Ajit Pawar Nanded x
महाराष्ट्र

नांदेडमध्ये मोठा राजकीय भूकंप! अजित पवारांना जबरदस्त धक्का, बड्या नेत्यासह २३ जण काँग्रेसच्या वाटेवर

Major Political Upset in Nanded: राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे कार्याध्यक्ष रामदास पाटील यांनी दिला राजीनामा. लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करणार

Bhagyashree Kamble

  • नांदेडमध्ये मोठी राजकीय उलथापालथ.

  • राष्ट्रवादीचे रामदास पाटील काँग्रेसच्या वाटेवर.

  • लवकरच पक्षप्रवेश होणार.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेडमधील राजकारण तापलंय. नांदेडमध्ये काँग्रेस पक्षात मोठी इनकमिंग होणार आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे. राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे कार्याध्यक्ष रामदास पाटील यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतलाय.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच पार पडतील. जानेवारी अखेरपर्यंत या निवडणुका पार पडतील. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने कंबर कसली आहे. नांदेडमध्ये मात्र मोठी राजकीय उलथापालथ झाली असल्याचं पाहायला मिळत आहे.

नांदेडच्या देगलुर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का बसणार आहे. राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे कार्याध्यक्ष रामदास पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पाटील यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत देगलूरमध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.

एकीकडे पक्षप्रवेश सोहळा पार पडत असताना, दुसरीकडे अजित पवार गटातील काही सदस्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. रामदास पाटील यांच्यासह १८ माजी नगरसेवक, ३ माजी नगराध्यक्ष, २ माजी जिल्हा परिषद सदस्यांनी राष्ट्रवादी पक्षाला जय महाराष्ट्र केलं आहे. लवकरच त्यांचा काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश सोहळा पार पडेल.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात असून, काँग्रेस पक्षाचं बळ अधिक वाढलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Tourism : मुंबईकरांनो गुलाबी थंडीत पिकनिक प्लान करा, बोरीवलीत आहे २ सुपरकूल ठिकाणं

Maharashtra Live News Update: धावत्या पीएमपीएमएल बसने घेतला अचानक पेट; दिवसभरातील आजची दुसरी घटना

Hair Fall Treatment: केस गळतीसाठी हा चमत्कारिक घरगुती मास्क नक्की लावा; केस होतील घनदाट, लांब आणि सिल्की

Monday Horoscope: पैशांची तंगी होईल दूर, ३ राशींच्या व्यक्तींचे कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics: नांदेडमध्ये मित्रपक्षाला अजितदादांचा दे धक्का; भाजप नेते शरद पवार यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

SCROLL FOR NEXT