Radhakrishna Vikhe Patil saam tv
महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe Patil: 'ओबीसींमध्ये आरक्षण ही मनोज जरांगेंची मागणी चुकीची; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य

Radhakrishna Vikhe Patil: मनोज जरांगे पाटील यांनी १० दिवसांत आरक्षण जाहीर करण्याची मागणी केली आहे. याचदरम्यान, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षणावर मोठं वक्तव्य केलं आहे.

Vishal Gangurde

सचिन बनसोडे

Radhakrishna vikhe patil News:

राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी गावात जंगी सभा घेतली. मनोज जरांगे पाटील यांनी १० दिवसांत आरक्षण जाहीर करण्याची मागणी केली आहे. याचदरम्यान, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षणावर मोठं वक्तव्य केलं आहे. (Latest Marathi News)

मराठा आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

गेल्या महिन्यात जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला बसले होते. त्यानंतर आज अंतरवाली सराटी गावात जंगी सभा घेतली. या सभेला लाखो जणांनी हजेरी लावली. जरांगे पाटील या सभेत मराठा आरक्षणाच्या मागणी अधिक आग्रही असल्याचे दिसून आले. जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठं भाष्य केलं आहे.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, 'ओबीसींमध्ये आरक्षण ही जरांगे यांची मागणी चुकीची आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण ही पहिल्या लढ्यापासूनची मागणी आहे. जरांगेंनी मागणी इतरत्र नेऊ नये ही अपेक्षा आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सर्वोच्च न्यायालयात टिकणारे आरक्षण दिले. मात्र मविआच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण गेले'

'मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध नाही. मात्र, ओबीसीत आरक्षण मागणे योग्य नाही. निजाम काळातील कुणबी दाखले मिळत असतील तर हरकत नाही. मात्र, कुणाच्या आरक्षणात वाटा नको ही भूमिका हवी, असे ते पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra MLC Elections: महायुतीत कुठे दिलजमाई, कुठे बंडखोरी कायम; 5 मतदारसंघात कुणामध्ये रंगणार लढत?

Dengue Fever : डेंग्यूचा सर्वाधिक धोका कोणाला? रुग्णसंख्या वाढण्यामागची कारणे

NCP Corporator Disqualified: शरद पवार गटाला मोठा धक्का! राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचं पद रद्द; काय आहे कारण?

Manoj Jarange-Eknath Shinde: ५०० कोटींच्या आरोपावर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच बोलले, मनोज जरांगेंना सल्लाही दिला

Clove Water Benefits: लवंगाचे पाणी प्यायल्याने वजन कमी होतं का? जाणून घ्या हे ७ आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT