Jalna to Mumbai Maratha Reservation March Saam TV
महाराष्ट्र

Maratha Reservation: एकच मिशन फक्त मराठा आरक्षण, मुंबईकडे जाताना मनोज जरांगेंचा मुक्काम कुठे-कुठे असणार?

Jalna to Mumbai Maratha Reservation March: मुंबईकडे कूच करताना मराठा आंदोलकांचा मुक्काम कुठे-कुठे असणार? याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी माहिती दिली.

Satish Daud

Maratha Reservation Jalna to Mumbai March

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळेपर्यंत माघार नाही, असा निर्धार करीत मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीपासून मुंबईकडे जाण्याच्या मार्ग आणि मुक्कामाच्या ठिकाणाची घोषणा केली. सोबतच आम्हाला आडवाल तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही सरकारला दिला. मुंबईकडे कूच करताना मुक्काम कुठे-कुठे असणार? याबाबतही जरांगेंनी माहिती दिली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पहिला दिवस :- अंतरवाली ते मातोरी.

  • २० जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून सकाळी ९ वाजता पायी यात्रेचा शुभारंभ होईल. कोळगाव ता. गवराई येथे दुपारचे जेवण, मातोरी ता. शिरूर येथे मुक्काम केला जाईल.

दुसरा दिवस - मातोरी ते करंजी बाराबाभळी.

  • मातोरीतून सकाळी ८ वाजता यात्रेला पुन्हा सुरुवात होईल. तनपुरवाईला ता. पाथर्डी येथे दुपारचे जेवण केलं जाईल. दिवसभराच्या यात्रेनंतर बाराबाभळी-कारंजी बाट ता, नगर मुक्काम आणि रात्रीचं जेवण असेल.

    तिसरा दिवस - बाराबाभळी ते रांजणगाव.

  • बाराबाभळी येथून सकाळी ८ वाजता मोर्चाला सुरुवात होईल. सुपा ता. पारनेरे येथे दुपारी जेवण होईल. त्यानंतर रांजणगाव ता. शिरूर येथे मुक्काम आणि रात्रीचं जेवण केलं जाईल.

चौथा दिवस- रांजणगाव ते चंदन नगर, खराडी बायपास.

  • रांजणगावातून सकाळी ८ वाजता मोर्चा निघेल. कोरेगाव भिमा येथे दुपारी जेवणाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर यात्रा पुण्याच्या दिशेने निघेल. चंदनगर खराडी बायपास येथे रात्री मुक्काम आणि जेवण असेल.

दिवस पाचवा- खराडी बायपास ते लोणावळा.

  • २४ जानेवारीला चंदन नगर, खराडी बायपास येथून सकाळी ८ वाजता मराठा आंदोलक निघणार, तळेगाव दाभाडे येथे दुपारी जेवण, लोणावळा ता येथे मुक्काम आणि जेवण असेल.

सहावा दिवस- लोणावळा ते वाशी

  • २५ जानेवारी रोजी लोणावळा येथून सकाळी ८ वाजता मनोज जरांगे मराठा बांधवांसह पनवेलच्या दिशेने निघतील. नवीमुंबई येथे दुपारी जेवण, वाशी येथे रात्रीचा मुक्काम आणि जेवण असेल.

सातवा दिवस- वाशी ते आजाद मैदान-मुंबई

  • २६ जानेवारी रोजी मनोज जरांगे वाशी येथून सकाळी ८ वाजता नाष्टा करून निघणार. आणि दुपारी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात करणार.

  • दरम्यान, या काळात डोंगर पाहून मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. जिथं मुक्काम आहे, त्या परिसरातील लोकांनी त्यांच्या घरातून एक दोन भाकरी द्याव्यात असा आवाहनही करण्यात आले.

  • शिवाय याकाळात कोणी अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न केला, तर त्या गावातील लोक त्याचा बंदोबस्त करतील.

  • मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघणारे मराठे कोटीच्या घरात असतील, असा अंदाज बांधला जातोय. त्यामुळं आंदोलन सरकारसाठी अवघड होईल याचीही शक्यता आहे. त्यामुळे आणखी ५ दिवस सरकार समोर असल्यामुळे काहीतरी सरकार पातळीवर प्रयत्न होतील.

  • मात्र कोणताही ठोस निर्णय झाला नाही तर हे मराठी मुंबईत दाखल होतील अशी शक्यता आता सध्या तरी दिसते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकीय भूकंप! शरद पवार गटातील बड्या नेत्याचे शिलेदार भाजपच्या वाटेला; उल्हासनगरमध्ये खळबळ

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वरमध्ये व्हीआयपी दर्शन पास मध्ये छेडछाड; तारीख बदलवून दर्शनाला जाण्याचा प्रयत्न

Maharashtra Live News Update: त्र्यंबकेश्वरमध्ये ऑनलाईन दर्शन पासमध्ये छेडछाड करून दर्शनाला जाण्याचा प्रयत्न

Operation Mahadev : लष्कराचं 'ऑपरेशन महादेव' फत्ते; ३ दहशतवादी ठार, पहलगाम हल्ल्याचे संशयित असण्याची शक्यता

Accident: बारामतीत अपघाताचा थरार! ट्रकने वडिलांसह दोन चिमुकल्यांना चिरडलं, थरकाप उडवणारा CCTV VIDEO

SCROLL FOR NEXT