संसार 

 

Saam Tv

महाराष्ट्र

थाटला तृतीयपंथी प्रेयसीसोबत संसार; नव्या विचारांच्या टाकल्या अक्षता ! (पहा व्हिडीओ)

म्हटलं जातं 'प्रेम हे आंधळ असत' अशाच एका आगळेवेगळे प्रेमाचे उदाहरण आणि लग्नात झालेले रूपांतर अशी सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारी घटना मनमाड शहरात घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मनमाड : म्हटलं जातं 'प्रेम हे आंधळ असत' अशाच एका आगळेवेगळे प्रेमाचे उदाहरण आणि लग्नात झालेले रूपांतर अशी सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारी घटना मनमाड Manmad शहरात घडली आहे. आजूबाजूचा समाज आणि बाकीचे लोक काय म्हणतील याच्या पलीकडे जाऊन एका तरुणाने त्याची प्रेयसी असलेल्या तृतीयपंथीयाच्या Transgender गळ्यात मंगळसूत्र घातले आहे. मित्र आणि घरातील मंडळीच्या उपस्थितीत आणि देवाच्या साक्षीने वरमाला घालून मंगळसूत्र बांधले आहे.

हा आगळावेगळा विवाह सोहळ्याची चर्चा सध्या मनमाड शहर परिसरात तर आहेच पण संपूर्ण नाशिक Nashik जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे. या नवीन दाम्पत्याला दोन्ही कडच्या लोकांनी शुभ आशीर्वाद दिले आहेत. या आगळ्यावेगळ्या लग्नाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर Social Media व्हायरल होत आहे.

मनमाड शहरातील तृतीयपंथी असलेल्या महंत शिवलक्ष्मी आणि येवला तालुक्यातील तरुण संजय झाल्टे यांची टिकटॉक Tiktok या सोशल मीडिया साईट वरून व्हिडीओ बघून ओळख झाली. त्यानंतर दोघे एकमेकांशी गप्पागोष्टी करू लागले. त्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात कधी पडले. हे त्यांना सुद्धा कळले नाही.

दोघातील प्रेमाचे नाते इतके घट्ट झाले. एक दिवस देखील त्यांची भेट नाही झाली तर दोघे ही अस्वस्थ होत होते. त्यामुळे या दोघांनी लग्न करण्याचा निश्चय केला. मात्र आपल्या नात्याला समाज आणि लोक काय म्हणतील असा विचार शिवलक्ष्मीच्या मनात सतावत होता. पण 'मी लग्न करेल तर फक्त तुझ्यासोबतच अन्यथा लग्नच करणार नाही' असा हट्ट संजयने धरून ठेवला होता.

सर्वात मोठी अडचण होती ती दोघांच्या घरातील मंडळीना मनवण्याची. मात्र दोघांनी आपापल्यापरीने प्रयत्न करून घरच्या लोकांना पटवून दिले. आम्ही आता एकमेकांशिवाय राहू शकत नाही. परिवारातील सदस्यांनी त्यांचे प्रेम पाहून अखेर दोघांच्या लग्नाला होकार दिला. त्यानंतर महंत शिवलक्ष्मी संजय झाल्टे या दोघांचा मनमाडपासून जवळ असलेल्या नागापूर येथील नागेश्वर महादेव मंदिरात लग्नसोहळा केला. यावेळी दोघांच्या घरातील काही मंडळी आणि त्यांचे मोजके मित्र उपस्थित होते.

'माझी सोशल मीडियावर शिवलक्ष्मीशी ओळख झाली. आम्ही २ वर्ष फ्रेंड्स होतो. त्यानंतर मी तिला १४ फेब्रुवारीला रीतसर प्रपोज केलं. डायरेक्ट लग्नाची मागणी घातली. तीने देखील चार चौघात लग्न करशील तरच लग्न करेल, अशी अट माझ्यासमोर घातली. मी माझ्या घरच्यांना विश्वाससात घेतले आणि रीतसर मागणी घालून पारंपरिक पद्धतीने लग्न केले. आता आयुष्यभर तिच्यासोबत राहून संसार करणार आहे'. अशी ग्वाहीच संजय झाल्टे याने दिली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

SCROLL FOR NEXT