Miraj Police Station Saam Tv
महाराष्ट्र

बाबो! पहिली पत्नी असताना पतीनं केलं दुसरं लग्न; आता आली पश्चातापाची वेळ

माझी 50 एकर शेती आहे आणि PSI आहे असे सांगून त्याने दुसरे तरुणीशी लग्न केले.

विजय पाटील

सांगली - माझी 50 एकर शेती आहे आणि मी पोलीस अधिकारी आहे भासवत पहिली पत्नी असताना देखील पतीने दुसरं लग्न केलं आणि त्यानंतर या पतीवर दोन्ही पत्नीने गुन्हा दाखल केला आहे. तर पती सद्या फरार असून पोलीस (Police) त्याचा शोध घेत आहेत.मारुती माने या व्यक्तीने खोटे बोलून दुसरे लग्न केल्या प्रकरणी दुसऱ्या पत्नीने मिरज शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. मारुती माने याचे मालगाव रोड बडाक हॉस्पिटल (Hospital) मागे राहणाऱ्या 35 वर्षीय महिलेशी पाच वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. तो ट्रक चालक काम करत होता.

हे देखील पाहा -

तीन महिन्यापूर्वी मारुती माने हा राधानगरी येथे कामाला जात असल्याचे सांगून घरातून गेला तो परत आला नाही. शेजारी राहणाऱ्या काही लोकांनी मारुती याला महादेव कॉलनी येथे फिरताना पाहिले. शेजाऱ्यांनी पहिल्या पत्नीला सांगितले असता तीने महादेव कॉलनी येथे चौकशी केली असता मारुती याने एका तरुणीशी लग्न केले असून तो या परिसरात राहत असल्याची माहिती खरी ठरली.

माझी 50 एकर शेती आहे आणि PSI आहे असे सांगून त्याने दुसरे तरुणीशी लग्न केले. या प्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे आढळून आल्यानंतर मिरज शहर पोलीस ठाण्यात दोन्ही पत्नीनी धाव घेतली. याप्रकरणी पत्नीने मिरज शहर पोलिसात तक्रार दाखल केली असून खोटे बोलून दुसरे लग्न केल्याचा गुन्हा मारुती माने याच्यावर दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होण्याचे भीतीने मात्र पती फरार झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिवसेनेत जोरदार इनकमिंग; राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, माजी आमदारानं हाती घेतलं धनुष्यबाण

Local Body Election : सांगली, अमरावती महापालिकेच्या आरक्षणाची सोडत जाहीर; कोणता वॉर्ड कुणाचा?

Congress Leader: एक्झिट पोलनंतर काँग्रेसला दुसरा मोठा धक्का, निवडणूक संपताच बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Akola Crime:धक्कादायक! विद्यार्थिनीवर मास्तराची वाईट नजर; अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Maharashtra Live News Update: ठाण्यातील पार्कमधील इमारतीच्या जाळीला अचानक आग

SCROLL FOR NEXT