Manoj Jarange Patil Announce Sabha at Beed For Maratha Aarakshan Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange Beed Sabha: मोठी बातमी! मनोज जरांगे तब्बल ९०० एकरमध्ये जंगी सभा घेणार; कोट्यवधी मराठे पुन्हा एकवटणार!

Maratha Aarakshan Sabha: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं. त्याचबरोबर सगेसोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

Satish Daud

Manoj Jarange Patil Beed Sabha Update

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं. त्याचबरोबर सगेसोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा एकवटणार असून तब्बल ९०० एकरवर जंगी सभा घेणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलं आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोकसभा निवडणुकीपूर्वी बीड जिल्ह्यात ही विराट सभा होणार असल्याचे संकेत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिले आहेत. मनोज जरांगे यांच्या या घोषणेनंतर मराठा समाजाने सभेसाठी जागेची पाहणी सुरू केली आहे. काहींनी तर सभेची तयारी देखील सुरू केली आहे.

राज्य सरकारने मराठा समाजाला (Maratha Reservation) स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यावरही राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखीच तापला आहे. सरकारने दिलेलं १० टक्के आरक्षण फसवं असून ते कोर्टात टिकणार नाही, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या भूमिकेवर जरांगे ठाम आहेत. (Latest Marathi News)

सरकारनं सगे-सोयरे शब्दाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचा वापर करून गुंड शाही आणि दडपशी सुरू केली आहे. त्यामुळे कोट्यवधी मराठा समाज पुन्हा एकवटणार असल्याचं जरांगेंनी म्हटलं आहे.

मराठा समाजाने दानवेंसह, कुचेंना माघारी पाठवलं

ऐन लोकसभा निवडणूक तोंडावर असताना जालन्यात मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे. राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील एका गावात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार नारायण कुचे आले असता, त्यांना मराठा तरुणांनी थेट गाडीतूनच माघारी पाठवलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनराणी’ मिनी टॉय ट्रेन' पुन्हा बंद, पर्यटकांचा हिरमोड

Ashok Kharat: हेमंत गोडसेंचा भोंदूबाबा खरातसोबतचा VIDEO समोर, लोकसभा निवडणुकीपूर्वी भविष्य सांगितलं

Couple outfits: लग्नासाठी प्रिव्हेडिंग शूट करणार आहात? मग ट्राय करा हे ट्रेंडी आणि युनिक कपल आउटफिट

Mumbai Police Video: स्वप्नपूर्ती! पोलिस होताच पहिली सलामी वनरक्षक अधिकारी भावाला, घट्ट मिठी मारली अन् उचलून घेतलं; काळजाला भिडणारा VIDEO

Jio Recharge: खुशखबर! Jioचा 365 रुपयांचा नवा प्लॅन लॉन्च; ग्राहकांना मिळणार भरपूर डेटा अन्...

SCROLL FOR NEXT