RBI Cancels License of Shankarrao Mohite Patil Co-operative Bank Saam Tv
महाराष्ट्र

Pandharpur News: धवलसिंह मोहिते पाटील यांना मोठा धक्का, शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेवर RBIची मोठी कारवाई

RBI Cancels License of Shankarrao Mohite Patil Co-operative Bank: अकलुजच्या शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेवर आरबीआयने मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने बँकेचा परवाना रद्द केला.

Priya More

भरत नागणे, पंढरपूर

काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. माजी सहकार मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी स्थापन केलेल्या अकलुजमधील शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेचा परवाना अखेर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून रद्द करण्यात आला आहे. या कारवाईपूर्वी बँकेवर अनेक निर्बंध लादण्यात आले होते. हे निर्बंध लादून देखिल बँकेत अपेक्षित सुधारणा झाली नाही त्यामुळे अखेर आरबीआयने बँकेचा परवाना रद्द केला.

शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यामागची कारणं देखील समोर आली आहेत. मोहिते पाटील सहकारी बॅंकेकडे सध्या पुरेसे भांडवल आणि उत्पन्नाच्या संधी नाहीत. त्यामुळे बँकिंग नियमन कायद्यानुसार तरतुदींचे पालन होत नाही. बँकिंग नियमन कायद्याचे पालन करण्यात शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक अपयशी ठरली. त्यामुळे ही बँक चालू राहणं, ठेवीदारांच्या हितासाठी धोकादायक असल्याने आरबीआयकडून कारवाई करण्यात आली.

शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक धवलसिंह मोहिते पाटील यांच्या अधिपत्याखाली काम करत होती. आरबीआयने या बँकेचा परवाना रद्द केला. आरबीआयच्या या कारवाईनुसार बँकेतील सर्व व्यवहार थांबविण्यात आले आहेत. पुढच्या काही दिवसांत ही बँक अवसायनात काढण्याच्या दृष्टीने अवसायक नेमण्यात यावा, अशा सूचनाही आरबीआयने दिल्या आहेत. याबाबतचा आदेश रिझर्व बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक पुनीत पांचोली यांच्या स्वाक्षरीने जारी केले आहेत.

दरम्यान, शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकची स्थापना १९८३ मध्ये कर करण्याता आली होती. अकलूजमध्ये या बँकेचे मुख्य कार्यालय होते. त्याचसोबत सोलापूर, टेंभुर्णी, इंदापूर, करमाळा आणि पुण्यातील कोथरूड येथे या बँकेच्या शाखा होत्या. आता या बँकेविरोधात आरबीआयने कारवाई केल्यामुळे जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या बँकेचे ठेवीदार आणि खातेदार देखील चिंतेत आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT