Manoj Jarange calls for “Chalo Mumbai” protest; Beed meeting outlines roadmap for Maratha agitation Saam tv
महाराष्ट्र

Maratha Reservation: 'चलो मुंबई'! मनोज जरांगेंचा रोष नेमका कोणावर? आंदोलनाचा रोड मॅप नेमका कसा?

Manoj Jarange Warning to Maharashtra Government: जरांगेंनी पुन्हा एकदा सरकारला इशारा देत.. मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. बीडमधल्या बैठकीत नेमकं काय झालं? जरांगेंचा रोष नेमका कोणावर आहे? जरांगेंच्या आंदोलनाचा रोड मॅप नेमका कसा आहे? ओबीसी समाज आक्रमक का झालाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून

Suprim Maskar

  • मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी “चला मुंबई” आंदोलनाचा इशारा दिला.

  • बीडमधील बैठकीत आंदोलनाचा रोड मॅप आखण्यात आला.

  • सरकारवर ठोस निर्णय न घेतल्याचा आरोप करून जरांगे यांनी रोष व्यक्त केला.

  • ओबीसी समाज आरक्षण धोक्यात येईल या कारणामुळे आक्रमक पवित्रा घेत आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार आहेत.. मात्र त्याआधी बीडमधल्या मांजरसुंबात मराठा आंदोलकांची विराट गर्दी उसळली.. याचं बैठकीतून जरांगेंनी सरकारला अंतिम इशारा दिलाय. दरम्यान मनोज जरांगे पाटलांचा आंतरवली सराटी ते मुंबईकडे जाण्याचा रोडमॅप काय आहे.. पाहूयात.

27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार, शहागड - पैठण मार्गे शेवगाव - पांढरी पूल -आळेफाटा- शिवनेरी दर्शन -कल्याण,वाशी, चेंबूर या मार्गे मोर्चा 29 ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानावर पोहोचणार. दरम्यान एक मुक्काम शिवनेरी गडावर होण्याची शक्यता आहे. लोकशाही मार्गानं आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलयं.

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी जरांगेंकडून केली जात असताना दुसरीकडे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळांनी जरांगेंना अप्रत्यक्ष इशारा दिलाय. तर आरक्षणाचा तुकडा कुणीही पाडू शकत नाही, असा टोला हाकेंनी लगावलाय. मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी जरांगे मुंबईत धडकणार आहेत. त्याआधीच ओबीसी समाजानं आक्रमक पवित्रा घेतलाय. त्यात जरांगेंनी ओबीसी महासंघावर केलेल्या आरोपानंतर मराठा विरुद्ध ओबीसी असा पुन्हा एकदा संघर्ष निर्माण झाला होता.

सत्ताधाऱ्यांची उदासीनता आणि आरक्षणप्रश्नी सुरू असलेला वेळकाढूपणा यामुळे मराठा समाज संतप्त आहे. या परिस्थितीत जरांगे पुन्हा एकदा रस्त्यावरील लढाईसाठी सज्ज झालेत. सरकार याला कसे सामोरे जाणार याकडे सगळ्याचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautam Gaikwad: सिंहगडावरून पडला,पाच दिवस जंगलातच; गौतम गायकवाडच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट!

Passenger Boat Accident: भाऊच्या धक्क्याकडे जाणऱ्या प्रवासी बोटीचा अपघात; नेव्हीच्या स्पीड बोटची धडक

Russia-Ukraine War: भारतच रशिया-युक्रेनमध्ये शांतता घडवणार? पुतीन-झेलेन्स्की भारतात येणार

Sleep and Earn: झोपा आणि झोपण्याचे पैसे कमवा, 9 तास झोपा, 10 लाख मिळवा

Maharashtra Live News Update: अंधेरीतून बस कोकणासाठी रवाना; गणेश भक्तांसाठी मनसेकडून विशेष सोय

SCROLL FOR NEXT