दोन महिलांची बाचाबाची सोडविण्यास गेलेल्याच्या व्यक्तीच्या डोक्यात हातोडीने वार  Saam Tv
महाराष्ट्र

दोन महिलांची बाचाबाची सोडविण्यास गेलेल्याच्या व्यक्तीच्या डोक्यात हातोडीने वार

जखमींवर नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

अभिजीत सोनावणे

नाशिक - सायखेडा परिसरात किरकोळ कारणातुन झालेल्या वादात काल संध्याकाळी एका व्यक्तीनं दोन जणांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सायखेड्याच्या मार्केटच्या भिंतीवर गौऱ्या बनवण्याचा व्यवसाय काही महिला करतात. यावेळी किरकोळ कारणावरून दोन महिलांमध्ये बाचाबाची होत असतांना ज्ञानेश्वर जाधव हा तिथे वाद मिटविण्यासाठी गेला असता, योगेश देवकर याने जाधव यांच्या डोक्यात हातोडीने वार केले.

हे देखील पहा -

या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले असून जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घडलेल्या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून नाशिक शहरासह आता ग्रामीण भागातही गुन्हेगारीने डोके वर काढल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी धनगर समाज बांधवांचे बीडमध्ये आंदोलन

Navratri Colour History: लाल, पिवळा, हिरवा... नवरात्रीचे रंग कोणी ठरवले? काय आहे नऊ रंगाचा इतिहास?

Kidney stone pain: सतत जाणवणारी कंबरदुखी असू शकते किडनी स्टोनचं लक्षणं; कसे केले जातात यावर उपचार?

भाजप आमदारांसोबत संगनमत अन् महिलांशी गैरवर्तणूक; शिवसेनेच्या नेत्यावर आरोप, पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Ladki Bahin Yojana: पडताळणीसाठी लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले का? आदिती तटकरेंनी दोन शब्दात विषय संपवला

SCROLL FOR NEXT