Kolhapur Political News Saam Tv News
महाराष्ट्र

Politics: कोल्हापुरात राजकीय भूकंप! काँग्रेस अन् राष्ट्रवादीला मोठा धक्का; बड्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी कमळ हाती घेतलं

Major Political Shakeup in Kolhapur: कोल्हापुरातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटातील अनेक नेत्यांचा भाजप प्रवेश; आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपाची ताकद वाढण्याची शक्यता.

Bhagyashree Kamble

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात मोठा राजकीय भूकंप घडला आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक दिलीप पोवार, सरस्वती पोवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक उत्तम कोराणे, तसेच शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे आणि इतर अनेक कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. यामुळे भाजपाची ताकद वाढल्याचं बोललं जात आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या भव्य पक्षप्रवेश कार्यक्रमाला खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार सुधीर गाडगीळ, प्रा. जयंत पाटील, मुरलीधर जाधव, विश्वराज महाडिक, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.

या सोहळ्यात रविंद्र चव्हाण यांनी उपस्थितांना संबोधित केलं. "या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे कोल्हापूरसह राज्यात भाजपाचे बळ अधिक मजबूत होईल. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून विकासाच्या दृष्टिकोनातून भाजपात प्रवेश केला आहे", असं चव्हाण म्हणाले.

खासदार धनंजय महाडिक यांनीही यावेळी विश्वास व्यक्त केला की, पोवार आणि कोराणे यांचा भाजपात प्रवेश महापालिका निवडणुकीत भाजपाला मोठं यश मिळवून देईल, असं ते म्हणाले. दिलीप पोवार हे यापूर्वी पाच वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत, हे उल्लेखनीय आहे, असंही महाडिक म्हणाले.

या प्रवेश कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्यातील इतर मान्यवरांमध्ये व्हिजन ग्रुपचे अध्यक्ष संताजी घोरपडे, काँग्रेसचे प्रसाद जाधव, वैभवराज राजेभोसले, राजेंद्र थोरवडे यांचाही समावेश होता. तसेच मुंबईतील उबाठा गटाचे मंदार राऊत, संकेत रुद्र यांनीही भाजपात प्रवेश केला.

चंद्रपूरमधून उबाठा संघटनेचे जिल्हाप्रमुख आणि चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष रवींद्र शिंदे, सभापती वासुदेव ठाकरे यांच्यासह निफाड तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपात प्रवेश केला. या वेळी आमदार बंटी भांगडिया, किशोर जोरगेवार, करण देवतळे आदी नेते उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sahibzada Farhan AK- 47 celebration : मला लोकांची...; AK-47 सेलिब्रेशनवर फरहान काय म्हणाला?

Navratri 2025: नवरात्रीत या वस्तूंची करा खरेदी, घरात कधीच कशाचीही कमी पडणार नाही!

Maharashtra Live News Update: परभणी शहरासह जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस

Pachora Viral Video: ओ प्रकाश भाऊ, कुदो मत! पण पाटील काही ऐकेना; पूर आलेल्या नदीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची उडी

आम्ही एकत्रच! शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे एकत्र; बॅनर पुण्यात, पण चर्चा महाराष्ट्रात | VIDEO

SCROLL FOR NEXT