नवी दिल्ली : मणिपूरमधील हिंसाचारादरम्यान मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. मणिपूरमध्ये घडणाऱ्या हिंसेच्या घटनेवरून नॅशलन पिपल्स पार्टीने मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. या पक्षाने मणिपूरमधील राज्य सरकारला दिलेला पाठिंबा काढला आहे.
मणिपूरमधील हिंसाचारादरम्यान नॅशनल पीपल्स पक्षाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून मणिपूरमधील सरकारला दिलेला पाठिंबा काढण्याचा निर्णय जाहीर केला. नॅशनल पीपल्स पक्षाने घेतलेल्या निर्णयाने भाजपला मोठा धक्का बसला आहे.
'मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्या नेतृत्वातील सरकार राज्यातील परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरलं आहे. यामुळे आम्ही सरकारला दिलेला पाठिंबा काढण्याचा निर्णय घेत आहे, असे नॅशनल पीपल्स पक्षाचं म्हणणं आहे.
नॅशनल पीपल्स पक्षाने मणिपूरमधील परिस्थितीवरून भाजपचे राष्ट्रीय अध्यश्र जे.पी. नड्डा यांना पत्र लिहून कायदा सुव्यवस्थेविषयी चिंता व्यक्त केली आहे. मागील काही दिवसांपूर्वी हिंसाचाराची घटना घडली. या घटनेत अनेक निर्दोष लोकांना प्राण गमवावे लागले. मणिपूर राज्य मोठ्या संकटात असल्याचं पक्षाने म्हटलं आहे.
मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनांवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज दिल्लीत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत मणिपूरमधील सुरक्षेची समीक्षा करण्यात आली. सोमवारी गृहमंत्री या मुद्द्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आणखी मोठी बैठक होणार आहे.
आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्रातील सर्व सभा रद्द करून दिल्लीला पोहोचले होते. मागील काही दिवसांत मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे.
दरम्यान, यावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर टीका केली आहे. मणिपूरमध्ये त्यांचं एक नाही आणि सैफ नाही. मे २०२३ पासून मणिपुरात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. या घटनांमुळे तेथील लोकांचं भविष्य धोक्यात आलं आहे. आम्हाला असं वाटतंय की, मणिपुरात भाजप हेतपूर्वक जाळपोळ करू इच्छित आहे. कारण त्यांची फोडा आणि राज्य करा, अशी रणनीती असल्याचं खरगे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.