Shrikant Shinde and Eknath Shinde  saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange : पायाखालची माती सरकेल! भाजपला ५०० कोटींचं खोटं सांगितलं? जरांगेंचा थेट एकनाथ शिंदे अन् श्रीकांत शिंदेंना इशारा

Shrikant Shinde and Eknath Shinde : नारायण गडावरील दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहारावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सवाल उपस्थित केले.

Namdeo Kumbhar

Manoj Jarange ₹500 crore allegation : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजपच्या नेत्यांमध्ये माझ्या नावाने ५०० कोटी रुपयांचा मोठा व्यवहार आणि कट शिजल्याचा घणाघाती आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. ते नारायण गडावरील दसरा मेळाव्यात बोलत होते. (Manoj Jarange questions Eknath Shinde)

जरांगे म्हणाले की, "गेल्या तीन वर्षांत माझ्या जवळच्या किंवा लांबच्या लोकांनी कोणाकडून पैसे घेतल्याची माहिती माझ्या कानावर आली आहे. पण मला भेटण्यासाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नाही. ज्यांनी दिले असतील त्यांनी ते परत घ्यावेत."

५०० कोटींच्या व्यवहारावरून शिंदेंना प्रश्न

उपोषणाच्या आठव्या-नवव्या दिवशी मला एक अत्यंत भयंकर गोष्ट कळाली, असा दावा करत जरांगे यांनी थेट एकनाथ शिंदे यांना उत्तर देण्याचे आव्हान दिले. जरांगे म्हणाले, "शिंदे साहेब, तुम्ही भाजपच्या नेत्यांना असे सांगितले आहे का की मनोज जरांगेंना ५०० कोटी रुपये द्यायचे आहेत? आणि भाजपकडून ५०० कोटी रुपये घेऊन ते मला दिले असे तुम्ही भाजपला सांगितले का?" असा सवाल जरांगे पाटील यांनी शिदेंना विचारला.

श्रीकांत शिंदेंचे नाव अन् भाजपचा कट

पुढे बोलताना जरांगे म्हणाले, "एकनाथ शिंदे यांनी भाजपकडून ५०० कोटी रुपये घेतले आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी ते पैसे माझ्यापर्यंत पोहोच केले, अशी चर्चा सुरू आहे. जर तुम्ही भाजपकडून खोटं सांगून ५०० कोटी रुपये आणले असतील, तर याचे उत्तर उद्या संध्याकाळपर्यंत द्या. हा खूप मोठा कट आहे आणि याचा पुरावा समोर आला तर पायाखालची माती सरकेल!"

मुंबईवर पुन्हा धडकण्याचा इशारा

"भाजप शिंदे साहेबांना संपवत आहे की मला, याचा फैसला झालाच पाहिजे. आरक्षणाच्या मारेकऱ्यांच्या दारात कटोरा घेऊन उभे राहायचे नाही," असे सांगत जरांगे यांनी कार्यकर्त्यांना इशारा दिला की, दुष्काळाची परिस्थिती बिकट झाली नाही, तर सर्वांनी पुन्हा मुंबईच्या दिशेने जाण्याची तयारी ठेवावी. तसेच आमच्याविरोधात बोलणाऱ्यांनी मर्यादेत राहावे, अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल, असा थेट इशाराही त्यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Peanuts Benefits: दररोज भुईमुगाचे दाणे खाल्ले तर काय होतं?

Maharashtra News Live Update: मीरा रोडमध्ये गरबा खेळताना काळाचा घाला; ३० वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Manoj Jarange: शिंदेंनी माझ्या नावाने भाजपकडून ५०० कोटी घेतले, मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा; म्हणाले - 'माझ्याकडे पुरावे...'

How to dry wet salt: मिठाला पाणी सुटलंय का? ही ट्रिक वापरा, मिनिटात होईल सुटसुटीत

लोकल प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! 'या' नव्या मार्गावर धावणार दररोज ५० लोकल; प्रवासाचा वेळ अर्धा होणार?

SCROLL FOR NEXT