Maratha reservation leader Manoj Jarange Patil  Saam TV Marathi News
महाराष्ट्र

चर्चेला सुरूवात, मुख्यमंत्र्यांकडून पहिलं पाऊल, जवळचा व्यक्ती सराटीत दाखल, मनोज जरांगेंसोबत काय झाली चर्चा?

Maratha reservation leader Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्टपासून मुंबईत बेमुदत आंदोलन सुरू होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे ओएसडी राजेंद्र साबळे अंतरवली सराटीत भेटले. गणेशोत्सव, पाऊस आणि गर्दी पाहता आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती करण्यात आली.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

  • मनोज जरांगे पाटील यांची मुंबईतून २९ ऑगस्टपासून बेमुदत आंदोलनाची घोषणा

  • सरकारला दोन दिवसांची अंतिम मुदत – मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन सुरू

  • ओएसडी राजेंद्र साबळे यांची अंतरवली सराटीत भेट, आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती

  • गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनावर सर्वांचे लक्ष केंद्रीत

Maratha reservation leader Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी एल्गार पुकारलाय. बुधवारी मनोज जरांगे पाटील मुंबईसाठी अंतरवाली सराटीमधून रवाना होणार आहे. २९ ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी बेमुदत आंदोलन करणार आहेत. सोमवारी जरांगे पाटलांनी सरकारला दोन दिवसांची मुदत देत थेट इशारा दिला होता. राज्य सरकारकडूनही मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची नोंद घेण्यात आली आहे. जरांगे पाटलांसोबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी थेट अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी आज सकाळी आंतरावली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले होते. ओएसडी राजेंद्र साबळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांनी जरांगे पाटलांना मुंबई आंदोलनावर चर्चा करून मागे घेण्यासाठी विनंती केल्याची माहिती मिळाली आहे. ओएसडीच्या विनंतीवर मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

गणेशोत्सव आणि मुंबईतील गर्दी, पाऊस पाहता मनोज जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे, अशी मागणी ओसडी साबळे यांनी केल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणावर ठाम आहेत. मागण्या मान्य करा, आम्ही आंदोलन करणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.

मुंबईपर्यंत आम्हाला सरकारने एक रस्ता आम्हाला द्यावा. आंदोलन आता माघारी घेणार नाही. ओएसडीकडून आंदोलन पुढे ढकलण्याबाबत विनंती करण्यात आल्याचेही समजतेय. पण मनोज जरांगे पाटील आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. मला कुणालाही त्रास द्यायचा नाही, मला माझ्या मराठी माय-लेकारांसाठी आरक्षण हवे आहे. सरकारने आरक्षण द्यावे, अशी मागणी जरांगे पाटलांनी केली. आंदोलनाची तारीख कोणत्याही परिस्थितीत बदलली जाणार नाही, उद्या मुंबईकडे कोणत्याही परिस्थिती निघणारच, असे जरांगे म्हणाले. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचे ओएसडी साबळे म्हणाले की, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मार्ग जाणून घ्यायला आम्ही आलो आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : रत्नागिरी हादरलं! पोटच्या मुलाने आधी केली आईची हत्या, नंतर स्वतःलाही संपवलं

Maharashtra Live News Update: जेजुरी पोलीसांचा रूट मार्च

एक किलोमीटरचा रस्ता बनवण्यासाठी किती खर्च येतो?

Ganesh Chaturthi 2025 : गणपती दर्शनाला जाताना 'या' ३ रंगाचे कपडे घालणे शुभ

Accident News : प्रवाशांनी भरलेल्या खासगी बसला भीषण अपघात; ट्रकची जोरदार धडक, ३० प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT