MALEGAON ACB RAID saam tv
महाराष्ट्र

सेवानिवृत्तीच्या 2 दिवस आयुक्त ACBच्या जाळ्यात; लाचखोर आयुक्तापेक्षा PA कडे जास्त घबाड

Malegaon Municipal Commissioner Arrested In Acb Bribery Case: मालेगाव महापालिकेच्या लाचखोर आयुक्ताला ACBनं ताब्यात घेतलयं....मात्र आयुक्तापेक्षा त्याच्या पीएकडे जास्त मोठं घबाड सापडल्यानं तपासाची दिशा कशी बदललीय? आणि महापालिकेत नेमका कसा भ्रष्टाचार सुरु होता? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.....

Suprim Maskar

सेवानिवृत्तीच्या अवघ्या दोन दिवसांपूर्वी मालेगाव महापालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले...कंत्राटदाराची 2 वेगवेगळ्या कामांची 20 लाख रुपयांची बिले मंजूर करण्यासाठी तब्बल 4 टक्क्यांनुसार लाच मागितल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आलेत...याप्रकरणी पोलिसांनी आयुक्त रवींद्र जाधव, स्वीय सहाय्यक नीलेश पाटील आणि लेखापाल हरीश डिंबर या तिघांनाही बेड्या ठोकल्या...

दरम्यान या अटकेनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने संशयितांच्या घरांवर एकाच वेळी छापेमारी करत तब्बल 12 ते 16 तास झाडाझडती घेतली. या झाडाझडतीदरम्यान एसीबीच्या हाती मोठ्या प्रमाणात मुद्देमाल लागलाय..चक्रावून टाकणारी बाब म्हणजे लाचखोर आयुक्त जाधव यांच्यापेक्षा त्यांच्या पीएच्या घरात जास्त रोकड सापडलीय...

आयुक्तांपेक्षा PA श्रीमंत! घरझडतीत लाखोंची रोकड जप्त!

निलेश पाटील, स्वीय सहाय्यक

यांच्या घरातून तब्बल 31 लाख 15 हजार रुपयांची रोकड जप्त

रवींद्र जाधव, आयुक्त

यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील फ्लॅटमधून 11 लाख 87 हजारांची रोकड जप्त

मालेगाव येथील शासकीय निवासस्थानातून 9 लाख 38 हजार रुपये जप्त

हरीश डिंबर, लेखापाल

यांच्या घरातून 13 लाखांची रोकड आणि इतर मुद्देमालासह एकूण 15 लाख 79 हजारांचा

मुद्देमाल जप्त

दरम्यान तिन्ही आरोपींनी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीय...एसीबीच्या पथकाने तिन्ही आरोपींकडून मोठ्या प्रमाणावर स्थावर मालमत्तेची कागदपत्रेही जप्त केली असून, त्यांची बँक खाती गोठवण्याची प्रक्रिया आणि बँक लॉकर्सचा शोधही सुरू केलाय...मात्र सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनं सेवाकालावधीत किती भ्रष्टाचार केला असेल? लाखो रुपयांची नोकरी, प्रतिष्ठा असूनही पैशांसाठी अधिकारी हपापलेले का असतात? भ्रष्टाचाराच्या आरोपांनी चर्चेत आलेले अधिकारी पुढे न्यायालय आणि पोलिसांच्या कचाट्यातून सुटून भविष्य़ात बिनदिक्कत कारभार कसा करतात? असे अनेक प्रश्न यानिमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित होतायत...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चौदाशे वर्षांची श्रद्धापरंपरा, आधुनिकतेचा नवा अध्याय; गोदामाईच्या साक्षीने श्रद्धेचा महासंगम, पाहा PHOTOS

संजय राऊत बाळासाहेब ठाकरेंना आवडायचे नाहीत! राज ठाकरेंनी संगितला मुलाखतीचा किस्सा

विधानपरिषदेतील पराभवानंतर महायुतीत 'महाभारत', बन विरुद्ध धंगेकर वाद पेटला; महायुतीच्या चिंतन बैठकीआधीच राडा

Garuda Purana: १६ संस्कारांचे ज्ञान तरीही लोक नाव ऐकताच गरुड पुराणाला का घाबरतात?

Maharashtra News Live Update: सातारा पोलीस दलातील ४६ अंमलदारांना दिवाळीच्या तोंडावर पदोन्नतीची भेट

SCROLL FOR NEXT