Manoj Jarange Patil Radhakrishna Vikhepatil  fb
महाराष्ट्र

Manoj Jarange : ...तर विखेसाहेब तुमच्या घरातून जीव देईस्तोर उठणार नाही - मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil : हैदराबाद जीआर मान्य केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण यशस्वी झाल्याचे घोषणा केली. फसवणूक केल्यास विखेसाहेब तुमच्या घरातून जीव देईस्तोर उठणार नाही असे जरांगे म्हणाले.

Yash Shirke

  • मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावरील उपोषण यशस्वी ठरले.

  • हैदराबाद गॅझेटचा जीआर मान्य झाल्याची घोषणा करून त्यांनी उपोषण सोडले.

  • फसवणूक झाल्यास विखे पाटील यांच्या घरातून जीव देईस्तोर उठणार नाही, असा इशारा जरांगेंनी दिला.

Manoj Jarange Patil Radhakrishna Vikhepatil : मराठा आरक्षणासाठी मुंबईत मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर उपोषण करत होते. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी मागण्या मान्य झाल्यानंतर त्यांनी उपोषण सोडले. हैदराबाद गॅझेटचे जीआर मान्य केल्यानंतर सरबत घेत मनोज जरांगे यांनी आंदोलन यशस्वी झाल्याची घोषणा केली. यादरम्यान मराठा उपसमितीचे राधाकृष्ण विखे पाटील आणि अन्य सदस्यांशी त्यांनी चर्चा देखील केली.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, 'हैदराबाद गॅझेटचा जीआर बरोबर आहे. सातारा संस्थान गॅझेटचा जीआर बरोबर आहे, केसेसचा जीआर बरोबर आहे. बलिदान केलेल्या कुटुंबांचा बरोबर आहे. शिंदे समिती सगळ्या व्हॅलिडिटी द्यायचे आदेश काढतील. समिती दररोज काम करणार. सगळ्याचे प्रमाणपत्र दिले जाणार. ५८ लाख नोंदी ग्रामपंचायतीला चिट केल्या जाणार हे सगळं सांगितलंय. बलिदान गेलेल्याचे पैसे आणि नोकऱ्या दिल्या जाणार'.

'जर चार- दोन दिवसांनी, आठ दिवसांनी हे बोलले यात थोडं चूक आहे, दुरूस्ती करा, फसवा फसवीचा अंदाज दिसतोय. माझा शेवटचा शब्द आहे. जर असंकाही झालं, तर राधाकृष्ण विखे पाटील साहेब तुमच्या घरात जीव देईस्तोर मी उठणार नाही. मराठा समाजाचं वाटोळं नको', असे जरांगे यांनी विखे पाटील यांना संबोधून म्हटले.

'जर फसवणूक झाली तर तुम्हाला सांगतो.आपण हळूहळू तीन कोटी मराठे आरक्षणात घातले आहेत. आता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा आरक्षणात घातलाय आपण जर काही राहिलंच तर माझा शब्द आहे तुम्हाला जीवात जीव असेपर्यंत तुमच्यासाठी लढेन, गद्दारी करणार नाही', असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हे काय? बाळाला चक्क दोन लिंग, महिलेच्या प्रसृतीनंतर डॉक्टरही चक्रावले

Maharashtra Live News Update: परळीच्या निवडणुकीमध्ये न्यायालयाकडून शरद पवार गटाला मोठा दिलासा

Supreme Court: निवडणुका रद्द करू नाहीतर निकाल आम्ही देऊ: सर्वोच्च न्यायालय

मुलगी झाली म्हणून सासरकडून छळ; आयुष्य 'नकोसे' झाल्यानं महिलेने संपवली जीवनयात्रा

Navi Mumbai : अलिबाग, गोव्यापेक्षाही सुंदर आहे नवी मुंबईतील 'हा' समुद्रकिनारा

SCROLL FOR NEXT