Manoj Jarange Patil  Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: सरकार जाणून-बुजून मागण्या मान्य करायला वेळ लावतंय; मनोज जरांगेंचा आरोप

Manoj Jarange Patil On Maratha Reservation : सरकारने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या दोन मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र सरकार इतर मागण्या मान्य करण्यास सरकार वेळ लावत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केलाय.

Saam Tv

Maratha Reservation: सरकारने मराठा आरक्षणाच्या आंदोलनात दोन मागण्या मान्य केल्याने आम्ही त्यांचे स्वागत करतो, असे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज माध्यमांशी बोलतांना व्यक्त केले. मात्र सरकार मागण्या मान्य करायला जाणून-बुजून वेळ लावत असल्याचा आरोप त्यांनी केला. नेहमी आक्रमक भूमिका घेणारे मनोज जरांगे आज मवाळ दिसले. याबाबत त्यांनी स्पष्ट केले की, मंत्री उदय सामंत यांच्या सांगण्यावरून मी संयम पाळत आहे. मात्र, सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांची अंमलबजावणी त्वरित करावी, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

मनोज जरांगे यांनी सांगितले की, आम्ही आठ मागण्या केल्या होत्या त्यापैकी चार मागण्या मान्य केल्या जातील असे सरकारने आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात फक्त दोनच मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात आली असली तरी केवळ मुदतवाढ पुरेशी नाही. त्या समितीला आवश्यक मनुष्यबळ आणि संसाधने मिळायला हवीत.

आगामी साखळी उपोषणाबाबत विचारले असता जरांगे म्हणाले गावकऱ्यांसोबत चर्चा करून उद्या निर्णय घेऊ. यासंदर्भात उद्या सकाळी आंतरवालीत पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा केली जाईल. मात्र, सरकारने घेतलेले निर्णय केवळ घोषणांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्षात अंमलात आले पाहिजेत.

सरकारने पुढील आठवडाभरात मागण्यांवर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करत जरांगे म्हणाले, पुढील मंगळवारपर्यंत सरकारने उर्वरित मागण्या मान्य कराव्यात. जर तसे झाले नाही तर आम्हाला पुढील आंदोलनाची भुमिका घ्यावी लागेल. आम्ही कुणाच्या विरोधात नाही. मात्र, जर एका लेकराला वेगळा न्याय आणि दुसऱ्याला वेगळा न्याय दिला गेला, तर आंदोलन सुरूच राहील, असे म्हणत जरांगेंनी सरकारवर दबाव टाकलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime News: मालाडमध्ये बार डान्सरची हत्या; नको त्या अवस्थेत सापडला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: पुण्यातील अजित पवारांच्या उपस्थितीत कात्रज दूध डेअरी मध्ये सर्वसाधारण सभेचे आयोजन

Navratri Festival : नवरात्रीची अनोखी परंपरा; कडक उपवासात ९ दिवस बसायचं नाही, झोपायच पण तेही उभं राहून

IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियामध्ये ३ बदलांची शक्यता; फायनलपूर्वी 'या' खेळाडूंना मिळणार संधी, पाहा कशी असेल प्लेईंग 11

Devoleena Bhattacharjee: गोपी बहूचे बेबी बंप फोटो व्हायरल; चाहत्यांना देणार पुन्हा गोड बातमी?

SCROLL FOR NEXT