manoj jarange patil appeals maratha community in Beed sabha  Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange: "आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, फक्त तुम्ही..." मनोज जरांगे यांचं मराठा बांधवांना आवाहन

विनोद जिरे

Manoj Jarange on Maratha Community

मराठा समाजाचे आंदोलन रोखण्याची धमक कोणामध्येही राहिलेली नाही. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय तसूभरही मागे हटणार नाही. फक्त माझी मराठा बांधवांना विनंती आहे, की तुम्ही आत्महत्या करू नका. असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना केलं आहे. ते बीडच्या सभेत बोलत होते.  (Latest Marathi News)

मनोज जरांगे पाटील यांची शनिवारी बीडमध्ये (Beed News) जाहीर सभा पार पडली. या सभेला लाखो मराठा बांधवांनी गर्दी केली होती. यावेळी 'एक मराठा, लाख मराठा' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

सभेत बोलताना जरांगे म्हणाले, उशिरा का होईना मराठा जागा झाला याचा आनंद आहे. पण आजही आपल्या परिवारातील एक तारा गेला. जर पोरंच मरायला लागले तर आरक्षण द्यायचं कुणाला?

माझी राज्य सरकारला विनंती आहे, की त्यांनी हा विषय गांभिर्याने घ्यावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांनी मंत्रिमंडळात चर्चा करुन येत्या २४ तारखेच्या आत मराठा समाजाला (Maratha Community) आरक्षण द्यावं, अन्यथा मराठ्यांसोबत खेटणं तुम्हाला महागात पडेल, असा इशाराही जरांगे यांनी राज्य सरकारला दिला.

दरम्यान, मराठा आरक्षणाची मागणी घेऊन बीडमध्ये 45 वर्षीय दत्तात्रय काळकुटे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर मनोज जरांगे यांनी रात्री अडीच वाजता बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये जाऊन आत्महत्याग्रस्त काळकुटे परिवाराची भेट घेतली.

यानंतर माध्यमांसोबत बोलताना जरांगे यांनी राज्य सरकारला इशारा दिला. आम्ही दत्तात्रय काळकुटे यांची बलिदान वाया घालू देणार नाही. त्या कुटुंबाला 50 लाख रुपये देऊन त्याचा पुनर्वसन करावे, अन्यथा आम्ही सरकारला जगू देणार नाहीत. असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: संजय राऊतांनी सांभाळून बोलावं : बच्चू कडू

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, १० टक्के मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार?

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT