Malegaon Blast Case: High Court to review petition against NIA court acquittal of Sadhvi Pragya and others Saam tv
महाराष्ट्र

Malegaon Blast Case: NIA कोर्टचा आदेशाविरोधात उच्च न्यायालयात याचिका, साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहितांची अडचण वाढणार?

Malegaon Blast Case : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट समोर आलीय. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि इतरांना निर्दोष मुक्त करण्याच्या एनआयए न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलीय.

Bharat Jadhav

  • मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सात आरोपी निर्दोष मुक्त.

  • एनआयए कोर्टाच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल.

  • साध्वी प्रज्ञा ठाकूर आणि कर्नल पुरोहितांची अडचण वाढण्याची शक्यता.

मालेगावमध्ये बॉम्ब स्फोट प्रकरणातून माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची निर्दोष मुक्तता झालीय. दरम्यान प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांची बॉम्ब स्फोट प्रकरणात सुटका झालीय. त्यांच्या सुटकेच्या आदेशावरिोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय.एनआयएच्या विशेष न्यायालयाने ३१ जुलै रोजी सर्व सात आरोपींना निर्दोष सोडले होते. आरोपींविरोधात कोणतेही "विश्वसनीय आणि ठोस पुरावे" मिळून आले नाहीत.

निसार अहमद सैयद बिलाल आणि इतर पाच जणांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. याचिकाकर्त्यांच्या मते, ३१ जुलैला NIA कोर्टानं दिलेला आदेश चुकीचा होता. हा आदेश रद्द केला गेला पाहिजे. २९ सप्टेंबर २००८ रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे दुचाकीवर ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट झाला होता. यात सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि १०१ जण जखमी झाले होते.

NIA कोर्टानं काय म्हटलं होतं

निकाल वाचताना, न्यायाधीशांनी म्हटलं होतं की, खटला संशयापलीकडे सिद्ध करण्यासाठी कोणताही 'विश्वसनीय आणि ठोस' पुरावे नाहीत. 'केवळ संशय प्रत्यक्ष पुराव्याची जागा घेऊ शकत नाही.' कोणताही संशय पुराव्याची जागा घेऊ शकत नाही.

दरम्यान या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता. जवळजवळ १७ वर्षांनी विशेष न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिला. भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांच्यासह सर्व सात आरोपींना निर्दोष मुक्त केले. सरकारी वकिलांना त्यांचा खटला सिद्ध करण्यात अपयश आल्याने आरोपींची मुक्तता करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT