160 km Manmad–Jalgaon third railway line becomes operational with 22 major bridges and 12 new stations. saam tv
महाराष्ट्र

मनमाड-जळगावकरांना दिलासा! १६० अंतराची तिसरी रेल्वेलाइन सुरू; २२ मोठे, २९५ छोटे पूल अन् १२ स्टेशन, असा असेल मार्ग

Manmad–Jalgaon Third Railway Line: भारतीय रेल्वेने मनमाड आणि जळगाव दरम्यान १६० किमी लांबीचा तिसरा रेल्वे मार्ग सुरू करण्यात आलाय. यात २२ मोठे पूल २९५ छोटे पूल आणि १२ नवीन स्थानके असणार आहेत. या रेल्वेलाइनमुळे प्रवासाची गती वाढले आणि मालवाहतूकीची क्षमता सुधारली जाणार आहे.

Bharat Jadhav

  • मनमाड–जळगाव दरम्यानची 160 किमी तिसरी रेल्वेलाइन कार्यान्वित करण्यात आलीय.

  • या रेल्वे मार्गावर मार्गावर 22 मोठे आणि 295 छोटे पूल आहेत.

  • पिंपळखेरी–नांदगाव भागाची सीआरएस तपासणी यशस्वी झाली आहे

मनमाड आणि जळगावकरांसाठी आनंदाची बातमी आहे. या दोन्ही शहरातील प्रवासाला अधिक चालना मिळणार आहे. कारण मनमाड-जळगाव दरम्यान १६० किमी अंतराची तिसरी रेल्वेलाइन सुरू करण्यात आलीय. भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वेने १६० किमी लांबीच्या मनमाड-जळगाव तिसऱ्या मार्ग प्रकल्पाची यशस्वीरित्या सुरू करण्यात आली. या प्रकल्पामुळे मार्गावरील वाहतूक क्षमता, गती आणि रेल्वेची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल.

मनमाड-जळगावच्या तिसऱ्या रेल्वेलाइन प्रकल्पाचा शेवटचा १०.४ किमीचा भाग, पिंपळखेरी-नांदगाव, रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी तपासणी केली. गती चाचणीनंतर हा रेल्वे मार्ग कार्यान्वित करण्यात आला. यावेळी सीएओ (बांधकाम) मुख्यालय अविनाश पांडे, डीआरएम भुसावळ, पुनीत अग्रवाल, डीसीई (बांधकाम) किशोर सिंह यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. सीआरएसने पिंपळखेर आणि नांदगाव स्थानकांची तपासणी केली. स्थानक सुरक्षा, पायाभूत सुविधांची तयारी आणि चालू कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आलाय.

या रेल्वे मार्गाच्या चाचणी दरम्यान इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हने १३१ किमी/तास वेगाने चाचण्या पूर्ण केल्या. यात या विभागाची सुरक्षितता आणि ऑपरेशनल क्षमता कशी असेन याची तपासणी करण्यात आली. दरम्यान हा तिसरा मार्ग प्रकल्प मुंबई-कोलकाता मार्गाचा एक महत्त्वाचा भाग असून जो जड वाहतुकीसाठी ओळखला जातो. या नवीन मार्गामुळे प्रवासी आणि मालवाहतूक गाड्यांची गती वाढेल. कार्यक्षमता लक्षणीयरीत्या सुधारणार आहे.

दरम्यान या प्रकल्प खर्च ₹१,८५० कोटी होता. या १६० अंतराच्या मार्गावर एक महत्त्वाचा मोठा पूल, २२ मोठे आणि २९५ छोटे पूल, सात आरयूबी आणि १२ नवीन स्टेशन इमारती बांधण्यात आल्या आहेत. तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या मार्गावर सिग्नलिंग आणि टेलिकॉममध्ये ११ नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, १ पॅनेल इंटरलॉकिंग आणि १० इंटरमीडिएट ब्लॉक हटचा समावेश आहे. यासह १६ ब्लॉक विभागांमध्ये ब्लॉक प्रोव्हिंग बाय अ‍ॅक्सल काउंटर (बीपीएसी) बसवण्यात आलेत. पिंपार्कडेड-नांदगाव विभागात एक मोठा पूल, दोन मोठे आणि ३० छोटे पूल बांधण्यात आलेत.

विद्यमान इंटरलॉकिंग्ज आणि आरआरआयमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत. EUR, BLC आणि इतर मालवाहतूक गाड्यांचे सुरळीत संचालन निश्चित करण्यासाठी नांदगाव येथील यार्ड लेआउटमध्ये सुधारणा करण्यात आलीय. नांदगाव यूपी यार्डमधील १० किमी/ताशी कायमस्वरूपी वेग प्रतिबंध (PSR) काढून टाकण्यात आलाय. त्यामुळे ऑपरेशनल कार्यक्षमता वाढलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात आणखी एक राजकीय भूकंप; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा समर्थकांसह सामूहिक राजीनामे

Pune: महिला वकिलानं बलात्कार केल्याचा पुरुषाचा आरोप, कुठं-कुठं नेलं? तक्रारीत संपूर्ण घटनाक्रम सांगितला

Maharashtra Live News Update: रसायनी एमआयडीसीतील सुप्रिया केमिकल कंपनीत भीषण आग

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा भर सभेत थेट उदय सामंत यांना फोन, टाळ्यांचा कडकडाट, नेमके काय घडले? नंतर गडबड..., VIDEO

Nashik Crime: मालेगाव पुन्हा हादरलं! १३ वर्षीय गतीमंद मुलीवर अत्याचार, ५५ वर्षीय नराधमाला ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT