manmad police charged sandip deshmukh of union bank  Saam Digital
महाराष्ट्र

Manmad Union Bank: युनियन बँक एफडी घोटाळ्यापाठाेपाठ बॅंक प्रतिनिधीवर आणखी एक गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण

manmad police charged sandip deshmukh of union bank: या प्रकरणी विमा कंपनीचे अधिकारी सोहेल शेख यांनी मनमाड पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे. या तक्रारी वरून पोलिसांनी संदीप देशमुख याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Siddharth Latkar

- अजय सोनवणे

युनियन बँकेच्या मनमाड शहर शाखेत आणखी एक घोटाळा समोर आला आहे. यापूर्वी एफडी बाबतचा घाेटाळा तर आता विम्याचा म्हणजेच इन्शुरन्सच्या पैशात देखील घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

युनियन बँकेच्या मनमाड शहर शाखेत एफडी घोटाळा ताजा असताना याचं बँकेत आता 'इन्शुरन्स' घोटाळा झाल्याचे समोर आल्यामुळे पुन्हा एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील संशयित संदीप देशमुख एफडी घोटाळा प्रकरणी न्यायालयीन काेठडीत आहे. त्यानेच विम्याच्या पैशात देखील गडबड केल्याचे समाेर आले आहे.

त्यानेच बँकेत बँकेची सिस्टर कन्सर्न असलेल्या स्टार युनिअन डाय हेल्थ इन्शुरन्स कंपनीमध्ये विमा काढणाऱ्या धारकांना इन्शुरन्सचे बनावट सर्टिफिकेट देऊन त्यांची लाखों रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी संदीप देशमुख याच्या विरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.

सध्या संदीप देशमुख हा एफडी घोटाळा प्रकरणी न्यायलयीन कोठडीत आहे. अगोदर एफडी घोटाळा आता इन्शुरन्स घोटाळा पाहून युनियन बँकेच्या मनमाड शहर शाखेत चाललंय तरी काय असा प्रश्न खातेदारांना पडला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरच्या ऐतिहासिक मारबत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या आवाजाची चाचपणी...

Sambhjinagar News : संपूर्ण कुटुंबाला डेंग्यूची लागण, वडील अन् बहीण ICU मध्ये दाखल, १२ वर्षाच्या पोटच्या मुलाचा मृत्यू

Diabetes Diet : डायबिटीजच्या रुग्णांनी केळी खावी की टाळावी? जाणून घ्या किती प्रमाणात खाणे योग्य

Konkan Fort : समुद्राच्या लाटांशी झुंज देत आजही दिमाखात उभा! कोकणात लपलाय १७व्या शतकातील 'हा' भव्य किल्ला

Golden Ring Road: १७३ किमीचा महामार्ग, ८ कमर्शियल हब; नागपूरचा ‘गोल्डन रिंग रोड’ ठरणार गेमचेंजर! कसा असेल मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट?

SCROLL FOR NEXT