Manoj Jarange Patil Latest News Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : जात संपू देऊ नका, मनोज जरांगे पाटलांचं मराठा नेत्यांना आवाहन

Manoj Jarange Patil Latest News : ओबीसींचे काही नेते मराठा समाजाला टार्गेट करत आहे. मराठा नेत्यांना आवाहन आहे की, त्यांनी आता समाजाच्या पाठी उभे राहा.

डॉ. माधव सावरगावे

Jalna News :

राज्यात आता मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण मनोज जरांगे पाटील यांच्या सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला मंत्री छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला आहे. यासाठी छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांच्या भेटीगाठीही सुरु केल्या आहेत. यावरुन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर निशाणा साधला आहे.

ओबीसींचे काही नेते मराठा समाजाला टार्गेट करत आहे. मराठा नेत्यांना आवाहन आहे की, त्यांनी आता समाजाच्या पाठी उभे राहा. जात संपू देऊ नका. जात संपली की तुम्ही संपलात म्हणून समजा. तुमच्या पाठीमागे जात आहे म्हणून मराठा नेत्यांना किंमत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठा समाजाच्या पाठी उभे राहण्याची ही खरी वेळ आहे. मराठ्यांना न्याय मिळवून देण्याची हीच वेळ आहे. यावेळी तुम्ही नाही आलात तर मराठा समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. (Latest Marathi News)

आमचं शांततेचं आंदोलन मोडण्याचं काम ओबीसी नेत्यांकडून सुरु आहे. त्यांना वठणीवर आणण्याची ताकद मराठा नेत्यांमध्ये आहे. मात्र त्यांना करायचं नसेल तर आम्ही खंबीर आहोत, असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे सर्वोच्च न्यायालयातून बाहेर

Chanakya Niti : कोणाला जवळ करावं, कोणाची साथ सोडावी? चाणक्यांनी सांगितला नात्यांबाबतचे 8 महत्त्वाचे धडे

Kalyan Dombivli: उंबरडे डंपिंग ग्राउंडच्या सुपरवायझरला भाजप आमदाराच्या समर्थकाकडून मारहाण, धक्कादायक कारण आलं समोर

Konkan Beaches : ऑक्टोबरच्या कडक उन्हात थंडगार समुद्रकिनाऱ्याची सफर! पाहा कोकणच्या कुशीत लपलेले 'हे' ७ सुंदर किनारे

Maharashtra News Live Update: धुळे तालुक्यातील आदिवासी बांधवांचे तलावात उतरून आंदोलन

SCROLL FOR NEXT