सावधान! मलेरिया-डेंग्यूच्या रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ Saam Tv
महाराष्ट्र

सावधान! मलेरिया-डेंग्यूच्या रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ

ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत डेंग्यूचे 160 रुग्ण

संजय तुमराम

चंद्रपूर - जिल्ह्यात मलेरिया Malaria आणि डेंग्यूच्या Dengue रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदविली गेली आहे. एकट्या ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत डेंग्यूचे 160 रुग्ण आढळले असल्याने उपाययोजनांची गती वाढविली गेली आहे. दरम्यान मलेरियाने 21 दिवसात 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील सिंदेवाही आणि नागभीड तालुक्यात हे मृत्यू नोंदले गेले आहेत. जिल्ह्यात जानेवारी 2021 पासून 274 मलेरिया रुग्ण आढळले आहेत.

हे देखील पहा -

विशेष म्हणजे ही वाढ ग्रामीण भागासह शहरी क्षेत्रातही चिंताजनक मानली जात आहे. मलेरियाचे 121 रुग्ण शहर मनपा क्षेत्रात आढळून आल्यावर शहर मनपाने दर शनिवारी 'कोरडा दिवस' पाळण्याचे अभियान सुरू केले आहे. मनपाच्या आरोग्य विभागाने आरोग्य सेविकांच्या माध्यमातून घराघरात पाण्याची भांडी कोरडी करण्यासाठी जनजागृती सुरू केली आहे. शहराच्या विविध भागात फवारणी अभियानाच्या माध्यमातून डास निर्मूलन मोहीम वेगवान करण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : - पहिल्या वर्षापासून हिंदी सक्तीला नागपूरातील तज्ज्ञांचा विरोध

Prajakta Mali: थ्री पीस ड्रेसमध्ये खुललं अभिनेत्रीचं सौंदर्य, फोटो पाहून नेटकरी करतायत कौतुक

Pune Election : राष्ट्रवादीमधील फूट भाजपच्या पथ्यावर, पुण्यात पुन्हा कमळ फुलणार की घड्याळाची टिकटिक वाजणार?

Maharashtra Transport : ओला-उबरसारख्या अ‍ॅप कंपन्यांच्या भाडेवाढीला लगाम, वाचा राज्य सरकारचा नेमका प्लॅन काय?

Politics: आमदाराविरोधात ईडीची मोठी कारवाई, ४० किलो सोन्यासह १०३ कोटींची मालमत्ता जप्त

SCROLL FOR NEXT