Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करा, अन्यथा...'; मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला नवा अल्टिमेटम

भरत नागणे

Manoj Jarange News :

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आक्रमक भू्मिका घेतली आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण जाहीर केलं असलं तरी, जरांगेंनी सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करा, ही मागणी लावून धरली आहे. मनोज जरांगे यांनी सगेसोयऱ्याची ९ मार्चपर्यंत अंमलबजावणी करा, अशी मागणी केली आहे. (Latest Marathi News)

मनोज जरांगे पाटील आजपासून दोन दिवसांच्या संवाद दौऱ्यावर जात आहेत. आज पंढरपुरात पोहोचल्यानंतर जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. जरांगे म्हणाले, 'लोकसभा आचारसंहितेपूर्वी सगेसोयरेबाबत अंमलबजावणी केली पाहिजे. 2012 च्या कायद्यात दुरुस्ती करून आचारसंहिता लागण्यापूर्वी अंमलबजावणी आधी करावी.

'सगेसोयचा मुद्दा मिटल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही. समाजाला आडवी चालण्याची भूमिका देवेंद्र फडणवीस घेणार नाहीत. अन्यथा मराठा समाजाच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल, असे ते म्हणाले.

'मुख्यमंत्री शिंदे एकनाथ समाजाच्या मनातून उतरले तर पुढच्या पायऱ्या चढणे अवघड आहे . निष्पाप लोकांना गुंतवले जात आहे. सहा महिने मुख्यमंत्री यांना काही वाटले नाही का? त्यांना आम्ही मान दिला आता तरी त्यांनी आम्हाला लोटत नेले, असे ते पुढे म्हणाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला नवा अल्टिमेटम

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी आता सरकारला नऊ मार्चचा नवा अल्टिमेटम दिला आहे. सगेसोयऱ्याची अंमलबजावणी लोकसभा आचारसंहितापूर्वी करा, असं त्यांनी सरकारला सांगितले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report | पुणे येथील Hit And Run प्रकरणातील अल्पवयीन मुलाला 12 तासात जामीन

Special Report | पैज लावाल, तर मग तुरुंगात जाल! दोन मित्रांना पैज चांगलीच भावली..

Pune hit And Run Case : पुणे हिट अँड रन प्रकरण; 'त्या' अल्पवयीन मुलाला काय झाली शिक्षा? जाणून घ्या

Today's Marathi News Live: नवी मुंबईत या वाहनांना प्रवेश बंदी, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Pune Hit and Run Case | पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे प्रताप उघड

SCROLL FOR NEXT