Manoj Jarange Accuses Maharashtra CM Saam tv
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांना नेमकं राजकारण करायचंय, आम्हाला आरक्षण.. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मनोज जरांगे काय म्हणाले?

Manoj Jarange Accuses Maharashtra CM: मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांवर राजकारणाचा थेट आरोप केला. "आम्हाला आरक्षण पाहिजे, राजकारण नाही", असा ठाम पवित्रा.

Bhagyashree Kamble

ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमीका घेतली. आझाद मैदान मराठा बांधवांनी भरगच्च भरला आहे. आज आमरण उपोषणाचा दुसरा दिवस. आज मनोज जरांगे पाटलांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. 'आम्हाला आरक्षण पाहिजे, राजकारण करायचे नाही. मुख्यमंत्र्यांना नेमकं राजकारण करायचेय. आरक्षण द्यायचे नाही', असा थेट आरोप त्यांनी केलाय.

'मुंख्यमंत्र्यांना राजकारण करायचेय'

'आम्हाला आरक्षण पाहिजे, राजकारण करायचे नाही. मुख्यमंत्र्यांना नेमकं राजकारण करायचेय. आरक्षण द्यायचे नाही. संयम धरा. आपण वाट बघू.. शांत राहा आपण वाट बघू..', असं जरांगे पाटील म्हणाले. 'तुम्ही रस्त्याला गाड्या लावण्याऐवजी. पोलिसांनी दिलेल्या पार्किंगमध्ये गाड्या लावा, ही माझी विनंती आहे. सगळ्या मुंबईत मराठे झाले आहेत. त्यांनी मुंबईत येऊ नये का.. ते काही वाईट करणार नाहीत, हा माझा शब्द आहे. पोरांनी अजिबात वाईट करायचे नाही. फक्त वाहने सुरक्षित लावा, हे पोरांना सांगणं आहे', असं थेट आव्हान त्यांनी मराठा बांधवांना दिले.

चौथ्या दिवसापासून तोंडाला पाणी सुटलंय

'फडणवीस साहेबांनी सगळ्या मागण्यांची अंबलजावणी करणं गरजेचं आहे. त्यांनी करावी. उपोषणाच्या काळात चौथ्या दिवसापासून तोंडाला पाणी यायला सुरूवात होतं. पण आता दुसऱ्या दिवसापासूनच सुरू झालेय. कारण, दोन दिवसांपासूनचा प्रवास अन् आधीच्या उपोषणामुळे हे होतेय. त्यामुळे शरिराला जास्तीचा परिणाम होतोय', अशी प्रकृती बाबतीत माहिती जरांगे पाटलांनी दिली.

मराठ्यांना सन्मान द्या

'सरकारला आमचे सांगणं आहे, मागण्याची अंबलबाजवणी तात्काळ करा. मराठ्यांना सन्मान द्या, त्यांचा अपमान करू नका. काही मंत्री म्हणतात, एकाचे काढून दुसऱ्याला देऊ शकत नाही. पण आम्ही त्यांचे काढून आम्हाला द्या असे म्हणत नाही. महाराष्ट्रात गैरसमज पसरवू नका, आमचे आहे ते आम्हाला द्या', असंही जरांगे पाटील म्हणाले.

मराठा आणि कुणबी एकच

'त्यांचे काढून घेणं म्हणजे काय... ओबीसीला उदा. ३२ टक्के आऱक्षण आहे, त्यामधील २० टक्के काढून घेणं अन् त्यांना १० टक्केच ठेवणं.. मग त्याला काढून घेणं म्हणतात. मंत्री राज्यात संभ्राम निर्माण करत आहेत. ओबीसीमधील ३२ आरक्षणातील २० टक्के मराठ्यांना काढून द्या, असे आम्ही म्हणत नाही. आमच्या ज्या नोंदी आहेत, त्या ओबीसीमध्ये आहेत. आम्ही ओबीसीमध्येच आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे. हे आमचं म्हणणं समजून घ्यावे. सरकारने संभ्रम निर्माण करू नये. राज्य अस्थिर करण्याचे काम मंत्र्यांकडून होऊ नये', असंही जरांगे पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ₹१५०० जमा होण्यास सुरुवात, तुम्हाला आले की नाही? अशा पद्धतीने करा चेक

Maharashtra Live News Update: माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आज दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेणार

Liver Detox Juice: लिव्हरला चिकटलेली घाण झटक्यात साफ होणार; घरात तयार करा '3' DETOX Drinks

Shocking: बिहार हादरलं! पोलिसासोबतचा वाद टोकाला, विद्यार्थ्याला बंदुकीने मारहाण, हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून फेकले

Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, मनोरंजनविश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT