Mamta Kulkarni’s shocking remark on Dawood Ibrahim reignites old controversies. Saam Tv
महाराष्ट्र

ममता कुलकर्णीचं दाऊद प्रेम उफाळलं, साध्वी ममतासाठी दाऊदही साधू

Dawood Is Not a Terrorist,” Claims Mamta Kulkarni: साध्वी झालेली ममता कुलकर्णी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडलीय.यावेळी साध्वी ममतानं थेट दहशतवादी दाऊदला साधू ठरवलंय...ममतानं नेमके काय तारे तोडले आहेत.

Suprim Maskar

बॉलिवूडला रामराम करून साध्वी बनलेली ममता कुलकर्णी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असते. आता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबद्दल ममता कुलकर्णींनं मुक्ताफळं उधलली आहेत...ममताचं दाऊद प्रेम उफाळून आलंय.... साध्वी झालेल्या ममताला आता दाऊदही साधू वाटू लागलाय. दाऊदनं मुंबईत कोणताही बॉम्बस्फोट घडवला नसल्याचे तारे ममतानं तोडले आहेत...

90 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत बोल्ड भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या ममता कुलकर्णी अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलीय.

1993

ममता कुलकर्णीचा कथितरित्या दाऊदशी संबंध असल्याचा आरोप

2016

2 हजार कोटींच्या ड्रग रॅकेट आणि तस्करी प्रकरणात ममतावर आरोप

2025

किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वरपद स्वीकारण्यावरून वाद

मात्र चोहोबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर ममताला जाग आली असून राष्ट्रद्रोह्यांशी माझा संबंध नसल्याचं सांगत तिनं सारवासारव केलीय. दाऊद दहशतवादीचं असल्याचं उशिराचं शहाणपण ममताला सूचलंय.

बॉलीवूड सोडल्यानंतर ममता कुलकर्णी जवळपास 25 वर्ष दुबईत वास्तव्याला होती... मात्र अचानक दुंबईहून भारत परतल्यावर तीन चित्रपटातून निवृत्तीची घोषणा करून किन्नर आखाड्याची दीक्षा घेतली...मात्र साध्वी झालेल्या ममताला आता मुंबईचा गुन्हेगार दहशतवादी दाऊदही संत वाटू लागलाय. त्यामुळे ममताला मानसोपचाराची गरज आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: विजयी चौकार मारून जेमिमाला अश्रू अनावर; भर मैदानात कर्णधार हरमनप्रीतलाही कोसळलं रडू, पाहा Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

SCROLL FOR NEXT