मंगळवेढा: वाळू माफियांच्या गाडीने पोलिसाला चिरडले; जागीच मृत्यू (पहा video)
मंगळवेढा: वाळू माफियांच्या गाडीने पोलिसाला चिरडले; जागीच मृत्यू (पहा video) भारत नागणे
महाराष्ट्र

मंगळवेढा: वाळू माफियांच्या गाडीने पोलिसाला चिरडले; जागीच मृत्यू (पहा video)

भारत नागणे

भारत नागणे

सोलापूर : वाळूची गाडी Sand Truck थांबवत असताना पोलीस कॉन्स्टेबल Police Constable गणेश प्रभू सोनलकर (वय 32) यांना भरधाव वेगाने येणाऱ्या वाळू टेम्पोने चिरडले अन् त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी 9.30 च्या सुमारास गोनेवाडी-शिरशी Gonewadi Sarashi रोडवरील हॅट्सन डेयरी येथे घडली.

हे देखील पहा-

नेमकं काय झालं?

याबाबत सविस्तर माहिती अशी देण्यात आली आहे की, लोकअदालत असल्यामुळे गणेश सोनलकर हे समन्स बजावण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. गोनेवाडीचे पोलीस पाटील यांना हॅट्सन डेयरी येथे या म्हणून गणेश सोनलकर हे तिथे त्यांची वाट पाहत थांबले होते.

त्या वेळी समोरून येत असलेल्या वाळूच्या टेम्पोला त्यांनी हात केला. तर वाळू टेम्पो चालकाने गाडी त्यांच्या अंगावर घालून निर्दयीपणे चिरडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या प्रकरणातील आरोपींचा लवकरच शोध घेणार असल्याचे अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव यांनी सांगितले.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha Fire : शेतातील गोठ्याला आग; शेती साहित्यासह ६ लाखाचे नुकसान

Bogus Seeds : बोगस एचटीबीटी बियाणे जप्त; नंदूरबार कृषी विभागाची कारवाई

Today's Marathi News Live : गोडसेंचा अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे थेट जिल्हाधिकारी कार्यालयात

Heart Attack Video: आधी डोकं धरलं, मग जमिनीवर कोसळला.. वर्क आऊट करताना युवा खेळाडूला मृत्यूने गाठलं; थरारक क्षण CCTVत कैद

Uma Ramanan Dies : तामिळ सिनेसृष्टीतला आवाज काळाच्या पडद्याआड, दिग्गज गायिकेचे निधन

SCROLL FOR NEXT