Are You Eating Mangoes That Contain Toxic Chemicals Saam tv
महाराष्ट्र

Health News : फळांचा राजा रसायनाच्या ताब्यात! रसायनाचा वापर करून पिकवलेल्या फळांचा आरोग्यावर होतोय परिणाम

रसायनाचा वापर करून पिकवले जातात आंबे, मानवी आरोग्यावर होतोय परिणाम

विनोद जिरे

Are You Eating Mangoes That Contain Toxic Chemicals : आपण आंबे खाताय ते नैसर्गिक रित्या पिकवलेले आहेत? हे तपासण्याची गरज आज निर्माण झालीय. आज रासायनिक रित्या आंबे पिकवण्यासाठी रसायनाचा वापर केला जातोय ? विशेष म्हणजे कार्पेटसह इतर रसायनही वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये उघडकीस आला आहे. याची कबुली खुद्द व्यापाऱ्यांनीचं दिली आहे.

बाजारामध्ये विक्रीसाठी आलेले आंबे घेताय तर थोडी काळजी घ्या. अवकाळी आणि गारपीटीमुळे बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील आंब्यांचा प्रचंड नुकसान झालं. त्यामुळे आंब्याची मागणी वाढली आहे. पण पुरवठा होत नसल्याने परराज्यातून म्हणजे कर्नाटक, तेलंगणा, तमिळनाडू, केरळ आणि गुजरात मधून मार्केटमध्ये आंबे येत आहेत. मात्र आलेले आंबे पिकवण्यासाठी नैसर्गिक रित्या न पिकवता ते केमिकल, रसायनाच्या साह्याने पिकवले जात आहेत.  (Latest Marathi News)

विशेष म्हणजे यात कार्पेट, कारबाईट, या रासायनिक दृष्ट्या पिकवलेले आंबे शरीरास हानिकारक आहेत. विशेषतः कार्पेट ने पिकवलेले जर आंबे खाल्ले तर कॅन्सरचा धोका असल्याचा अन्न औषध प्रशासनाने सांगितल.

बीड शहरातील मार्केटमध्ये आंब्याची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी गेले असता काही व्यापाऱ्यांशी चर्चा केली. तर त्यात धक्कादायक वास्तव समोर आले, गुजरात, कर्नाटक आणि इतर राज्यातून वाहतूक करून आणलेले आंबे पिकवण्यासाठी नैसर्गिकरित्या पिकवले तर त्याला 10 दिवस लागतात म्हणून केमिकल रसायन आणि कार्पेटचा वापर केला जातो.

नैसर्गिकरीत्या पिकवलेले आंबे 50 टक्के खराब होतात. तर केमिकल मधून पिकवलेले आंबे खराब होत नाहीत म्हणून त्याचा वापर केला जातो. असं खुद्द व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

याचबाबत मार्केटमधील दुसऱ्या व्यापाऱ्याला विचारले असता कार्पेटमध्ये आंबे पिकवत नाहीत. नैसर्गिक रित्या स्टोअरमध्ये आंबे पिकवतो. जर कार्पेटमध्ये पिकवलेले आणि रसायन आणि पिकवलेले आंबे असतील तर खाऊ नका, असे आवाहन देखील व्यापाऱ्याने केले. तसेच कार्पेटला बंदी आहे. असं देखील या व्यापाऱ्याने सांगितलं. मात्र खाजगी मध्ये काहीजण कार्पेट वापरत असल्यास देखील त्यांनी कबुली दिली.

यानंतर या आंब्याच्या संदर्भात कारवाई करणाऱ्या अन्न औषध प्रशासनाकडे साम टीव्हीची टीम गेली. यावेळी कार्पेटला पूर्णतः बंदी आहे. कुठे विक्री केली जात असेल तर नागरिकांनी अन्न औषध प्रशासनाशी संपर्क साधावा. त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. कार्पेटने पिकवलेले कोणतेही फळ खाल्ले तर शरीरास मोठी हानी होते. कॅन्सर सारखा धोका असल्याचा देखील अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त इमरान हाश्मी यांनी सांगितले.

मात्र इथे लिन आणि इथेपॉल ही रसायन प्रमाणात वापरून आंबे आणि फळ पिकवण्यासाठी अन्न औषध प्रशासन परवानगी देते. मात्र प्रमाणापेक्षा जास्त वापरले गेले, तर त्याच्यावरती देखील कारवाई केली जात असल्याचं, प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त इमरान हाश्मी यांनी सांगितलं.

दरम्यान, बीड जिल्ह्यातील या धक्कादायक वास्तवानंतर नागरिकांच्या जीवितांशी खेळ खेळणाऱ्या व्यापाऱ्यावरती कारवाई केली जावी. जास्त पैशाच्या लाभापोटी लोकांच्या धोका पोहोचवणाऱ्यावर अन्न औषध प्रशासन मेहेरबान का ? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.असे आंबे उघडपणे मार्केटमध्ये विक्री होत असताना अन्न औषध प्रशासनाने यावर कारवाई का करत नाही? असा प्रश्न सामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

SCROLL FOR NEXT