ulhasnagar crime news Saam Tv
महाराष्ट्र

Ulhasnagar Crime News: भररस्त्यात पुतण्याने सख्ख्या काकाला संपवलं; धक्कादायक कारण आलं समोर

अवघ्या १५ लाखांच्या रूमचा वाटा मिळण्यावरून वाद झाल्यानं पुतण्यांनी सख्ख्या काकांचा भररस्त्यात खून केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली.

अजय दुधाणे

Ulhasnagar News : अवघ्या १५ लाखांच्या रूमचा वाटा मिळण्यावरून वाद झाल्यानं पुतण्यांनी सख्ख्या काकांचा भररस्त्यात खून केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी आता मध्यवर्ती पोलिसांनी अवघ्या ३ तासात सर्वच्या सर्व ३ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Latest Marathi News)

उल्हासनगरच्या कॅम्प ३ मधील फॉलोवर लेन परिसरात मरोठिया कुटुंबीयांची एक रूम आहे. मरोठीया कुटुंबात ४ भाऊ असून त्यापैकी धर्मवीर कालीचरण मरोठिया या एका भावाचं निधन झालं आहे. त्यामुळे या रुमचे चार ऐवजी तीनच वाटे करावेत, अशी इतर भावांची मागणी होती. मात्र दिवंगत धर्मवीर याच्या परिवाराचा त्याला विरोध होता. यातूनच कुटुंबात सतत वाद सुरू होते. याच वादातून कुटुंबात हाणामारी सुद्धा झाली होती.

हाणामारीची तक्रार देण्यासाठी आज सकाळी मनवीर कालीचरण मरोठिया, रामपाल कालीचरण मरोठिया आणि राखी रामपाल मरोठिया हे तिघे मध्यवर्ती पोलीस ठाण्यात येत होते. यावेळी भोलू उर्फ योगेंद्र धर्मवीर मरोठीया, शालू उर्फ गणेश धर्मवीर मरोठिया आणि त्यांचा जावई आकाश रामजीलाल वाल्मिकी या तिघांनी त्यांना फॉलोवर लेन चौकात गाठलं आणि जीवघेणा हल्ला चढवला.

या हल्ल्यात मनवीर कालीचरण मरोठीया यांचा मृत्यू झाला. तर रामपाल कालीचरण मरोठिया आणि राखी रामपाल मरोठिया हे दोघे जखमी झाले. या हल्ल्यानंतर तिन्ही आरोपी मुंबईला पळून गेले. मात्र पोलिसांनी अवघ्या ३ तासात त्यांच्या मुसक्या आवळल्या.

या प्रकरणात पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपींची आई सुनीता धर्मवीर मरोठिया हिलाही आरोपी केल्याची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे.

नेमकं काय घडलं?

ज्या रुमचे वाटे करण्याकरून हा सगळा वाद झाला, त्याची किंमत अवघी १५ लाख रुपये इतकी आहे. त्यामुळे १५ लाखांचे तीनच वाटे करण्याची ३ भावांची मागणी होती. तर एका मृत भावाच्या मुलांनी मात्र आपल्याला डावललं जात असल्याच्या भावनेतून हे टोकाचं पाऊल उचललं आणि थेट काकांवरच हल्ला चढवत त्यांची हत्या केली. त्यामुळं उल्हासनगर शहरात मात्र खळबळ माजली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवड शहरात ठाकरे सैनिकांनी एकत्र साजरा केला जल्लोष

Thane Traffic Alert : ठाणे - घोडबंदर मार्ग पुढील पाच दिवस वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग कोणता?

Pune: 'मला पप्पी दे, माझ्याकडे पैसे आहेत'; ७३ वर्षीय वृद्धाकडून २७ वर्षीय तरूणीचा विनयभंग, पुण्यात खळबळ

Coffee while fasting: कॉफी प्यायल्याने उपवास मोडला जातो का?

Nashik Rain: नाशिकच्या गंगापुर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, अन् एक तरुण रामकुंडात अडकला, पाहा थरारक प्रसंग|VIDEO

SCROLL FOR NEXT