Malegaon Viral Video saam tv
महाराष्ट्र

Video : राग डोक्यात गेला, उड्डाण पुलावर चढला, तरुणाने उडी मारली पण...पाहा थरारक व्हिडीओ

Malegaon Viral Video : मालेगाव येथील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण उड्डाण पुलावरुन उडी मारत असल्याचे पाहायला मिळते.

Yash Shirke

  • नाशिकच्या मालेगावमध्ये नवीन बसस्थानकाजवळ एका तरुणाने उड्डाण पुलावरून उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली.

  • बिहारमधून कामानिमित्त मालेगावमध्ये आलेल्या तरुणाला काहीजण त्रास देत असल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आलं.

  • थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तरुण जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे.

अजय सोनावणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Nashik Malegaon : नाशिकच्या मालेगाव येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मालेगावमधील एका उड्डाण पुलावरुन एका तरुणाने उडी मारल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना मालेगावमधील नवीन बस स्थानकाजवळ ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उड्डाण पुलावरुन खाली उडी मारणारा तरुण हा मूळचा बिहारमधला असल्याची माहिती समोर आली आहे. तो बिहारहून मालेगावमध्ये कामाच्या निमित्ताने आला. तो मालेगाव येथे गवंडी मजुरी करण्याचे काम करतो. त्याला काहीजण त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये तरुणाने उड्डाण पुलावरुन चढून उडी मारल्याचे पाहायला मिळते. त्यावेळी रस्त्यावर रहदारी देखील होती. उडी मारल्यानंतर तो खाली रस्त्यावर आदळला. सुदैवाने यात फक्त त्याच्या हाताला आणि कमरेला मार लागला. आसपासच्या लोकांनी या तरुणाला मालेगावच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.

नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या नवीन बस स्थानकाजवळच्या उड्डाण पुलावरुन एका तरुणाने उडी मारली. त्याने आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात उड्डाण पुलावरुन उडी मारल्याचे म्हटले जात आहे. उड्डाण पुलावर चालत जाऊन तेथून तरुणाने खाली उडी मारली. या घटनेच्या व्हिडीओची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टीसाठी सरकारी परवानगी; ठाकरे सेनेचा हल्लाबोल

Bihar Election: बिहारमध्ये काँग्रेसचा पराभव का आणि कसा झाला? ज्येष्ठ नेत्यानं थेट सांगितलं

Nashik Politics: भाजपला धक्का देणाऱ्या अजितदादांना नाशिकमध्ये धक्का,बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Amit Thackeray : मोठी बातमी! मनसे नेते अमित ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Delhi Bomb Blast Update: बॉम्बस्फोट प्रकरणी NIA ला मोठं यश; उमरसोबत कट आखणाऱ्या i20 कारच्या मालकाला अटक

SCROLL FOR NEXT