Deepak kesarkar : सावंतवाडीत आंदोलक महिलांचा मंत्री दीपक केसरकरांना घेराव, घटनास्थळी नेमकं काय घडलं?

Deepak kesarkar Latest News in Marathi : आंबोलीत वन जमिनीच्या जागेत अनधिकृत बांधकाम झाल्याच्या मुद्द्यावरून येथील ग्रामस्थ 18 दिवस उपोषणास बसले आहेत. या आंदोलनातील संतप्त महिलांनी मंत्री दीपक केसरकर घेराव घालत त्यांच्यापुढे म्हणणं मांडलं.
Deepak kesarkar
Deepak kesarkarSaam tv

विनायक वंजारे, सावंतवाडी

Deepak Kesarkar News :

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना आज आंबोलीतील संतप्त महिलांनी घेराव घातला. आंबोलीत वन जमिनीच्या जागेत अनधिकृत बांधकाम झाल्याच्या मुद्द्यावरून येथील ग्रामस्थ 18 दिवस उपोषणास बसले आहेत. या आंदोलनातील संतप्त महिलांनी मंत्री दीपक केसरकर घेराव घालत त्यांच्यापुढे म्हणणं मांडलं. (Latest Marathi News)

सांवतवाडीच्या आंबोलीतील जंगलात काळोखात ग्रामस्थ आंदोलन करत आहेत. आज 18 व्या दिवशी मंत्री दीपक केसरकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी स्थानिक आमदार म्हणून तुम्ही ही बांधकाम कधी काढणार, असा प्रश्न विचारत केसरकर यांना जाब विचारला. यावेळी जवळजवळ 50 ते 60 महिलांनी दीपक केसरकर यांचा मार्ग रोखून धरला होता.

Deepak kesarkar
Eknath Shinde News : बारामती शहर म्हणजे विकासाचं मॉडेल, एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य | Marathi News

आंदोलक महिलांच्या आक्रमक भूमिकेमुळे मंत्री दीपक केसरकर यांना पोलीस बंदोबस्तातून आंदोलनस्थळावरून निघाले. मंत्री केसरकर आंदोलनस्थळावरून निघून जाऊन कारमध्ये बसून रवाना झाले.

दरम्यान, दीपक केसरकर यांनी अनधिकृत झालेले बांधकाम लवकरात लवकर पाडण्याचे आदेश आपण देऊ अशा पद्धतीची माहिती दिली.

Deepak kesarkar
Raju Patil : आगामी लोकसभा निवडणूक लढवणार का? आमदार राजू पाटील यांनी मोजक्या शब्दात सांगितलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com