Manoj Jarange On Doctor Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange On Doctor: माझं वजन झालंय १५ आणि डॉक्टर आलेत ३५...; तब्येतीच्या मुद्द्यावरून जरांगेंनी सरकारला चांगलंच सुनावलं

Maratha Aarakshan Andolan: आरक्षणाचा जीआर आणा मग मी उपोषण सोडणार, या मतावर जरांगे ठाम आहेत.

Ruchika Jadhav

Maratha Aarakshan:

आरक्षणावरून माराठा समाज आक्रमक झाला आहे. गेल्या शुक्रवारी जालन्यात आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला. त्यानंतर मनोज जरांगे उपोषण करत आहेत. त्यांनी उपोषण सोडावे यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत. मात्र आरक्षणाचा जीआर आणा मग मी उपोषण सोडणार, या मतावर जरांगे ठाम आहेत. (Latest Marathi News)

अशात जरांगेंची तब्येत बिघडत असल्याचं म्हटलं जातंय. त्यावरून जरांगेंनी सरकारला चांगलच सुनवलं आहे. जरांगेंच्या उपचारासाठी सातत्याने डॉक्टर येत आहेत. त्यावरून जरांगे म्हणाले की, "मला काही झालेलं नसताना दर १५ मिनीटांनी डॉक्टर येतायत. त्यांना तिकडे पेशंट नाहीत का? हे मला समजत नाही. आताच पुण्याच्या टीमचे ३० ते ३५ डॉक्टर आले होते."

"मी पाहिलं तर १५ किलोंचा आणि डॉक्टर आलेत ३५ काय तपासता. आर्ध रक्त तर तपासण्यासाठीच वापरलं आहे. ते म्हणाले काही झालेलं नाही. पाणी पित जा. सरकारला रिस्पाँन्स दिला पाहिजे त्यामुळे मी पाणी प्यायला सुरुवात केली. मात्र सरकार माझी तब्येत बरी नसल्याचं म्हणत आहेत. त्यामुळे सरकारला माझी एकच विनंती आहे त्यांनी उगच मराठ्यांच्या नादी लागूनये. सरकारने जरा भानावर येऊन मराठा समाजाच्या किंकाळ्या ऐकाव्यात.", अशा शब्दांत मनोज जरांगेंनी आपला संताप व्यक्त केलाय.

"आम्हाला जीआर पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी जातप्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी आम्ही त्यांना दोन दिवस दिले होते. तुम्ही पत्त्याचा बंगला करण्याची सवय बंद करा. मुख्यमंत्री चांगले आहेत. आता वेदना सहन करण्याची क्षमता आमच्यात नाही.", असंही मनोज जरांगेंनी यावेळी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain : चार दिवसांच्या अतिवृष्टीने सर्वच हिरावले; पिकांसोबत शेतीही गेली वाहून, शेतकऱ्याला अश्रू अनावर

Crime News: वाढदिवसाच्या पार्टीत येण्यास नकार, ५० रुपयांसाठी मित्र बनला हैवान, छातीत भोसकला चाकू

Maharashtra Live News Update: ST प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी नांदेडमध्ये बंजारा समाज आक्रमक

Badlapur Crime : गावगुंडाकडून पोळीभाजी केंद्राची तोडफोड; बदलापुरातील धक्कादायक प्रकार

Amruta Dhongade: किती सुंदर हास्य तुझे, गालावरची खळी ही लाजते

SCROLL FOR NEXT