Manoj Jarange Patil Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange : लोकसभा निवडणूक लढवणार का? मनोज जरांगेंनी स्पष्ट सांगितलं

Manoj Jarange Latest News : प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे यांना जालन्यातून उमेदवारी देण्याची मागणी महाविकास आघाडीला केली होती. प्रकाश आंबेडकरांच्या मागणीवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Vishal Gangurde

रामू ढाकणे, छत्रपती संभाजीनगर

Manoj Jarange Latest News :

लोकसभा निवडणुकीची बिगुल वाजलं आहे. सर्व राजकीय पक्षांना लोकसभेच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपादरम्यान प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे यांना जालन्यातून उमेदवारी देण्याची मागणी महाविकास आघाडीला केली होती. प्रकाश आंबेडकरांच्या मागणीवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

मनोज जरांगे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी लोकसभा निवडणूक लढवणार का, याबाबत जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली. 'राजकारण माझा मार्ग नाही, मी निवडणूक लढणार नाही. मी चळवळीतून न्याय देणार'.

लोकसभा निवडणूक लढवणार का?

निवडणूक लढवण्याविषयी जरांगे म्हणाले, 'प्रकाश आंबेडकर यांच्या शब्दाचा मी सन्मान करतो. ते नेहमी बोलतात, ते स्पष्ट बोलतात. मात्र राजकारण हा माझा मार्ग नाही. सामाजिक चळवळीतून न्याय मिळवणे हाच माझा मार्ग आहे. सामाजिक चळवळीतून सत्तेत आणि राजकारणात नसतानाही ज्या गोष्टी मिळणार नाही त्या मिळाल्या आहेत'.

राज्य सरकारवर आरोप करताना जरांगे म्हणाले, 'सरकारने आमची वारंवार फसवणूक केली, आज देतो उद्या देतो म्हणून आमची फसवणूक केली

24 तारखेच्या बैठकीवर भाष्य करताना मनोज जरांगे म्हणाले, 'आम्ही राज्यातील मराठा समाजाची 24 तारखेला बैठक लावली. या बैठकीत आम्ही आमची पुढची दिशा ठरवणार आहे. या बैठकीला सर्व तज्ज्ञ हजर राहणार आहेत. समाजाकडून दोन दिवस तिथे जेवणाची सुद्धा व्यवस्था केली आहे. जी प्रचंड मोठी बैठक असणार आणि निर्णायक बैठक असणार आहे.

'सरकार आचारसंहिता लागण्याच्या अगोदर निर्णय घेणार होते, मात्र घेतला नाही. 24 तारखेला अंतिम बैठक आणि अंतिम निर्णय मराठा समाजाचा असणार आहे. एक मताने ठोस निर्णय घ्यायचा आहे. सरकार कायद्याने खेटत असेल तर आम्ही देखील आता सरकारला कायद्याने खेटणार आहोत. यावर 24 तारखेला निर्णय होईल,असे ते म्हणाले.

'900 एकरमध्ये आमची सभा होणार आहे. ती कुठे घ्यायची त्याचाही निर्णय या बैठकीत घेऊ. ठोस निर्णय झाल्यानंतर सरकारला कळणार आहे की, आपण सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी केली असती, तर बरं झालं असतं. आता उलटाच कुटाणा झाला. तुम्हाला पश्चाताप करायला नाही लावला तर नाव बदलून ठेवीन, असा इशारा जरांगे यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: ५ वर्षात मिळणार ३६ लाख रुपये, या सरकारी योजनेत गुंतवणूक करुन व्हाल मालामाल

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

हे वागणं बरं नव्हं! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मेट्रोत महिलेचा विचित्र डान्स; व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात

SCROLL FOR NEXT