तब्ब्ल 53 मुलींची सोशल मीडियावर फसवणूक करणारा अटकेत  SaamTv
महाराष्ट्र

तब्बल 53 मुलींची सोशल मीडियावर फसवणूक करणारा अटकेत

आरोपीने आतापर्यंत 53 तरूणींची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. या मुलींनी पोलिसात धाव घेतली आहे. तर काही मुलींना त्याने 8 दिवसात लग्न करणार असल्याचे आश्वासन दिले होते !

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सागर आव्हाड

पुणे : सोशल मीडियाद्वारे तरूणींना भुरळ पाडून ओळख वाढवित त्यांच्या नात्यातील तरूणांना लष्करात भरती करण्याच्या आमिषाने तब्बल 57 जणींना गंडा घालणाऱ्या एकाला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने चार जणींसोबत घरोबा करून आर्थिंक लुट केल्याचे व तब्बल 53 तरूणींसोबत लग्नाच्या आमिष दाखवून बोलणी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. आतापर्यंत त्याने 53 लाखांची फसवणूक केली आहे. Man arrested for cheating 53 girls on social media

हे देखील पहा -

योगेश दत्तू गायकवाड (रा. कन्नड, संभाजीनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी एका तरुणीने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.फिर्यादी तरुणी मूळची आळंदी देवाची येथे राहत असून जानेवारी २०२० मध्ये आईच्या उपचारासाठी बिबवेवाडीतील एका रुग्णालयात आली होती. त्यावेळी परिसरातील स्थानकावर बसची वाट पाहत असताना आरोपी योगेशचे आधारकार्ड तरुणीला सापडले होते.

तरुणीने आवाज देत योगेशला आधार कार्ड दिले. त्यानंतर त्याने फिर्यादी तरुणी आणि तिच्या आईसोबत ओळख वाढविली. लष्करामध्ये असल्याचे खोटे ओळखपत्र दाखवून तरुणीच्या आईचा विश्वास संपादित केला. आरोपीने तरुणीसोबत खोटे लग्न करून तिच्या भावाला लष्करात भरती करण्यासाठी 2 लाख रुपये घेतले.

त्यानंतर तरुणीच्या गावातील तरुणांचा विश्वास संपादित करून योगेशने आतापर्यंत 53 तरूणींसोबत ओळख वाढवून प्रत्येकी एक लाख रूपये प्रमाणे 53 लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. त्याला सापळा रचून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. बिबवेवाडी पोलीस पथकाने हि कारवाई केली.

आरोपी योगेश मूळचा कन्नड तालुक्यातील असून, पुण्यातील विविध भागांत तो फिरत होता. बसस्थानकावर एकट्या तरुणींना गाठून विश्वास वाढवून मोबाईल नंबर घेत होता. त्याशिवाय सोशल मीडिया, विविध अ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामद्वारे ओळख वाढवून तरुणींना लग्नाचे आमिष दाखवित होता. त्यांच्या कुटुंबातील मुलाला लष्करात भरती करण्याच्या आमिषाने 2 ते 3 लाख रुपये घेऊन पोबारा करत होता.

अशाप्रकारे त्याने 4 जणींसोबत घरोबा करून आर्थिंक गंडा घातला आहे. त्याशिवाय 53 जणींसोबत प्रेमाचे नाटक करून त्यांच्याकडून प्रत्येकी 1 लाख रूपये घेऊन फसवूणक केली आहे. सोशल मीडियासह शहरातील विविध भागांत फिरून आरोपीने तरुणींना जाळ्यात अडकविले आहे.

त्यानंतर तरूणींचा मोबाईल नंबर, व्हॉट्सअ‍ॅपद्वारे चॅटिंग करून विश्वास वाढवून फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. आतापर्यंत त्याने 53 तरूणींची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. या मुलींनी पोलिसात धाव घेतली आहे. तर काही मुलींना त्याने 8 दिवसात लग्न करणार अस सांगितलं होतं सर्व मुली पोलीस स्टेशन मध्ये आल्या आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT