Solapur: प्रियकराचा लग्नास नकार; पोलिसांनी स्वखर्चाने लावलं 'आंतरजातीय लग्न'!

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनच्या वतीने प्रेमप्रकरणातून तक्रार देण्यास आलेल्या २२ वर्षीय तरूणीचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी ती अनाथ असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित मुलासोबत पोलीस स्टेशनमध्येच लग्न लावुन दिले.
Solapur: प्रियकराचा लग्नास नकार; पोलिसांनी स्वखर्चाने लावलं 'आंतरजातीय लग्न'!
Solapur: प्रियकराचा लग्नास नकार; पोलिसांनी स्वखर्चाने लावलं 'आंतरजातीय लग्न'!विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनच्यावतीने प्रेमप्रकरणातून तक्रार देण्यास आलेल्या २२ वर्षीय तरूणीचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी ती अनाथ असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित मुलासोबत पोलीस स्टेशनमध्येच लग्न लावुन दिले. स्वतः पोलीस निरीक्षक यांनी सोने, साडी, मुलास आहेर स्वखर्चाने खरेदी करून, मुलीस स्वतःची मुलगी मानुन पोलीस स्टेशनच्या आवारातच लग्न लावून दिले.

हे देखील पहा :

प्रत्येक ठिकाणी कायदाने शिक्षा न करता समुपदेशाने एकाचे कुंटुंब उभे राहत असेल तर ते नक्कीच चांगले आहे. चार हजार रूपयाची भांडी, आठ हजार रूपयाचे मणी मंगळसुत्र, तीन हजार रूपयेचे कपडे आहेर, वेदमूर्ती धानय्या स्वामी यांच्या उपस्थितीत लग्न लावण्यात आले. गेल्या सात आठ महिन्यापासुन मिस्त्री काम करणाऱ्या सचिन मंजुळकर यांची त्याच गावातील बिगारी काम करणाऱ्या यलव्वा टोणगे हिच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. पण मुलाच्या घरचे आंतरजाती मुळे लग्नास तयार नव्हते, मुलीचे आईवडिल सहा वर्षापुर्वीच वारले आहेत.

Solapur: प्रियकराचा लग्नास नकार; पोलिसांनी स्वखर्चाने लावलं 'आंतरजातीय लग्न'!
Nanded : दृष्टीदोष असलेला युवक गेला वाहून!

यलव्वा हि तिच्या आजीसोबत राहते. आजी देखील वार्धक्याने घरीच असते. त्यामुळे मुलगी बिगारी काम करून उदरनिर्वाह चालविते. तिची मिस्त्री सचिन यांच्या शी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मुलीस कोणीच नाही त्यामुळे व घरच्यांच्या विरोधामुळे मुलगा लग्नास टाळाटाळ करु लागला. त्यामुळे मुलीने थेट पोलीस स्टेशन गाठले. आपली आपबीती पोलीस निरीक्षकांना सांगितली. पोलीस निरीक्षक यांनी मुलाला आणि नातेवाईक यांना बोलावून घेतले. समुपदेशन करून स्वतः पोलीस निरीक्षक यांनी कन्यादान करून लग्न लावुन दिले.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com